BoM स्मार्ट बचत खाते
अ.क्र. | तपशील | बीएसएस - 15 सरासरी तिमाही शिल्लक | बीएसएस - 25 सरासरी तिमाही शिल्लक |
---|---|---|---|
1 | कोण खाते उघडू शकतो | निवासी व्यक्ती (एकल किंवा संयुक्त), HUF पात्रता निकष (घरगुती ठेवीदार) KYC मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्याच्या अधीन टीप : अल्पवयीन मुले यासाठी पात्र नाहीत. संयुक्त खाते सुविधा उपलब्ध आहे. | निवासी व्यक्ती (एकमेव किंवा संयुक्त), HUF पात्रता निकष (घरगुती ठेवीदार) KYC मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्याच्या अधीन टीप : अल्पवयीन मुले यासाठी पात्र नाहीत. संयुक्त खाते सुविधा उपलब्ध आहे. |
2 | वय (किमान) | 18 वर्षे (व्यक्तींसाठी) | 18 वर्षे (व्यक्तींसाठी) |
3 | प्रारंभिक ठेव | शून्य शिल्लक ठेवून खाते | शून्य शिल्लक ठेवून खाते |
4 | किमान शिल्लक आवश्यकता | एक्यूबी (सरासरी तिमाही शिल्लक) | एक्यूबी (सरासरी तिमाही शिल्लक) |
5 | किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल शुल्क | रु. 750 प्रति तिमाही | रु. 1000 प्रति तिमाही |
6 | चेकबुक सुविधा | दरसाल वैयक्तिक नावे 40 धनादेश प्रती विनामूल्य | दरसाल वैयक्तिक नावे 60 धनादेश प्रती विनामूल्य |
7 | डेबिट कार्ड | रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड विनामूल्य | रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड विनामूल्य |
8 | डेबिट कार्ड वार्षिक शुल्क | नाही | नाही |
9 | एटीएमवरील | बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर- अमर्यादित व्यवहार महिन्यातील 6 व्या व्यवहारानंतर | बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर- अमर्यादित व्यवहार (सहा मेट्रोसिटी – जसे की मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर आणि हैदराबाद व्यतिरिक्त जेथे फक्त 3 व्यवहार – वित्तीय आणि अवित्तीय हे विनामूल्य आहेत. महिन्यातील 6 व्या व्यवहारानंतर |
10 | कमाल व्यवहार मर्यादा | एटीएममधून रोख रक्कम काढणे पीओएस / ई-कॉमर्स प्रतिदिन रु. 3 लाखांपर्यंत | एटीएममधून रोख रक्कम काढणे पीओएस / ई-कॉमर्स प्रतिदिन रु. 5 लाखांपर्यंत |
11 | एनईएफटी/आरटीजीएस | ऑनलाईन : विनामूल्य | ऑनलाईन : विनामूल्य |
12 | अपघाती मृत्यूबाबत विनामूल्य वैयक्तिक विमा संरक्षण | प्लॅटिनम डेबिट कार्डवर वैयक्तिक विमा आणि संपूर्ण अपंगत्व विमा कवच रु. 2 लाख टीप – रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर अपघाती विमा संरक्षण विनामूल्य आहे, त्याची वैधता आणि दाव्यांचा निर्णय वेळावेळी एनपीसीएल यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राहील. | रुपे सिलेक्ट डेबिट कार्डवर वैयक्तिक विमा आणि संपूर्ण अपंगत्व विमा कवच रु. 10 लाख टीप – रुपे सिलेक्ट डेबिट कार्डवर अपघाती विमा संरक्षण विनामूल्य आहे, त्याची वैधता आणि दाव्यांचा निर्णय वेळावेळी एनपीसीएल यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राहील. |
13 | रुपे सिलेक्ट / प्लॅटिनम कार्डवर विनामूल्य सुविधा | देशांतर्गत तळांवर विनामूल्य प्रवेशाची सुविधा टीप : वर नमूद करण्यात आलेले लाभ हे एनपीसीएल यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आलेली दुरुस्ती / मागे घेण्यात आलेल्या तरतुदी यांच्या अधीन आहेत. |
टीप : वर नमूद करण्यात आलेले लाभ हे एनपीसीएल यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आलेली दुरुस्ती / मागे घेण्यात आलेल्या तरतुदी यांच्या अधीन आहेत. |
14 | आयएमपीएस | विनामूल्य (कोणतेही चॅनल) | विनामूल्य (कोणतेही चॅनल) |
15 | एसएमएस / ई-मेल अलर्ट | एसएमएस / ई-मेल अलर्ट | एसएमएस / ई-मेल अलर्ट |
16 | अन्य सेवांसाठी आकार | वर नमूद करण्यात आलेल्या नाहीत अशा अन्य सर्व सेवा जसे की लेजर फोलिओ चार्जेस, चार्जेस फॉर अकाऊंट स्टेटमेंट डीडी इत्यादी त्या त्या वेळी लागू असलेल्या दराने आकारण्यात येईल. | वर नमूद करण्यात आलेल्या नाहीत अशा अन्य सर्व सेवा जसे की लेजर फोलिओ चार्जेस, डीडी इन्शुरन्स इत्यादी त्या त्या वेळी लागू असलेल्या दराने आकारण्यात येईल. |
टीप : अन्य बचत खाती बीओएम प्रो बिझ प्राईम / बीओएम प्रो बिझ स्मार्ट एसबीमध्ये परावर्तित करता येतील. मात्र हा निर्णय त्या योजनेसाठी असलेले पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन असेल. परिशिष्ठ-1 अनुसार बँक सोबत देण्यात आलेल्या नमुन्यात, बँक खाते परावर्तित करण्यासाठी प्राधान्याने अनुमती लिहून घेईल. |
वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
1. बीओएम स्मार्ट एसबी योजना म्हणजे काय ?
बीओएम स्मार्ट एसबी योजना म्हणजे सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) या आधारावर गरजेनुसार तयार केलेली दोन खाती आहे.
- बीएसएस-15 सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) Rs. 15,000
- बीएसएस-25 सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) Rs. 25,000
2. बीओएम स्मार्ट एसबी किती प्रकारची खाती आहेत ?
KYC मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणारे निवासी व्यक्ती (एकल किंवा संयुक्त) आणि हिंदू अ-विभक्त कुटुंबे (HUF) पात्र आहेत. अल्पवयीन या खात्यासाठी पात्र नाहीत.
3. बीओएम स्मार्ट एसबी खाते उघडण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ?
किमान वयोमर्यादा 18 आहे.
4. या खात्यासाठी प्रॉडक्ट कोड काय आहेत ?
बीएसएस-15:
- व्यक्तिगत : 2045-1401
- अ-व्यक्तिगत : 2045-2401
बीएसएस-25:
- व्यक्तिगत : 2046-1401
- अ-व्यक्तिगत : 2046-2401
5. बीओएम स्मार्ट एसबी खाते उघडण्यासाठी प्रारंभिक ठेव आवश्यक आहे का ?
नाही, खाते शून्य शिल्लक ठेवून उघडता येते.
6. बीओएम स्मार्ट एसबी योजनेसाठी सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) किती ?
- बीएसएस-15 सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) Rs. 15,000
- बीएसएस-25 सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) Rs. 25,000
7. खात्यात किमान शिल्लक नसेल तर किती आकार भरावा लागतो ?
- बीएसएस-15 साठी प्रति तिमाही Rs. 750
- बीएसएस-25 साठी प्रति तिमाही Rs. 1,000
8. बीएम स्मार्ट एसबी योजनेसाठी चेकबुकची सुविधा कशी आहे ?
- बीएसएस-15 साठी दरसाल 40 वैयक्तिक धनादेश प्रति विनामूल्य
- बीएसएस-25 साठी दरसाल 60 वैयक्तिक धनादेश प्रति विनामूल्य
9. बीओएम स्मार्ट एसबी योजनेसाठी कोणत्या प्रकारचे डेबिट कार्ड मिळते ?
- बीएसएस-15 साठी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड विनामूल्य
- बीएसएस-25 साठी रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड विनामूल्य
10. डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क (एएमसी) आहे का ?
नाही, कोणत्याही प्रकारच्या डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क नाही.
11. एटीएममधून पैसे काढणे आणि पीओएस ई-कॉमर्स व्यवहारासाठी काही मर्यादा आहेत का ?
बीएसएस-15 आणि बीएसएस-25 यासाठी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा रु 1.50 लाख
पीओएस / कॉमर्स व्यवहार (बीएसएस-15 साठी) रु. 3 लाख आणि (बीएसएस-25) साठी रु. 5 लाख
12. एनईएफटी / आरटीजीएस व्यवहार विनामूल्य आहेत का ?
होय, ऑनलाईन एनईएफटी / आरटीजीएस व्यवहार विनामूल्य आहेत.
13. प्लॅटिनम / सिलेक्ट डेबिट कार्डसाठी कोणत्याही प्रकारची अपघाती विमा सुविधा आहे का ?
- बीएसएस-15 रु. 2 लाख अपघाती विमा संरक्षण
- बीएसएस-25 रु. 10 लाख अपघाती विमा संरक्षण
वर नमूद करण्यात आलेल्या सुविधा एनपीसीएल यांच्याकडून रुपे प्लॅटिनम / सिलेक्ट डेबिट कार्ड याबाबतच्या सुधारित / मागे घेण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन आहेत.
14. रुपे सिलेक्ट डेबिट कार्डवर कोणत्या प्रकारच्या विनामूल्य सुविधा आहेत ?
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तळांवर विनामूल्य प्रवेश
- निवडक ठिकाणी एक विनामूल्य स्पा सेशन
- गोल्डस जीएम / तळवलकर जीएम यांचे विनामूल्य सभासदत्व
- गोल्फ सेशन्सवर सवलतीच्या दरात प्रवेश
- एसआरएल डायग्नोस्टिक / थायरोकेअर येथे विनामूल्य / सवलतीच्या दरात आरोग्य तपासणी
वर नमूद करण्यात आलेल्या सुविधा एनपीसीएल यांच्याकडून रुपे प्लॅटिनम / सिलेक्ट डेबिट कार्ड याबाबतच्या सुधारित / मागे घेण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन आहेत.
15. आयएमपीएस व्यवहार विनामूल्य आहेत का ?
होय, आयएमपीएस व्यवहार कोणत्याही चॅनल मार्फत विनामूल्य आहेत.
16. बीओएम स्मार्ट एसबी योजनेअंतर्गत विनामूल्य एसएमएस अलर्ट पाठविण्यात येतात का ?
होय, विनामूल्य एसएमएस / ई-मेल अलर्टस् प्राप्त होतात.
17. सध्या सुरू असलेली खाती बीओएम स्मार्ट एसबीमध्ये परावर्तित करता येतात का ?
होय, अन्य बचत योजना बीओएम स्मार्ट एसबीमध्ये परावर्तित करता येतात. मात्र त्या सदर योजनेचे निकष पूर्ण करण्याच्या अधीन असतील.
18. सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) म्हणजे काय ?
सरासरी तिमाही शिल्लक म्हणजे तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजे – एका तिमाहीत तुम्ही खात्यात ठेवण्याची सरासरी किमान शिल्लक रक्कम होय.
19. सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) ची मोजणी कशी करायची ?
सरासरी तिमाही शिल्लक अशा प्रकारचे मोजता येईल की, प्रत्येक दिवस अखेर असलेली खात्यातील शिल्लक त्याला तिमाहीतील एकूण दिवसांनी भागायचे. त्याचप्रमाणे जर कोणी खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवली नाही, तर त्यांना काही आकार द्यावाच लागेल. सरासरी तिमाही शिल्लक काढण्याची पद्धत पुढीलप्रमाणे-
एक्यूबी – तिमाहीमध्ये प्रत्येक दिवस संपताना खात्यात असलेली शिल्लक / तिमाहीमध्ये असलेले एकूण दिवस