
सोने तारण कर्ज आपल्या वैयक्तिक खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, जसे की विवाह, उच्च शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी, व्यावसायिक प्रवास इत्यादी.
कर्जाचा उद्देश कोणत्याही सट्टा किंवा अनुमान विषयक उद्देशासाठी वापरला जाणार नाही या बाबत चे हमीपत्र द्यावे लागेल.
परतफेड पद्धत | मार्जिन |
---|---|
बुलेट (एकरकमी) परतफेड (जास्तीत जास्त 12 महिने) | 30% |
इतर सर्व प्रकरणांमध्ये (मुदत कर्ज/कॅश क्रेडिट) | 25% |
कर्जाच्या संपूर्ण कालावधीत कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर प्रमाण 75% राखले जावे. (व्याजासह एकूण थकबाकी / सोन्याचे मूल्य)
सोन्याच्या दागिन्यांचे तारण.
सोन्याची बिस्किटे, बार, विटा, किंवा प्राथमिक सोन्याच्या बदल्यात सोने तारण कर्ज मिळणार नाही.
आपल्या दागिन्यांच्या बदल्यात सोने तारण कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या, बँक कर्मचाऱ्यांसह, सर्व व्यक्ती
अर्जदाराने केवायसी मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली पाहिजे.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रति ग्रॅम रु . 4175/- किंवा गहाण ठेवल्या जाणार्या सोन्याच्या दागिन्यांच्या (त्यांवर जडलेली रत्ने वगळून) निव्वळ वजनाच्या बाजार मूल्याच्या 75% यापैकी जे कमी असेल त्या रकमेचे कर्ज दिले जाईल.
टीप: या कर्जाच्या मर्यादेचे वेळोवेळी पुनरावलोकन होऊन ही मर्यादा बदलू देखील शकते
मुद्दलाची परतफेड करण्यासाठी कालावधीची मर्यादा 24 महिने आहे. परतफेडीचे हफ्ते मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक या तत्वावर निश्चित करता येतील.
व्याज:व्याज मासिक आधारावर आकारले जाईल आणि जेव्हा ते आकारले जाईल तेव्हा ते फेडण्यात यावे.
अशा एकरकमी परतफेडीचा कालावधी 12 महिन्यांपेक्षा जास्त नसावा. मुदतीच्या शेवटी व्याज आणि मुद्दलाची बुलेट (एकरकमी) परतफेड करता येईल. खात्यावर व्याज मासिक अंतराने आकारले जाईल परंतु ते मुदतपूर्तीच्या वेळी मुद्दलासह देय होईल.
वर्षातून एकदा संपूर्ण रकमेचे परतफेड केली जावी या अटीवर वार्षिक पुनरावलोकन.
व्याज:व्याज मासिक आधारावर आकारले जाईल आणि जेव्हा ते आकारले जाईल तेव्हा ते फेडण्यात यावे.
सोने तारण कर्ज म्हणजे त्याच्या नावाप्रमाणेच हे सोन्याचे दागिने तारण किंवा गहाण ठेवून त्यांच्या बदल्यात दिलेले कर्ज आहे. हे एक सुरक्षित कर्ज आहे ज्यामधे कर्जदारांचे सोने तारण ठेवून त्याच्या बदल्यात रोखीच्या स्वरुपात कर्ज दिले जाते. आपल्या सोन्याची मालमत्ता लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी, त्या सोन्याचा वापर करून आपल्या गरजेसाठी पैसे उभे करण्याचा पर्याय सोने तारण कर्जा द्वारे उपलब्ध होतो.
सोने तारण कर्जासाठी तारण म्हणून घेतल्या जाणार्या सोन्यामध्ये सोन्याचे दागिने, बांगड्या , नेकलेस, ब्रेसलेट, झुमके, पेंडेंट,इत्यादि, तसेच बँकांकडून जारी करण्यात आलेली आणि त्यांच्या मूळ छेडछाड-मुक्त पॅकेजिंगमध्ये असलेली सोन्याची नाणी घेतली जातील.
सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रति ग्रॅम रु . 4175/- किंवा गहाण ठेवल्या जाणार्या सोन्याच्या दागिन्यांच्या (त्यांवर जडलेली रत्ने वगळून) निव्वळ वजनाच्या बाजार मूल्याच्या 75%, यांपैकी जे कमी असेल त्या मूल्याचे सोने तारण कर्ज बँकेकडून मंजूर केले जाते.
आपण खालीलपैकी कोणत्याही माध्यमाद्वारे सोने तारण कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता:
सोने तारण कर्जाचा व्याजदर फिक्स्ड असून आणि कर्ज वितरणाच्या तारखे रोजी लागू असेल तो ऑफर केला जातो. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सोने तारण कर्जावर भारतातील सर्वात कमी व्याजदर मिळतो, जो 9.30% प्रती वर्ष * पासून सुरू होतो. आरबीआय च्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि बँकेच्या विश्लेषणानुसार व्याजदरात बदल होऊ शकतो.
व्याजाची आकारणी मासिक चक्रवाढ पद्धतीने केली जाते, आणि निर्दिष्ट कालावधीत किंवा कर्ज खाते बंद होण्याच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्या दिवशी कर्जदाराला ते भरावे लागेल. एकदा ठरलेला व्याज दर कायम राहतो (फिक्स्ड) आणि दररोज कमी होत जाणार्या शिल्लकीच्या आधारावर आकारला जातो.
*रीटेल कर्ज अंतर्गत सोने तारण कर्ज
सोने तारण कर्जासाठी अर्ज करण्याकरता पॅन कार्ड हे अनिवार्य कागदपत्र नाही. तथापि, अर्जदाराने केवायसी मार्गदर्शक तत्वांची पूर्तता केली पाहिजे.
बँक कर्मचार्यांसह सर्व व्यक्ती बँक ऑफ महाराष्ट्र कडे सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात.
सोने तारण कर्जावर कोणतेही दस्तऐवजीकरण आणि तपासणी शुल्क नाही. प्रक्रिया शुल्क हे कर्जाच्या रकमेनुसार आकारले जाते. सध्या रु. 10.00 लाख पर्यंतच्या कर्जा साठी प्रक्रिया शुल्क 'शून्य' आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र कडून सोने तारण कर्ज घेण्यासाठी कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता नाही.
बँक ऑफ महाराष्ट्र कडून सोने तारण कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर आवश्यक नाही. सोने तारण कर्जाच्या पात्रता निकषांमध्ये सिबिल स्कोअर किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट तपासणीचा समावेश नाही – सोने तारण कर्जासाठी आवश्यक असलेली केवायसी कागदपत्रे सादर केली जावीत एवढीच अट आहे.
सोने तारण कर्जाचे व्याज स्वतंत्र पद्धतीने आकारले जाते आणि ते बँकेद्वारे निश्चित केले जाते