Azadi ka Amrit Mahatsav

भीम आधार पे

आधार पेमेंट ही अत्यंत सोपी आणि किफायतशीर अशी सुविधा आहे. कोणताही भारतीय नागरिक ज्याच्याकडे आधार क्रमांक आहे तो ही यंत्रणा वापरू शकतो, देशातील सुमारे 43 कोटी भारतीय लोक आधारशी संलग्न आहेत आणि ते या पेमेंट पद्धतीचा वापर करू शकत आहेत..

आधार पेमेंट ॲपचे फायदे:

ग्राहकांना हे वापरणे सोपे आहे, कारण व्यापाऱ्यास स्मार्ट फोन, अॅप आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचा वापर करावा लागतो.

आधार पेमेंट ॲपचे काही फायदे.

  1. ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी अँड्राईड ॲप अथवा अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नाही.
  2. डेबिट कार्ड वा क्रेडिट कार्ड बरोबर वागवण्याची गरज नाही.
  3. पिन्स, एमपिन्स वा पासवर्डस् लक्षात ठेवण्याची गरज नाही.
  4. आधारवर आधारित पेमेंट सिस्टीमप्रमाणेच आधार ब्रिज सिस्टीमवर आधारित जलदगती पेमेंट सिस्टीम (एईपीएस)
  5. व्यापारी आणि ग्राहकांसाठी अत्यंत अल्प अशा मूल्यात पेमेंट सुविधा

ट्रान्झॅक्शन चार्जेस:

रू. १० ते रू. १०,००० पर्यंतच्या व्यवहारासाठी ०.२५% एमडीआर