एक विहंगावलोकन

एनआरआय म्हणजे अशी व्यक्ती जी भारताची नागरिक आहे किंवा भारतीय मूळवंशाची व्यक्ती आहे किंवा जी व्यक्ती मूळ भारतीय वंशाची विदेशी नागरिक आहे जी भारताच्या बाहेर नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायउद्योगानिमित्त किंवा पोटापाण्यासाठी जिला अनिश्चित कळ भारताच्या बाहेर रहावे लागत आहे अशी व्यक्ती. अशा व्यक्तीस देखील एनआयआर मानण्यात येईल जर अशी व्यक्ती आधीच्या आर्थिक वर्षात भारतात 182 दिवसांपेक्षा अधिक काळ राहिलेली असेल.

या कारणासाठी पीआयओ विदेशी व्यक्तीस समजण्यात येते (जी व्यक्ती पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण, चीन, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान या देशांची नागरिक नाही.)

  • ज्या व्यक्तीचे आई-वडील किंवा आजी-आजोबा भारताचे नागरिक होते (किंवा)
  • जी व्यक्ती भारतीय नागरिकाची जोडीदार आहे (किंवा)
  • ज्या व्यक्तीने भूतकाळात कधी भारतीय पासपोर्ट धारण केलेला होता.

ओसीआय म्हणजे अशी व्यक्ती जी 26.01.1950 रोजी भारतीय नागरिक होण्यास पात्र होती किंवा 26.01.1950 रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी भारतीय नागरिक होती किंवा अशा कोणत्याही क्षेत्राची नागरिक आहे जे क्षेत्र 15.08.1947 नंतर भारताचा हिस्सा झाले आहे किंवा त्याची / तिची नातवंडे, जर त्याचा / तिचा देश ज्याची तो / ती नागरिक आहे तो कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही स्थानिक कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्व मान्य करीत असेल तर अशी व्यक्ती ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र असेल.