Azadi ka Amrit Mahatsav

पशुसंवर्धन शेतकरी व मत्स्यपालनास महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी)

पशुसंवर्धन शेतकरी व मत्स्यपालनास महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी)

सुविधा

   खेळते भांडवल (रोख पत)

हेतू

प्राणी, पक्षी, मासे, कोळंबी, इतर जलचर पकडण्याच्या कामासाठी अल्प मुदतीची पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी केसीसी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

पात्रता

केसीसी अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालनासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष खालीलप्रमाणे आहेत:

१)  मत्स्यपालन
१.१ अंतर्देशीय मत्स्यपालन आणि जलचर
१.१.१​ मत्स्यपालक, मत्स्यपालक (वैयक्तिक व गट/भागीदार/शेतात पीक घेणारे/पट्टाधारक शेतकरी), बचत गट, संयुक्त दायित्व गट आणि महिला गट.
१.१.२​ लाभार्थ्यांकडे मत्स्यपालनाशी संबंधित आवश्यक क्षेत्र जसे की तलाव, कुंड, खुले जल संस्था, रेसवे हॅचरी, संगोपन युनिट, मासे पालन आणि मासेमारीशी संबंधित उपक्रम, तसेच इतर कोणत्याही विशिष्ट राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण मत्स्यपालनाचे किंवा तत्सम प्रकल्पाचे मालक किंवा भाडेतत्वावर असणे आवश्यक आहे.
१.२    समुद्री मत्स्यपालन
१.२.१ वर १.१.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी ज्यांच्याकडे स्वत:चे किंवा भाड्याचे मच्छीमारी जहाज/बोट, जलाशये आणि समुद्रात, मत्स्यशेती/ मॉर्रकल्चर क्षेत्र आणि समुद्रात किंवा एखाद्या राज्याचे वैशिष्ट्य असलेली मत्स्यशेती किंवा अन्य संबधित ठिकाणी मच्छिमारी करण्याचा परवाना आहे.
२) कुक्कुटपालन आणि लहान प्राणी .
२.१ शेतकरी, कुक्कुटपालन स्वत: किंवा संयुक्त कर्जदार, संयुक्त दायित्व गट किंवा बचत गट किंवा मेंढ्या/शेळ्या/डुकरे/पक्षी, ससे यांचे स्वत:च्या मालकीचे किंवा भाड्याचे शेड असलेले शेतकरी.
३ ) दुग्धशाळा
 ३.१ शेतकरी व दुग्धशाळेतील शेतकरी वैयक्तिक किंवा संयुक्त कर्जदार, संयुक्त दायित्व गट किंवा बचत गट, भाडेकरू शेतकरी यांसह मालकीचे/भाड्याने/भाडेपट्टी शेड आहेत असे शेतकरी.

कर्जाचे प्रमाण

 • कर्जाची रक्कम;  कर्जाची रक्कम जिल्हा पातळीवरील तांत्रिक समितीने  (डीएलटीसी) प्रती एकरा प्रती युनिट/प्रती पक्षी या आधारावर निश्र्चित केल्यानुसार

मार्जीन

    लागू नाही (कर्जाची रक्कम नक्की करताना ठरेल)

व्याजदर

 • व्याजाचा दर : रु. २.०० लाखांपर्यंत : सवलतीचा व्याजदर द.सा.द.शे. @ ७% दराने
 • रु. २.०० लाखांच्या पुढे : कृषी कर्जाकरिता टप्पे पद्धतीने व्याजाच्या दराची आकारणी
  • रु. २.०० लाख ते रु. १०.०० लाख : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
  • रु. १०.०० लाखांच्या पुढे : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%
  (टीप : सवलतीचा व्याजदर पीकवृद्धीसाठी महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी) धारण करणाऱ्या आणि पशुसंवर्धन संदर्भात आणि/किंवा मत्स्योत्पादन या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असून, पशुसंवर्धन/मत्स्योत्पादन करणारांसाठी एमकेसीसी (महाबँक किसान क्रेडिट कार्ड) याची सर्वसाधारण मर्यादा रु. ३.०० लाख एवढी राहील.)

सुरक्षा

 • ​​रू. १.६० लाखापर्यंत : स्टॉक/पक्षी/प्राणी यांचे गहाणतारण
 • रू. १.१० लाखाहून अधिक :
         अ) साठा/पक्षी/प्राणी यांचे
          ब) जागेचे तारण/ थर्ड पार्टी हमी

परतफेड

 • कर्जदाराने हाती घेतलेल्या पद्धतीनुसार जशी रोकड/उत्पन्न उपलब्ध होईल त्यानुसार.
 • वार्षिक आढावा/नूतनीकरण.

विमा

   उत्पादित मालमत्तेचा संपूर्ण मूल्यासाठी विमा घ्यावा लागतो.

इतर अटी व शर्ती

 • केवायसीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
 • सिबिल अहवाल/आरबीआय डिफॉल्डर यादी मिळवावी व पडताळणी कराव.
 • कर्जाचे वितरण करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करावीत.
 • रुपे किसान कार्ड/चेक बुक/एसबी खाती इत्यादीद्वारे वितरण.

कागदपत्रे आवश्यक

अर्जदार : -

कर्ज अर्ज म्हणजे फॉर्म क्रमांक-१३८, आणि परिशिष्ट – बी २

 • सर्व ७/१२,८ अ, अर्जदाराची कागदपत्रे
 • सहकारी अर्जदाराचे बाबतीत पगारदार किंवा व्यावसायिक, अद्ययावत पगार स्लिप/आयटीआर/फॉर्म १६/ताळेबंद आणि पी/एल स्टेटमेंट.
 • आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराकडे थकित नसल्याचे प्रमाणपत्र.
 • मासेमारीसाठी लीज व मत्स्य पालन परवाना.

गॅरेंटर ( १ . ६० लाख रुपयांच्या कर्जासाठी ) :-
 • हमी फॉर्म एफ- १३८
 • सर्व ७/१२,८ अ आणि पीएसीएसच्या गॅरंटर्सचे प्रमाणपत्र
 • गॅरेंटर पगाराच्या बाबतीत किंवा व्यावसायिक असल्यास, अद्ययावत पगार स्लिप/आयटीआर/ फॉर्म १६/बॅलन्स शीट व पी/एल.
अर्ज करा