Azadi ka Amrit Mahatsav

डेबिट कार्डस :

) रुपे क्लासिक कार्ड

सदरचे कार्ड सर्व पात्र ग्राहकांना जारी करण्यात येते, ज्यायोगे त्यांना एटीएमवर डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्याच्या सुविधा प्राप्त होतात.

(बँक खात्यात शिल्लक असणाऱ्या आधारावर)

) रुपे प्लॅटिनम कार्ड

नव्या आणि विद्यमान ग्राहकांसाठी ज्या ग्राहकाने त्याच्या खात्यात तिमाही सरासरी शिल्लक रू. १०,०००/- आणि त्यापेक्षा अधिक राखली आहे, त्यांना हे कार्ड वितरित केले जाऊ शकते. सदरचे कार्ड बँकेच्या कर्मचाऱ्यांना तो/ती सेवेमध्ये असेपर्यंत विनामूल्य आहे. सदरचे कार्ड एटीएम्सवर, पीओएस व्यवहार आणि अन्य ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरता येईल. रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डची अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) हा सर्वसाधारण डेबिट कार्डपेक्षा ०.१५% अधिक आहे; ज्यायोगे बँकेस अंतर्गत व्यवहारांमध्ये रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त होईल.

रुपे प्लॅटिनम कार्ड धारकांसाठी विमा संरक्षण:

वैयक्तिक अपघात (मृत्यू) विमा                         :    रु. २.०० लाख

कायमस्वरुपी अपंगत्व विमा                         :   रु. २.०० लाख

रुपे सिलेक्ट (उच्च प्रकार) कार्डधारकांसाठी विमा संरक्षण:

वैयक्तिक अपघात (मृत्यू) विमा                           : रू. 10 लाख पर्यंत

कायमस्वरुपी अपंगत्व विमा                          : रू. 10 लाख पर्यंत

) किसान कार्ड

रुपे किसान कार्ड सर्व सर्वसाधारण एमकेसीसी खात्यांना मिळू शकेल.

) मुद्रा कार्डस्

मुद्रा कार्डस् ही वैयक्तिक स्वरूपाची डेबिट कार्डस् असून ती सर्व पात्र पीएमएमवाय (प्रधानमंत्री मुद्रा योजना) लाभधारकांना जारी करण्यात येतात.

) स्टुडंट डीबीटी प्रीपेड-कार्डस् (क्लोज्ड लूप कार्डस्)

ही प्रीपेड कार्डस् अशा कार्डस्मध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेच्या बदल्यात वस्तूंची खरेदी करण्यासाठी जारी करण्यात येतात. सध्या बँकेने अशी प्रीपेड कार्डस् पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आणि नागपूर महानगरपालिकेच्या डीबीटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना जारी केली आहेत.

) व्हिसा क्लासिक कार्ड

सदरची कार्डस् अशा सर्व पात्र ग्राहकांना जारी करण्यात येतात. ज्यांना वरीलप्रमाणे सुविधांचा लाभ सर्व एटीएम्सवर घेता येतो. (खात्यामध्ये रक्कम शिल्लक असण्याच्या आधारे)

) व्हिसा पर्पल कार्ड

सदरची कार्डस् महाबँक पर्पल सेव्हिंग खातेधारकांना प्रत्येक दिवशी कमाल व्यवहार मर्यादा (रु. १००,००० = एटीएम आणि पीओएस) या अंतर्गत देण्यात येतात. कोणत्याही प्रकारचा देखभाल खर्च नाही आणि कोणत्याही एटीएमवर अमर्यादित व्यवहाराची मुभा.

 h)    रूपये पीएमजेडीवाय कार्ड्स:

पीएमजेडीवाय खातेदारांना कोणत्याही प्रकारचे कार्ड दिले जाते.

रूपये पीएमजेडीवाय कार्डसाठी विमा संरक्षण:

28 ऑगस्ट 2018 पर्यंत खाती उघडली             :1 लाख

28 ऑगस्ट 2018 नंतर खाती उघडली                :2 लाख

 i)    परिशिष्ट