Beti Bachao Beti Padhao

मेसर्स लेंडिंगकार्ट फायनान्स लिमिटेड (LFL)

बँकेने विनातारण व्यवसाय कर्जासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी को-लेंडिंग मॉडेल अंतर्गत लेंडिंगकार्ट फायनान्स लिमिटेड या संस्थेबरोबर करार केला आहे.

लेंडिंगकार्ट ग्रुपची सुरुवात एप्रिल २०१४ मध्ये झाली आणि ही संस्था सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कर्जदारांना तिच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे खेळते भांडवल व्यवसाय कर्ज देण्याची सेवा पुरवते. A-303/304, सिटी पॉइंट, अंधेरी- कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००५९ येथे संस्थेच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे. ही संस्था तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रेडिट विश्लेषण, अंमलबजावणी, वितरण आणि संकलनापर्यंत संपूर्ण कर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेशन करते. कर्जदाराने त्यांची माहिती पुरवल्यानंतर कंपनी स्वतःच्या क्रेडिट अॅनालिटिकल टूल आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुन त्यांचे क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करते. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय कार्यक्षमतेने स्केलेबल होतो आणि मोठ्या प्रमाणात कर्जे व्यवस्थापित करण्यासाठी सज्ज होतो.

 अ. क्र.

विशेष

आवश्यक माहिती

I

योजनेचे नांव

एमएसएमई विनातारण व्यवसाय कर्ज

II

किमान आणि कमाल कर्जाची रक्कम

किमान – १.०० लाख आणि कमाल – १०.०० लाख

III

किमान आणि कमाल कर्ज कालावधी

किमान – १२ महिने आणि कमाल – ३६ महिने

IV

मिश्रित व्याजदर

२२.५०% पर्यंत

V

परतफेड माध्यम

मासिक हफ्ते

ग्राहकांच्या तक्रारींसाठी संपर्क तपशील :

  • मेसर्स लेंडिंगकार्ट फायनान्स लिमिटेड (LFL)
    1. ग्राहक सेवा ई-मेल आयडी : care@lendingkart.com
    2. ग्राहक सेवा फोन नंबर: 18005720202
  • बँक ऑफ महाराष्ट्र
    1. ग्राहक सेवा ई-मेल आयडी : agmcustomerservice@mahabank.co.in
    2. ग्राहक सेवा फोन नंबर: 020-24504211,24504228,24504230,24504234