Beti Bachao Beti Padhao

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट (झेड) प्रमाणित एमएसएमईंसाठी प्रोत्साहनपर योजना

 

झेड सर्टिफिकेशन

एमएसएमई शाश्वत (झेड) सर्टिफिकेशन ही झीरो डिफेक्ट झिरो इफेक्ट (झेड) पद्धतींबद्दल एमएसएमई (म्हणजे सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग) मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना झेड सर्टिफिकेशन घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे राबवण्यात येणारी एक व्यापक मोहीम आहे.

उद्दिष्ट

झेड योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहे - "आपण अशा प्रकारे वस्तूंचे उत्पादन केले पाहिजे की त्यांमध्ये शून्य दोष असतील आणि आपला निर्यात केलेला माल कधीही माघारी पाठवला जाणार नाही. आपण वस्तूंचे उत्पादन शून्य प्रभाव पद्धतीने केले पाहिजे ज्या योगे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही".

झेड सर्टिफिकेशन एमएसएमई मध्ये शून्य दोष शून्य प्रभाव (झेड) पद्धतींना प्रोत्साहन देते जेणेकरुन:

  • अद्ययावत तंत्रज्ञान आणि साधने वापरून दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीसाठी एमएसएमईंना प्रोत्साहित करणे, सक्षम करणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास  कमीत कमी करून उच्च गुणवत्ता आणि उच्च उत्पादकता साध्य करण्यासाठी त्यांच्या उत्पादन प्रक्रिया सतत अद्ययावत करणे.
  • एमएसएमई स्पर्धात्मक आणि निर्यात सक्षम होण्यासाठी झेड उत्पादनासाठी इकोसिस्टम विकसित करणे.
  • झेड पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि यशस्वी एमएसएमईच्या प्रयत्नांना पाठबळ देणे.
  • श्रेणीबद्ध प्रोत्साहनांद्वारे उच्च झेड सर्टिफिकेशन पातळी प्राप्त करण्यासाठी एमएसएमई ना प्रोत्साहित करणे.
  • एमएसएमई सस्टेनेबल (झेड) सर्टिफिकेशन असलेले शून्य दोष आणि शून्य परिणाम उत्पादनांची मागणी वाढवण्याबाबत जनजागृती करणे.
  • धोरणात्मक निर्णय आणि गुंतवणुकीच्या प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी सरकारला मदत होईल अशा सुधारणा सुचवणे.

झेड सर्टिफिकेशन स्तर

एमएसएमई सस्टेनेबल (झेड) सर्टिफिकेशन नोंदणी केल्यानंतर आणि झेड प्रतिज्ञा घेतल्यानंतर तीन स्तरांमध्ये मिळू शकते:

  • सर्टिफिकेशन स्तर 1: कांस्य
  • सर्टिफिकेशन स्तर 2: रौप्य
  • सर्टिफिकेशन स्तर 3: सुवर्ण

  1. झेड च्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येक एमएसएमई ला झेड सर्टिफिकेशन स्तरासाठी (कांस्य, रौप्य, सुवर्ण ) अर्ज करण्यापूर्वी "झेड प्रतिज्ञा" घ्यावी लागेल.
  2. झेड प्रतिज्ञा घेतल्यानंतर लगेचच WASH स्टँडर्ड प्रमाणन आणि इतर क्षमता निर्माण उपाय एमएसएमई KAWACH द्वारे उपलब्ध होतील.
  3. झेड प्रतिज्ञा घेतल्यानंतर प्रत्येक स्तरावर नमूद केलेल्या आवश्यकता पूर्ण करू शकू असा विश्वास असणाऱ्या एमएसएमई कोणत्याही सर्टिफिकेशन स्तरासाठी अर्ज करू शकतात. झेड प्रतिज्ञा घेण्याचा उद्देश हा आहे की एमएसएमई द्वारे त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये शून्य दोष शून्य प्रभावाची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी आणि झेड च्या प्रवासात पुढे जाण्यास उद्युक्त करण्यासाठी "पूर्व वचनबद्धता" किंवा एक गंभीर वचन घेणे.

झेड सर्टिफिकेशनसाठी पात्रता

एमएसएमई मंत्रालयाच्या उद्यम नोंदणी पोर्टल वर नोंदणीकृत सर्व एमएसएमई या एमएसएमई सस्टेनेबल (झेड) सर्टिफिकेशन मध्ये  सहभागी होण्यासाठी आणि संबंधित फायदे/ प्रोत्साहन मिळण्यास पात्र असतील.

सर्टिफिकेशन खर्चावर अनुदान

एका उद्यम नोंदणी अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व आणि कितीही युनिट्स या योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज करू शकतात. प्रत्येक युनिटला (एका उद्यम नोंदणी अंतर्गत) अनुदान/लाभ/ प्रोत्साहन मिळण्यासाठी स्वतंत्रपणे सर्टिफिकेशनसाठी अर्ज करावा लागेल.

  1. एमएसएमई ला झेड सर्टिफिकेशन स्तरासाठी आर्थिक सहाय्य/अनुदान दिली जाईल.
  2. एमएसएमई युनिटला खालील रचनेनुसार, सर्टिफिकेशन खर्चावर अनुदान मिळेल:
i. सूक्ष्म उद्योग : 80%
ii. लघु उद्योग: 60%
iii. मध्यम उद्योग: 50%

अतिरिक्त अनुदान:

  1. महिला/एससी/एसटी उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमई किंवा NER/हिमालय/LWE/बेट प्रदेश/आकांक्षी जिल्ह्यांतील एमएसएमई साठी 10% अतिरिक्त अनुदान असेल.
  2. वरील अनुदाना व्यतिरिक्त, मंत्रालयाच्या SFURTI किंवा सूक्ष्म आणि लघु उद्योग - क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम (MSE-CDP) चा भाग असलेल्या एमएसएमई साठी 5% अतिरिक्त अनुदान असेल.

एमएसएमई त्यांच्या विद्यमान झेड सर्टिफिकेशनची वैधता संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांचे सर्टिफिकेशन स्तर श्रेणी सुधारित करण्याचा पर्याय निवडू शकतात. अर्ज केलेल्या स्तरासाठी खर्च आणि अनुदान समान राहील.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व झेड प्रमाणित एमएसएमई कर्जदारांसाठी सवलत (नवीन तसेच विद्यमान)

क्र.

झेड सर्टिफिकेशन श्रेणी

मध्ये सवलत

व्याज दर

क्रेडिट सुविधेसाठी प्रक्रिया शुल्क

बीजी /एलसी  आणि बिलांसाठी कमिशन

1

कांस्य

25 bps (0.25% pa)

25%

25%

2

रौप्य

35 bps (0.35% pa)

35%

35%

3

सुवर्ण

50 bps (0.50% pa)

50%

50%

टीप: झेड सर्टिफिकेशनशी जोडलेल्या सवलती सर्टिफिकेशनची वैधता संपल्यानंतर काढून घेतल्या जातील. सर्टिफिकेशनचे नूतनीकरण केल्यानंतर आणि कोअर बँकिंग सिस्टीममध्ये अपडेट करण्यासाठी शाखेला कळवल्यानंतर सवलती पुन्हा सुरु करण्यात येतील.

झेड सर्टिफिकेशनची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण

झेड सर्टिफिकेशनची वैधता संपल्यानंतर, एमएसएमई त्यांच्या झेड सर्टिफिकेशन स्तराच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात जेणेकरुन संबंधित लाभ / प्रोत्साहने मिळवणे सुरू ठेवता येईल.

सरकारची वेबसाईट

https://zed.msme.gov.in

अटी लागू: वर दिलेली माहिती केवळ स्पष्टीकरणात्मक आहे आणि संपूर्ण नाही.

संपर्क: अधिक तपशीलांसाठी, कृपया आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

Zero Defect zero effect by Bank of Maharashtra Zero Defect zero effect