
वैयक्तिक स्वरुपाचे खर्च भागविण्यासाठी महाबँक वैयक्तिक कर्ज योजना तयार करण्यात आली आहे. आपल्या कर्जाची प्रक्रिया आम्ही झटपट करतो. आता आपल्या वैयक्तिक खरेदीच्या योजना लांबणीवर टाकण्याची गरज नाही. त्याचबरोबर आपण सध्या अधिक व्याजाने अन्यत्र घेतलेले कर्ज बँक ऑफ महाराष्ट्राकडे हस्तांतरित करू शकता. झटपट मंजुरी मिळवून आपण आपल्या स्वप्नांना वास्तव स्वरूप द्या !
*प्रायव्हेट/पब्लिक लिमिटेड कंपनी, ज्यांची पगार खाती आमच्या बँकेकडे आहेत, अशा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशा कंपन्यांचे एक्स्टर्नल रेटिंग (सुरू असलेल्या स्थितीत) ए आणि त्यापेक्षा अधिक असावे.
वैयक्तिक कर्ज म्हणजे अशा स्वरूपाचे कर्ज जे वैयक्तिक गरजांची पूर्तता, जसे की घराचे नूतनीकरण, विवाह, तातडीचा वैद्यकीय खर्च, प्रवास, कर्जाची परतफेड, बिले भरणे आणि इतर यासाठी उपलब्ध करून देण्यात येते. अन्य कर्जांसाठी ज्याप्रमाणे जामीनदार, तारण अशा बाबींची गरज असते तशी वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत आवश्यक असत नाही. आणि कमीतकमी कागदपत्रांच्या आधारे ते प्राप्त करता येते. अन्य कर्जांप्रमाणेच आपणास वैयक्तिक कर्ज ईएमआय (समान मासिक हप्ते) द्वारे परत करता येते; किंवा तुमच्या बँक खात्यातून ते वळते करता येते.
वैयक्तिक कर्जासाठी, आपणास कर्जासाठीचा अर्ज द्यावा लागतो. आपले कर्जाच्या पात्रतेचे निकष पूर्ण झाल्यानंतर आपणास मंजूर कर्ज रक्कम, परतफेडीची मुदत आणि व्याजाचा दर या संदर्भात प्रस्ताव असलेले पत्र प्राप्त होईल. आपण प्रस्ताव स्वीकारला की लगेचच कर्जाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
वैयक्तिक कर्जाकरिता अर्ज करण्याआधी त्याचा मासिक हप्ता जाणून घेण्याकरता आपण ‘पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करावा.
वैयक्तिक स्वरूपाच्या गरजांसाठी लागणारी रक्कम वैयक्तिक कर्जाच्या रकमेतून भागवता येईल.
आपल्या वैयक्तिक कर्जाची मासिक हप्त्याद्वारे फेड करण्यासाठी आपण आपल्या बँक खात्यातून दर महिन्याच्या विशिष्ठ तारखेस रक्कम कापून घेतली जाईल. यासाठी ऑटो-डेबिट इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवू शकता.
होय, तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या "MahaMobile APP" द्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. खालील लिंक्सवरून महामोबाइल अॅप डाउनलोड करा:
आमच्या बँकेकडून डिजिटल कर्ज सुविधा प्राप्त करण्यासाठी पुढील टप्पे फॉलो करा.
डिजिटल लोन ऑनलाईनसाठी अर्ज कशा प्रकारे करावा यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.