Beti Bachao Beti Padhao

महाबँक वाहन कर्ज योजना - दुचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज

अ.क्र.

तपशील

योजनेच्या मार्गदर्शक सूचना

1

योजनेचे नाव

दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी महाबँक वाहन कर्ज

2

योजनेचा हेतू

अ. नवी दुचाकी खरेदी करणे (इंजिन 500 सीसी पर्यंत)

ब. नवी हाय व्हॅल्यु दुचाकी खरेदी करणे (इंजिन 500 सीसीच्या पुढे)

क. बॅटरीवर चालणारी नवी दुचाकी (ई-व्हेईकल) जी नामवंत ब्रँडची असेल त्यासाठी ग्रीन फायनान्स अंतर्गत कर्जपुरवठा.

(ज्या इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या हिरव्या नंबरप्लेटच्या असतील त्यासाठी कर्जपुरवठा मिळेल आणि गहाणतारण आकार घेतला जाईल.)

3

पात्रता

 • केंद्र सरकार/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना/सरकार अनुदानित शिक्षण संस्था/प्रायव्हेट/पब्लिक लिमिटेड कंपन्या इत्यादींचे कायमस्वरुपी कर्मचारी. ज्यांची सलग सेवा किमान एक वर्ष असणे अनिवार्य.
 • केंद्र सरकार/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना यांचे कर्मचारी ज्यांचे निवृत्तीवेतन दरमहा किमान 25,000/- रुपये आहे.
 • सीए, डॉक्टर, आर्किटेक्ट, कंपनी सेक्रेटरी, ॲडव्होकेट, सीएमए इत्यादी व्यावसायिक ज्यांची स्वत:ची प्रॅक्टीस आहे.
 • ज्यांना उत्पन्नाचे नियमित साधन आहे असे व्यावसायिक/स्वतंत्र उद्योजक.
 • शेतकरी जे उत्पादक शेती आणि तत्सम व्यवसाय करतात.
4

किमान वार्षिक उत्पन्न

 • पगारदारांसाठी रु. 2.50 (गतवर्षीचे उत्पन्न) गेल्या किमान 2 वर्षांचे आयटीआर किंवा मालकांकडून फॉर्म 16 आवश्यक.
 • अन्य व्यक्तींसाठी रु. 3.00 लाख (गतवर्षीचे उत्पन्न) गेल्या किमान 2 वर्षांचे आयटीआय आणि संबंधित कागदपत्रे आवश्यक.
5

पात्र कर्ज रक्कम

कमाल कर्ज रकमेचा निर्णय हप्ता कापून घेण्याच्या मान्यताप्राप्त निकषांच्या आधारे घेण्यात येईल.    

कमाल कर्ज रक्कम (ई-व्हेईकलसह)

 • किमान कर्ज रक्कम - रु. 50,000/-
 • कमाल कर्ज रक्कम - रु. 5,00,000/-

हाय-एंड टू व्हीलर - 2 व्हिलर्स (सुपर बाईक)

 • किमान कर्ज रक्कम - रु. 50.00 लाख
 • कमाल कर्ज रक्कम - रु. 25.00 लाख
6

मार्जिन

वाहनाच्या एकूण किंमतीच्या 30% (ऑन रोड प्राईज)

ऑन रोड प्राईजमध्ये एक्स शो रुम प्राईज 30%

रोड टॅक्स, नोंदणी फी, आणि वाहन विमा (किमान 1 ते 3 वर्षे) याचा समावेश आहे. सुट्ट्या भागांच्या किंमतीचा समावेश नाही.

7

परतफेडीचा कालावधी

कमाल 84 महिने

8

व्याजाचा दर

व्याजदर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

9

कपात

नियोजित मासिक हप्त्यासह एकंदर मासिक उत्पन्नाच्या 65% (पगारदार व्यक्तींसाठी) / एकंदर वार्षिक उत्पन्नावर (पगारदारांव्यतिरिक्त)

10

तारण

खरेदी केलेल्या वाहनाचे गहाणतारण.

11

प्रक्रिया फी

कर्ज रकमेच्या 0.50%  किमान रु. 500/- कमाल रु. 5000/-

Apply Now