परिचय:
आमची वेबसाइट वापरण्याचा आपला अनुभव सतत सुधारण्याच्या दृष्टीने आम्ही कुकीज कुकीज वापरतो, ज्याद्वारे आपली प्राधान्ये आणि वेबसाईट वरील आपला वापर लक्षात ठेवला जातो. ही माहिती वापरून आम्ही आपल्या आवडीनिवडी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि आपल्याला आवडेल असा आम्हाला वाटणारा आशय वितरीत करू शकतो. वेबसाइटवर प्रवेश करून आपण आम्हाला आपल्या संगणकावर किंवा मोबाइल डिव्हाइसवर कुकीज आणि इतर ट्रॅकिंग तंत्रज्ञानामध्ये प्रवेश आणि संग्रहित करण्याची परवानगी देता. कृपया लक्षात घ्यावे की आपले डिव्हाइस कुकीज स्वीकारत नसल्यास आमच्या काही सेवा योग्यरित्या कार्य करणार नाहीत.
कुकीज, त्यांच्या सेटिंग्ज आणि आमच्या वेबसाइटवर त्या कशा वापरल्या जातात याबद्दल खालील तपशील पहा:
कुकीज म्हणजे काय?
आपण वेबसाइटला भेट देता तेव्हा, वेबसाइट सर्व्हर आपल्या वेब ब्राउझरवर, कॉम्प्युटरची सीपीयु मेमरी किंवा हार्ड डिस्कवर कुकी नावाची छोटीशी डेटा फाइल साठवतो. ब्राउझरच्या मेमरीमध्ये कुकी जतन करण्यासाठी एक छोटासा कोड वेब पेजवर इतर कोडसह जोडला जातो.
हे छोटेसे कोड आपल्या ब्राउझरमधील वेब पेज च्या लोडिंगदरम्यान काम करतात आणि ब्राउझरच्या मेमरीमध्ये कुकीज साठवतात. या कुकीज आपले लॅपटॉप, मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट, ऑपरेटिंग सिस्टम, ब्राउझर प्रकार आणि आवृत्ती, आपण भेट दिलेल्या साइट्स, साइटवर घालवलेला वेळ यासह आपण ब्राउझ करताना वेबसाइट कशी वापरता याबद्दल माहिती गोळा आणि संग्रहित करतात.
आपल्याबद्दल अशी संग्रहित केलेली माहिती एकत्रित करून इंटरनेटद्वारे वेबसाइट सर्व्हरवर परत पाठविली जाते आणि कुकी आयडेंटिफायर्सच्या समवेत तेथे संग्रहित केली जाते. डोमेनमध्ये एसएसएल प्रमाणपत्र असल्याने, माहिती सुरक्षित आणि कूटबद्ध पद्धतीने पाठविली जाते. या कुकीज मध्ये आपली वैयक्तिक ओळख होईल असा कोणताही डेटा गोळा केला जात नाही. अजून स्पष्ट शब्दात सांगायचे तर कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती (PII) किंवा इतर संवेदनशील डेटा, जसे की पेमेंट माहिती, या कुकीजद्वारे एकत्रित किंवा संग्रहित केली जात नाही. कुकीजद्वारे गोळा केलेला सर्व डेटा निनावी असतो कारण तो एकत्रित केलेला असतो. हा डेटा आपल्यासाठी वेबसाइट वैयक्तिकृत करणे, आपल्यासाठी प्रभावी ऑनलाइन नेव्हिगेशन सुलभ करणे, आपला ब्राउझिंग अनुभव सुकर करणे आणि आपली प्राधान्ये आणि लॉगिन माहिती जतन करणे यासह विविध गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो.
बँक ऑफ महाराष्ट्र वेबसाइट (bankofmaharashta.in) कुकीज का वापरते?
आमच्या वेबसाइटवर, आम्ही खालील कारणांसाठी फर्स्ट-पार्टी आणि/किंवा थर्ड -पार्टी कुकीज वापरतो:
- आमच्या वेबसाइटचा आपला वापर सुकर करण्यासाठी आणि आपले नेव्हिगेशन जलद आणि सोपे करण्यासाठी;
- आपल्याला काय उपयुक्त किंवा मनोरंजक वाटते ते जाणून घेण्यासाठी आणि आपला वापरकर्ता अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी;
- आमच्या वेबसाइटचे कार्य आणि ऑपरेशन सोपे करण्यासाठी;
- आमची वेबसाइट कशी वापरली जाते याचे मूल्यमापन करण्यासाठी आणि ती सर्वोत्तमपणे वापरता यावी यासाठी त्यात काय बदल करायचे हे निर्धारित करण्यासाठी;
- आमच्या वेबसाईट ला भेट देणाऱ्या संभाव्य ग्राहक यांच्या तसेच चालू खातेधारक यांच्या गरजा निर्धारित करणे आणि त्यांचा अंदाज लावणे आणि त्यासंदर्भात त्यांच्याशी विपणन आणि विक्री परस्परसंवाद तयार करण्यासाठी.
- आपल्यासाठी तयार केलेल्या आपल्या पसंती नुसारच्या इंटरनेट जाहिरातींसाठी.
कुकीज कशा व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात ?
बहुतेक सर्व वेब ब्राउझर आपल्याला त्यांच्या सेटिंग्ज पर्यायांद्वारे कुकीज व्यवस्थापित किंवा नियंत्रित करण्याची सुविधा देतात. वेबसाइट्सना कुकीज इन्स्टॉल करण्याची परवानगी नसल्यास एकूण वापरकर्ता अनुभव फारसा सुकर होणार नाही, कारण त्या आपल्या प्राधान्यांनुसार आपल्याला माहिती दिसणार नाही. याव्यतिरिक्त, ते सानुकूलित सेटिंग्ज आहेत, जसे की लॉगिन माहिती, ती ब्राउझरमध्ये जतन करता येणार नाही. इंटरनेट बँकिंग सारख्या सेवा वापरताना ग्राहकांची युझर क्रेडेन्शियल कधीही ब्राउझर/कुकीजमध्ये साठवू नयेत अशी शिफारस केली जाते.
घोषणा :
बँक ऑफ महाराष्ट्रची वेबसाइट ही Google Analytics वापरते, जी Google, Inc. ("Google") द्वारे प्रदान केलेली वेब विश्लेषण सेवा आहे. Google Analytics कुकीज वापरते ज्या छोट्या टेक्स्ट फाइल्स असतात ज्यात लहान प्रमाणात माहिती असते {यामध्ये कोणतीही वैयक्तिक संवेदनशील माहिती समाविष्ट नसते} जी आपल्याला वैयक्तिकृत ब्राउझिंग अनुभव देण्यासाठी आपण वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड केली जाते. कुकीज अनेक भिन्न कार्ये करतात, जसे की वापरकर्त्यांना पेजांवर कार्यक्षमतेने नेव्हिगेट करण्यासाठी मदत करणे, त्यांची प्राधान्ये लक्षात ठेवणे आणि सामान्यतः त्यांचा ब्राउझिंग अनुभव सुकर करणे. या कुकीज वापरकर्ते वेबसाइट कशी वापरतात याबद्दल माहिती विश्लेषणे गोळा करतात, उदाहरणार्थ अनेकदा भेट दिलेले पेज. थर्ड पार्टी कुकीजद्वारे संकलित केलेली सर्व माहिती एकत्रित केली जाते आणि म्हणून ती निनावी असते. आमच्या वेबसाइटचा वापर करून वापरकर्ते सहमत असतील त्या प्रकारच्या कुकीज त्याच्या/तिच्या डिव्हाइसवर ठेवल्या जाऊ शकतात. वापरकर्ता त्याच्या/त्यांच्या वेब ब्राउझर सेटिंग्ज बदलून या कुकीज अक्षम/हटवण्यास सक्षम आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र इतर कोणत्याही वेबसाइटद्वारे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसमध्ये ठेवलेल्या कुकीज आणि त्याद्वारे गोळा केलेल्या माहितीसाठी जबाबदार नाही.