आपणास नवे बँक खाते सुरू करायचे असल्यास आपण बचत खात्यापासून सुरुवात करू शकता, याचे कारण बचत करीत असता जी रक्कम आपले उद्दिष्ट काय आहे यावरुन वेगवेगळी असते, त्याचवेळी आपल्या खात्यातील रक्कम वाढत जावी अशी आपली अपेक्षा असते. बचत खाते ऑनलाईन सुरू करण्यासाठी, ऑनलाईन अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. आणि त्यासाठी लागणारा वेळ अगदी थोडा आहे.
विविध प्रकारच्या बचत खात्यांसांठी पुढे नमूद करण्यात आलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. संदर्भ आणि पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सादर करावी लागतात आणि बँकेच्या संदर्भासाठी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
वरीलप्रमाणे ओळखीचा पुरावा आणि पत्ता याचा उल्लेख एकाच कागदपत्रात असेल, तर त्यासाठी स्वतंत्र कागदपत्र आवश्यक नाही. .
खालीलप्रमाणे अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक असतील
वरील तपशिलाव्यतिरिक्त खाते उघडण्याचा फॉर्म, ग्राहकांच्या माहितीचा फॉर्म इत्यादी ज्यामध्ये संपूर्ण माहिती इ. पूर्णपणे भरलेली आणि आवश्यक त्या ठिकाणी अधिकार पत्र जोडणे आवश्यक आहे.
ओळखीचा पुरावा आणि प्रोपरायटर / पार्टनर्स / डायरेक्टर्स / ट्रस्टीज / प्राधिकृत अधिकारी इ. यांचे पत्ते केवायसी नियमानुसार सादर करणे आवश्यक आहे.
बँक खात्यामध्ये रोज जमा असलेल्या शिल्लक रकमेवर (दैनंदिन शिल्लक) तिमाही पद्धतीने वर्षाच्या शेवटी व्याज जमा करील.
सध्याचे व्याजदर माहिती करून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बचत खात्यावरील व्याजाचा हिशोब दैनंदिन तत्त्वावर केला जाईल. जर वर्षभर आपल्या खात्यात आपण अधिक रक्कम जमा ठेवली, तर वर्षाच्या शेवटी अधिक व्याज मिळेल.
बचत खात्यावरील व्याजाचा हिशोब करताना महिन्याच्या शेवटच्या तारखेला असलेल्या सरासरी रकमेला व्याजाच्या दराने गुणायचे.
मासिक आधारावर व्याज = रोजची शिल्लक (दिवसांची संख्या) व्याज (वर्षातील एकूण दिवस)
जर बचत केलेली रक्कम रुपये 5 लाख असेल आणि बचत खात्यावर व्याजाचा दर 2.75% प्रतिवर्षी असेल, तर हिशोब पुढीलप्रमाणे येईल.
5 लाख * 30 * (2.75/100) /365 = 1,130 दरमहा व्याज.
कोणी वैयक्तिक व्यक्ती स्वत: किंवा कोणाच्याही समवेत खाते उघडू शकेल.
अज्ञान बालकांचे बचत खाते एकत्रित पालक/कायदेशीर पालक यांच्यासह उघडता येईल.
अर्जदाराने खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये (वैयक्तिक व्यक्तींसाठी सीआयएफ) ओळखीचा पुरावा आणि निवासी पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन फोटो आणि पॅन नंबर / फॉर्म नंबर 60/61 इ. खाते उघडताना द्यावे.
जर ग्राहकाला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा देता येणे शक्य नसेल, तर बँकेचे समाधान करील अशा पद्धतीने विद्यमान खातेधारकाच्या शिफारशीने मात्र केवायसी प्रक्रियेच्या आधीन आणि बँकेत गेले सहा महिने ज्यांचे खाते व्यवस्थित सुरू आहे अशांच्या ओळखीने खाते उघडता येईल.
बचत खाते हे पैसे जमा करण्याचे असे साधन आहे का जे मूलभूत सुरक्षा, व्याजाचा दर आणि कोणत्याही क्षणी रकमेची उपलब्धता प्रदान करते. बचत खाती तातडीच्या गरजांसाठी पैसे जमा करण्यासाठी किंवा पुढील काळात आपणास दैनंदिन खर्चासाठी आवश्यक असलेली रक्कम उपलब्ध व्हावी याकरिता आहे.
मी एकत्रित खाते उघडू शकेन का? एकत्रित खाते उघडण्यासाठी कोण पात्र आहे.
कोणी व्यक्ती वैयक्तिक किंवा एकत्रित खाते उघडू शकते. एकत्रित खाते (जॉईट अकौंट) म्हणजे जे दोन किंवा अधिक व्यक्ती चालवू शकतात.
अज्ञान मुलांचे एकत्रित बचत खाते नैसर्गिक पालक/कायदेशी पालक यांच्यासमवेत सुरू करता येते.
आपण बँक ऑफ महाराष्ट्राकडे पुढे नमूद केलेल्या कोणत्याही पद्धतीने संपर्क साधू शकता.
या लिंकवर क्लिक करा Document Required
बचत खात्यात मासिक सरासरी किमान रक्कम असणे आवश्यक आहे. जर खात्यामध्ये मासिक सरासरी रक्कम नसेल तर लागू होणारा सेवा आकार दरमहा घेतला जाईल.
लागू होणाऱ्या सेवा आकाराची माहिती घेण्यासाठी क्लिक करा , Service Charges
आपल्या बचत खात्यावरील शिल्लक रकमेच्या व्याजाचा हिशेब दैनंदिन तत्त्वावर करण्यात येतो आणि दर तीन महिन्यांनी रक्कम खात्यात जमा होते.
दर तीन महिन्यांनी रक्कम किमान १ रु/- होते. त्याच वेळी जेव्हा ती जमा करण्यात येते.
आपल्या बचत खात्यातून पुढे दिलेल्या पद्धतीनुसार रक्कम हस्तांतरित करता येईल.
मोबाईल बँकिंग : कोणासही विनाकटकट, ‘‘महा मोबाईल ॲप प्लेस्टोअर/ॲपस्टोअर मधून आपल्या ओळखपत्राचा वापर करून मोबाईल बँकिंगसाठी आमच्या बँकेकडे नोंदणी करू शकता.
इंटरनेट बँकिंग : आपले खाते जिथे आहे तेथे आपण इंटरनेट बँकिंगसाठी अर्ज करू शकता. इंटरनेट बँकिंगवर यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर, त्वरित यूजर आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. वापरकर्त्यास इंटरनेट बँकिंगवर लॉगिंग करून ‘महासिक्युअर’ ॲप डाऊनलोट करता येईल.
होय. यशस्वीपणे आपले खाते उघडण्यात आल्यानंतर आपणास समक्ष किंवा आपल्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर रुपे/रुपे प्लॅटिनम/व्हिसा एटीएम कम डेबिट कार्ड मिळेल.
नही. आपल्या बचत खात्यामधून रक्कम काढताना कोणताही आकार लागू होत नाही.
प्रत्येक बचत खात्यावर विनंती केल्यानंतर किंवा अन्य पद्धतीने चेकबुक प्राप्त करता येते. चेकबुक आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येते.
नाही. पॅनकार्ड सक्तीचे नाही. ओव्हीडी म्हणजे स्वत:चे अधिकृत कागदपत्र म्हणून पॅनकार्ड सादर कसे सूज्ञपणाचे आहे. अन्यथा कोणाकडे करणे सूज्ञपणाचे आहे. अन्यथा कोणाकडे पॅनकार्ड नसल्यास फॉर्म 60/61 अंतर्गत त्यास प्रतिज्ञापत्र सादर करता येईल.
प्रत्यक्ष बँक शाखेत न जाता आपल्या खात्यातील शिल्लक जाणून घेण्याचे विविध मार्ग मार्ग आहेत.
होय. आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यात येणारे ऑनलाईन अकाऊंट स्टेटमेंट विनामूल्य आहे.
बचत खाते कॅल्क्युलेटरमध्ये बचत व्याजदराची गणना स्पष्ट करण्यासाठी आणि बचत खात्यातील व्याजाची गणना करण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:
मासिक आधारावर व्याज = दैनिक शिल्लक * (दिवसांची संख्या) * व्याज / (वर्षातील दिवस)
जर गुंतवलेली रक्कम ₹ 5 लाख असेल आणि बचत खात्यावरील व्याज दर प्रति वर्ष 2.75% असेल, तर गणना होईल:
5 लाख * 30 * (2.75/100) / 365 = ₹1,130 दरमहा व्याज