Azadi ka Amrit Mahatsav

प्रधानमंत्री स्ट्रीटव्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजना

अनुक्र.मापदंडमार्गदर्शक तत्त्वे
1योजनापीएम स्वनिधी (पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी)
2फायदे  
  1. खेळत्या भांडवलासाठी रु. १०,००० पर्यंतचे कर्ज
  2. नियमित परतफेडीला प्रोत्साहन
  3. डिजिटल व्यवहारांसाठी बक्षीसे
3लाभार्थी२४ मार्च २०२० रोजी किंवा त्यापूर्वी नागरी भागात विक्री करण्यात गुंतलेले सर्व फेरीवाले. योजनेंतर्गत नागरी स्थानिक संस्था (यूएलबी) / नगर विक्री समिती (टीव्हीसी) लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम करतील.
4लाभार्थ्यांचे पात्रता निकषनागरी भागात २४ मार्च २०२० रोजी किंवा त्यापूर्वी विक्री करण्यात गुंतलेल्या सर्व फेरीवाल्यांकरिता ही योजना उपलब्ध आहे. पात्र फेरीवाल्यांची ओळख खालील निकषांनुसार पटवली जाईल:
  1. नागरी स्थानिक संस्थांनी (यूएलबी) दिलेले विक्री करण्याचे प्रमाणपत्र / ओळखपत्र ताब्यात असलेले फेरीवाले.
  2. सर्वेक्षणात ओळखले गेलेले परंतु विक्री करण्याचे प्रमाणपत्र / ओळखपत्र दिले गेले नाही, असे फेरीवाले. यूएलबीमार्फत अशा विक्रेत्यांसाठी विक्रीचे तात्पुरते प्रमाणपत्र तयार केले जाईल. यूएलबीने अशा विक्रेत्यांना विक्री करण्याचे कायमस्वरूपी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र त्वरित आणि सकारात्मकतेने एका महिन्याच्या कालावधीत देणे अपेक्षित आहे.
  3. यूएलबीने केलेल्या ओळख सर्वेक्षणातून वगळले गेलेले किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केली आहे आणि ज्यांना यूएलबी / नगर फेरीवाला समितीने (टीव्हीसी) शिफारस पत्र दिले आहे, असे फेरीवाले.
  4. यूएलबीच्या भौगोलिक मर्यादेमध्ये विक्री करणारे आणि यूएलबी / टीव्हीसीने शिफारस पत्र (एलओआर) दिले आहे, असे आसपासच्या विकसित भागातील/ नागरी परीसीमेतील / ग्रामीण भागातील विक्रेते
5वित्तपुरवठ्याचे ठरीव प्रमाणनागरी फेरीवाले रू.१०,०००/- पर्यंतचे खेळते भांडवल (डब्ल्यूसी) कर्ज घेण्यासाठी पात्र असतील.
6व्याजदरRLLR* + १.४५%+ BSS (०.५०) म्हणजेच सध्याचा प्रभावी दर ७.०५ + १.४५ + ०.५० = ९.००% आहे.
*रेपो निगडित कर्ज दर - परिवर्तनशील
7व्याज अनुदानया योजनेंतर्गत कर्ज घेणारे लाभार्थी ७% दराने व्याज अनुदान मिळण्यास पात्र आहेत.
8कार्यकाळखेळते भांडवल मुदत कर्ज (डब्ल्यूसीटीएल) कर्ज एक वर्षाच्या मुदतीसह आणि मासिक हप्त्यांमध्ये परत केले जातील.
9विलंबावधीकोणताही विलंबावधी नाही (शून्य)
10परतफेड१२ समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड.
11मार्जिनशून्य
12सुरक्षा ठेवयोजनेंतर्गत वित्तपुरवठा केलेला माल / मालमत्ता यांचे तारणगहाण.
13योजनेची वैधताव्याज अनुदान ३१ मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध आहे, त्यामुळे योजनेची वैधता ३१.०३.२०२२ पर्यंत आहे.
14डिजिटल व्यवहारांसाठी कॅश बॅक प्रोत्साहनखालील निकषांनुसार लाभार्थ्यांना रु. ५०/- ते रू.१००/- पर्यंतच्या मासिक कॅशबॅक* ने प्रोत्साहन दिले जाईल :
  • एका महिन्यात ५० पात्र व्यवहार करण्यासाठी: रू. ५०/-
  • एका महिन्यात पुढील ५० अतिरिक्त पात्र व्यवहार केल्यास: रू.२५/- (म्हणजे १०० पात्र व्यवहारांपर्यंत पोहचल्यावर लाभार्थ्याला रु. ७५ मिळतील).
  • पुढील १०० किंवा अधिक पात्र व्यवहार केल्यास: रू.२५/- (म्हणजे २०० पात्र व्यवहारांपर्यंत पोहोचल्यास लाभार्थ्याला रु. १००/- मिळतील).
येथे पात्र व्यवहाराचा अर्थ किमान रु. २५/- चे डिजिटल पेआउट किंवा पैसे मिळणे आहे.
*जास्तीत जास्त रू. १२००/- च्या अधीन
15रुपे कार्डया योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एलएएफमध्ये नमूद केलेल्या बचत खात्याशी जोडलेले रुपे कार्ड मिळेल.
16प्रक्रिया शुल्कशून्य
17आगाऊ भरणा शुल्कशून्य