1 | नाव | - ‘इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस)’ (यापुढे उल्लेख ‘‘योजना’’) याचे एकंदर चार भाग असतील.
i. ईसीएलजीएस-१.० : ही योजना बँकेने अशा पात्र कर्जदारांसाठी तयार केलेली कर्जाची योजना आहे. ज्यांच्या कर्जाची येणे बाकी रक्कम (फक्त रकमेवर आधारित) ही कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांचे कर्ज मिळून २९ फेब्रुवारी २०२० रोजी रु. ५० कोटींपर्यंत आणि ६० दिवसांपर्यंत इतकी आहे, त्यांच्यासाठी आहे. ii. ईसीएलजीएस-२.० सदरची योजना कामत कमिटी ऑन रिझोल्युशन फ्रेमवर्क यांनी त्यांच्या ०४.०९.२०२० रोजी दिलेला अहवाल आणि हेल्थकेअर सेक्टर ज्यांच्या येणे असलेल्या कर्जाची थकबाकी (फक्त निधीवर आधारित) ही सर्व वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्जे धरून २९ फेब्रुवारी २०२० रोजी अनुक्रमे रु. ५० कोटींपेक्षा अधिक आणि रु ५०० कोटींपेक्षा अधिक नाहीत व ६० दिवसांपर्यंत थकित आहेत, अशा एकंदर २६ सेक्टर्ससाठी (परिशिष्ट-१. मध्ये दिल्याप्रमाणे) बँकेने त्यांच्या कर्जदारांना दिलेल्या पात्र कर्जसुविधेस बँकेस १००% हमी देण्याच्या संदर्भात आहे. iii. ईसीएलजीएस-३.० : ही सुविधा हॉस्पिटॉलिटी, ट्रॅव्हल ॲण्ड टूरीझम, लेशुअर ॲण्ड स्पोटिंग ॲण्ड सिव्हील एव्हिएशन (शेड्यूल ॲण्ड नॉन शेड्यूल्ड एअरलाईन्स, चार्टर्ड प्लाईट ऑपरेटर्स एअर अँब्युलन्सेस ॲण्ड एअरपोर्टस) सेक्टर्ससाठी आहे. ज्यांची ६० दिवसांची मुदत २९.०२.२०२० रोजी संपली आहे, त्यांना पात्र कर्जसुविधेसाठी बँकांना १००% हमी प्रदान करण्याबाबत आहे. iv. ईसीएलजीएस-४.० : ही सुविधा पात्र हॉस्पीटल्स/नर्सिंग होम्स/मेडिकल कॉलेजेस यांना ऑन-साईट ऑक्सीजन प्रोड्यूसिंग प्लँट्स तयार करण्यासाठी पात्र कर्जसुविधेकरिता बँकांना १००% हमी प्रदान करण्याच्या संदर्भात आहे. - सदरची कर्जाबाबतची हमी ही ज्या योजनेअंतर्गत पुरविण्यात येत आहे त्याचे ‘‘गॅरेंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाईन (जीईसीएल) असे नामकरण करण्यात येईल.’’
|
2 | हेतू | - कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर ही योजना आहे. संकटाच्या पार्श्वभूमीवर ही योजना आहे. त्याद्वारे अतिरिक्त निधी उपलब्ध होतो, ज्याद्वारे एंटरप्रायझेस/आणि पीएमएमवाय कर्जदार यांना त्यांचे दैनंदिन कार्यचालन देण्याचे व्यवहार पूर्ण करून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सहाय्यभूत होईल.
- २९ फेब्रुवारी २०२० रोजी ज्यांचे कर्ज थकित आहे अशा पात्र कर्जदारांना जीईसीएल मदतीकरिता १००% हमी अतिरिक्त मुदत कर्ज/खेळते भांडवल मुदत कर्ज (ईसीएलजीएस १.०, २.० आणि ३.० आणि ४.० अंतर्गत) आणि/किंवा निधी- व्यतिरिक्त सुविधा (ईसीएलजीएस २.० आणि ४.० अंतर्गत) पुरविण्यासाठी ही योजना आहे.
|
3 | सुविधेचे स्वरूप | ईसीएलजीएस १.० आणि ३.० अंतर्गत ईसीएलजीएस २.० आणि ४.० अनुसार - खेळते भांडवल मुदत कर्ज
- निधी-विरहित सुविधा
- निधी आणि निधी-विरहित दोन्हीचा समावेश असलेल्या योजना.
|
4 | पात्र कर्जदार | - ईसीएलजीएस १.० नुसार पात्र कर्जदार
- सर्व बिझनेस एंटरप्रायझेस/एमएसएमईज/ वैयक्तिक व्यक्ती ज्यांनी उद्योगासाठी कर्ज घेतले आहे आणि ज्यांची एकंदर येणे बाकी (निधीवर आधारित फक्त)
- या योजनेअंतर्गत पात्र ठरण्यासाठी कर्जदाराचे खाते २९ फेब्रुवारी २०२० नंतर ६० दिवसांएवढे किंवा त्यापेक्षा कमी दिवसांचे हवे.
- ईसीएलजीएस २.० अंतर्गत पात्र कर्जदार
- कामत कमिटी ऑन रिझोल्युशन फ्रेमवर्क (सोबत परिशिष्टात आहे) यांनी निश्चित केलेल्या २६ सेक्टर्समधील सर्व उद्योग आणि हेल्थकेअर सेक्टर ज्यांना औद्योगिक कारणांसाठी कर्ज रक्कम (फक्त निधीवर आधारित) कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांच्या बाबतीत दि २९.०२.२०२० रोजी रु. ५० कोटींपेक्षा अधिक आणि रु. ५० कोटींपेक्षा अधिक नाही.
- ईसीएलजीएस २.० अंतर्गत पात्र ठरण्यासाठी कर्जदारांची खाती किंवा २९ फेब्रुवारी २०२० रोजी ६० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची असणे आवश्यक आहे.
- ईसीएलजीएस ३.० अंतर्गत पात्र कर्जदार
- सर्व बिझनेस एंटरप्रायझेस/एमएसएमईज हॉस्पिटॅलिटी (हॉटेल्स, रेस्टारंट्स, मॅरेज हॉल्स, कॅन्टीन्स इ) ट्रॅव्हल ॲण्ड टूरीझम, लेसीयर, ॲण्ड स्पोटिंग ॲण्ड सिव्हील ऑव्हिएशन (शेड्यूल ॲण्ड नॉन शेड्यूल्ड एअरलाईन्स ॲण्ड एअरपोर्ट्स) सेक्टर्स ज्यांची २९.०२.२०२० रोजीची कर्ज रक्कम ६० दिवसांपर्यंत आहे.
- ईसीएलजीएस ४.० अंतर्गत पात्र कर्जदार
- ३१ मार्च २०२१ रोजी देणे असलेली कर्जाची रक्कम ९० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी देणे आहे अशी हॉस्पीटल्स/नर्सिंग होम्स/ क्लिनिक्स/मेडिकल कॉलेजेस आणि ज्यांना प्रेशर स्विंग ॲडस्पोर्शन इत्यादी कमी खर्चाची यंत्रसामुग्री ऑक्सीजन निर्मितीसाठी बसवायची आहे आणि ज्यांना रु. २ कोटींपर्यंत कर्ज हवे आहे, त्यांच्यासाठी परंतु, या संदर्भात एक अपवाद करण्यात
- आला परंतु, या संदर्भात एक अपवाद करण्यात आला आहे की ज्यांची क्रेडिट कार्ड/सेव्हिंग्ज अकौंट्स/ करंट अकौंट्स यांवरील देणे बाकी या योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेच्या १५% पेक्षा अधिक नसेल आणि सदरची येणे बाकी रक्कम या योजनेअंतर्गत नियमित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बँक असे निश्चित करील की कर्जाची अधिकची रक्कम बँकेकडून योग्य त्या प्रक्रिया पूर्ण करुन सुव्यवस्थित करण्यात आली आहे.
- यो योजनेच्या हेतूसाठी ‘‘बिझनेस एंटरप्रायझेस,/एमएसएमईज यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत (पीएमएमवाय) कर्जांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
- ‘हमीचे कवच’ याचा अर्थ प्रत्येक पात्र कर्जदारास त्यास कर्ज देणाऱ्या संस्थेकडून देण्यात आलेल्या कर्जाच्या थकबाकीसाठी कवच. या योजनेसाठी हमीचे कवच हे कर्ज रकमेच्या बाकी असलेल्या रकमेसाठी आहे.
|
5 | मदतीचे परिमाण | - ईसीएलजीएस १.० अंतर्गत
- पात्र कर्जदारांना अतिरिक्त खेळत्या भांडवलाच्या स्वरुपात देण्याच्या मुदत कर्ज सुविधेची रक्कम ही त्यांच्या देणे अर्ज कर्जरकमेच्या २० टक्के (निधीवर आधारित फक्त) ही २० फेब्रुवारी २०२० रोजी रु. ५० कोटींपर्यंत असावी.
- ईसीएलजीएस २.० अंतर्गत
- पात्र कर्जदारांना देण्यात यावयाची जीईसीएल कर्जाची रक्कम ही एकतर अतिरिक्त खेळते भांडवल मुदत कर्ज आणि/किंवा निधी-विरहित सुविधा अथवा दोनही, ही रक्कम कर्जदार अन्य सर्व निकष पूर्ण करीत असेल तर २० फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या देय असलेल्या रु. ५०० कोटींपर्यंतच्या रकमेच्या २०% (निधी-आधारित फक्त) एवढी असेल.
- ईसीएलजीएस २.० अंतर्गत कर्जसुविधा ही निधीवर आधारित किंवा निधी-विरहित सुविधा किंवा दोन्हीचे एकत्रीकरण असेल.
- ईसीएलजीएस ३.० अंतर्गत
- पात्र कर्जदारांना जीईसीएल कर्जसुविधेची रक्कम ही अतिरिक्त खेळते भांडवल मुदत कर्ज सुविधा जी त्यांच्या एकंदर देणे रक्कमेच्या ४०% (निधीवर आधारित) प्रत्येक कर्जदारासाठी रु. २०० कोटींच्या मर्यादेच्या आणि कर्जदार अन्य सर्व निकष पूर्ण करीत आहे या अधीन असेल.
- अशा पात्र कर्जदारांपैकी, जे ईसीएलजीएस ३.० अंतर्गत पात्र आहेत आणि ज्यांनी सदर लाभ ईसीएलजीएस १.० अंतर्गत किंवा ईसीएलजीएस २.० अंतर्गत घेतलेला आहे ते त्यांच्या २९.०२.२०२० रोजी असलेल्या थकित कर्जरकमेच्या २०% एवढ्या अतिरिक्त कर्ज प्राप्त करण्यासाठी पात्र ठरतील.
- ईसीएलजीएस ४.० अंतर्गत
- पात्र कर्जदारांना देण्यात यावयाची कर्जाची रक्कम ही निधीवर आधारित (मुदत कर्ज) किंवा निधी-विरहित (कॅपिटल गुड्स आयातीसाठी एलसी) सुविधा असेल आणि प्रत्येक कर्जदारासाठी त्याला रु. २.०० कोटींची मर्यादा असेल.
- ही कर्जाची रक्कम प्रत्यक्ष जागेवर कमी खर्चाचे ऑक्सीजन प्लँट्स उभारणीसाठी असेल.
- एकंदर भांडवल कर्ज, मुदत कर्ज आणि डब्ल्यू सीटीएल कर्ज इत्यादी कर्जांची ताळेबंदानुसार बाकी असलेली रक्कम ताळेबंदाव्यतिरिक्त आणि निधी-विरहित रक्कम वगळण्यात येईल.
|
6 | मुदत | - ईसीएलजीएस १.० अंतर्गत : जीईसीएल अंतर्गत डोअर टू डोअर पुरविण्यात आलेल्या कर्जाची मुदत कर्जाचा पहिला हप्ता स्वीकारल्यापासून चार वर्षांसाठी असेल.
- ईसीएलजीएस २.० अंतर्गत : निधी-आधारित रकमेबाबत जीईसीएल अंतर्गत डोअर टू डोअर पुरविण्यात आलेल्या कर्जाचा पहिला हप्ता स्वीकारल्यापासून कर्जाची मुदत पाच वर्षांसाठी असेल किंवा निधी-विरहित सुविधेच्या तारखेपासून जी आधीची आहे ती असेल. मंजूर करण्यात आलेल्या निधीविरहित हमीच्या संरक्षणासाठी, निधीच्या पहिला वापर ३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्याआधी करण्यात येणे आवश्यक आहे.
- ईसीएलजीएस ३.० अंतर्गत :जीईसीएल अंतर्गत डोअर टू डोअर पुरविण्यात आलेल्या सुविधेची मुदत कर्जाचा पहिला हप्ता घेतल्यापासून सहा वर्षांची असेल.
- ईसीएलजीएस ४.० अंतर्गत : जीईसीएल अंतर्गत पुरविण्यात आलेल्या सुविधांची मुदत व निधीवर आधारित रकमेसाठी कमाल पाच वर्षांसाठी असेल आणि निधी विरहित रकमेसाठी पहिला हप्ता प्रदान केल्यानंतर, जी आधीची आहे ती असेल निधीवर आधारित सुविधेसाठी कर्ज प्रदान करण्याची आणि निधी-विरहित सुविधेसाठी एलसी प्रदान करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ असेल.
|
7 | मुदतवाढ | - निधीवर आधारित मूळ रकमेवरील एक वर्षाची परतफेडीची मुदतवाढ जीईसीएल कर्जावर ईसीएलजीएस १.० आणि २.० साठी १ वर्षाची आणि ईसीएलजीएस ४.० अंतर्गत निधीवर आधारित भागासाठी सहा महिन्यांची असेल, या काळासाठी व्याज द्यावे लागेल.
- ईसीएलजीएस ३.० अंतर्गत जीईसीएल सुविधेअंतर्गत कर्जदारांना मूळ रकमेवर (फक्त निधीवर आधारित) दोन वर्षांची मुदतवाढ मिळेल, ज्या कालावधीत व्याज देय असेल.
|
8 | वितरण आणि परतफेड | - या योजनेअंतर्गत पात्र कर्जदाराचे खाते मंजुरी/वितरण या दिवशी एनपीए असू नये.
- निधीवर आधारित सुविधेसाठी या योजनेअंतर्गत (ईसीएलजीएस १.०, ईसीएलजीएस २.० ईसीएलजीएस ३.० आणि ईसीएलजी एस ४.०) वितरणाची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०२१ आहे.
- निधी-विरहित सुविधांसाठी कोणतीही शेवटची तारीख नाही. जसे की, या योजनेअंतर्गत एखाद्या विशिष्ठ कर्जदारास असलेली हमी ईसीएलजीएस २.०० अनुसार कर्जदाराने कर्जाचा वापर केल्याच्या पहिल्या तारखेपासून ५ वर्षांनी किंवा ३१ डिसेंबर २०२६ रोजी, यापैकी जे आधी असेल त्या तारखेस संपेल, त्यामुळे बँकेच्या शाखांनी त्यांची निधी-विरहित सुविधेची देणी कमी होत जातील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- आगाऊ कर्जफेड केल्यास कोणत्याही प्रकारची प्री-पेमेंट पेनल्टी नाही.
- मुदतवाढीच्या कालावधीत, व्याज देय असेल.
- कर्जाच्या मूळ रकमेची ईसीएलजीएस १.० अंतर्गत मासिक हप्त्यांमध्ये, ईसीएलजीएस २.० आणि ३.०० अंतर्गत ४८ मासिक हप्त्यांमध्ये आणि ईसीएलजीएस अंतर्गत कमाल ५४ मासिके हप्त्यांमध्ये मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर करावयाची आहे.
- सदरची सुविधा कर्जदारास संधी अशी मानण्यात येईल आणि आरबीआय यांच्या धोरणानुसार निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृती करण्यात येईल.
|
9 | मार्जीन | - ईसीएलजीएस अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जासाठी काही नाही, परंतु सध्याच्या कर्जमर्यादेसाठी मंजूर करण्यात आलेल्या अटींनुसार ठरवण्यात येईल.
- ईसीएलजीएस २.० च्या संदर्भात निधी-विरहित सुविधेकरिता मार्जीनची रक्कम सध्याच्या निधी विरहित सुविधेप्रमाणे राहील.
- जर, सध्या कोणत्याही प्रकारची निधी-विरहित सुविधा नसेल तर २५% मार्जीन द्यावे. (ईसीएलजीएस २.० मधील निधी न दिलेल्या भागासाठी फक्त)
|
10 | व्याजाचा दर/निधी-विरहित सुविधेसाठी कमिशन | व्याजाचा दर ईसीएलजीएस १.०, ईसीएलजीएस २.० आणि ईसीएलजीएस ३.० साठी. - एमएसएमईज
- आरएलएलआरशी संलग्न व्याजाचा किमान दर ७५% आणि कमाल ९.२५% पर्यंत (या कर्जसुविधेच्या संपूर्ण कालावधीसाठी)
- नॉन-एमएसएमईज
- एमसीएलआर+प्रत्येक प्रकरणानुसार मंजुरी देणाऱ्या प्राधीकरणाकडून नक्की केल्यानुसार ०.२०% ते १% या दरम्यान (या कर्जसुविधेच्या संपूर्ण कालावधीकरिता किमान व्याजदर ७.५% आणि कमाल ९.२५% या दराच्या अधीन)
ईसीएलजीएस ४.० करिता - आरएलएलआर/एमसीएलआर शी संलग्न कमाल दर ७.५%
- व्याज जेव्हा लागू होईल त्यावेळी आकारण्यात येईल.
- विहित वेळेत कर्जाचे हप्ते आणि व्याज जमा करण्यात आले नाही तर बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दंड आकारण्यात येईल.
- सध्या देण्यात आलेल्या कर्जाच्या संदर्भात करण्यात आलेल्या करारनाम्यातील काही अटींची पूर्तता झाली नसेल तर व्याजावर दंड आकारण्यात येणार नाही.
निधी-विरहित सुविधांवरील कमिशन: - सध्याच्या निधी-विरहित सुविधांसाठी सध्याच्या मंजुरीनुसार कमिशन आकारले जाईल.
- निधी-विरहित सुविधा नव्याने मंजूर करण्यात आल्यास सेवा कराच्या संदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार.
|
11 | तारण | - ईसीएलजीएस १.० किंवा २.० किंवा ३.० किंवा ४.० अंतर्गत ज्या कर्जसुविधा देण्यात आल्या आहेत, त्यावरील अतिरिक्त डब्लूसीटीएल किंवा निधी-विरहित सुविधा या सध्या कॅश फ्री (परतफेडीसह) च्या संदर्भात, त्यासह या योजनेअंतर्गत ज्या सुविधा ३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी किंवा एनपीएच्या तारखेस जे आधी असेल त्यानुसार असतील.
- रु. २५ लाखांपर्यंतच्या सर्व कर्जांच्या (२९ फेब्रुवारी २०२० रोजी असलेली येणे बाकी अधिक जीईसीएल अंतर्गत मंजूर कर्ज) या संदर्भात सेकंड चार्जची अट रद्द करण्यात आली आहे, मात्र ही बाब एनसीजीटीसी वरील व्याजाबाबत बँकेने हमी घेण्याच्या अटीच्या अधीन आहे. कोणत्याही हमीची मुदतवाढ किंवा अन्य नवा हमी यामुळे या योजनेनुसार एनसीजीटीसी यांच्याकडून प्राप्त झालेली कोणतीही हमी रद्द ठरवेल.(संदर्भ : सोबत जोडलेले एफक्यू, क्यू- ५६)
|
12 | अतिरिक्त हमी | या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची संयुक्त वा अतिरिक्त हमी मागितली जाणार नाही. |
13 | योजनेची वैधता | सदरची योजना अशा सर्व कर्जांकरिता लागू होईल जी कर्जे जीईसीएल अंतर्गत या मार्गदर्शक सूचना एनसीजीटीसी यांनी लागू केल्याच्या तारखेपासून ३०.०९.२०२१ पर्यंत किंवा रु. ३,००,००,००० कोटी रुपयांच्या रकमेसाठी हमी जारी करीपर्यंत (ईसीएलजीएस १.०, २.०, ३.० आणि ४.० धरून) यापैकी जी तारीख आधीची असेल तो पर्यंत लागू राहील. या योजनेअंतर्गत (ईसीएलजीएस १.०, ईसीएलजीएस २.०, ईसीएलजीएस ३.० आणि ईसीजीएलएस ४.०) अंतर्गत निधीवर आधारित सुविधेअंतर्गत कर्जपुरवठा करण्याची अखेरची तारीख ३१ डिसेंबर २०२१ असेल. निधी-विरहित मंजूर सुविधेचा वापर ५ वर्षांच्या कालावधीत करता येईल, पण त्यासाठी ईसीएलजीएस २.० अंतर्गत कर्जसुविधेच्या पहिल्या हप्त्याचा विनियोग ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी केलेला असणे आवश्यक ईसीएलजीएस ४.० अंतर्गत निधी-विरहित संपूर्ण सुविधा (कॅपिटल गुड्स आयात करण्यासाठी एलसी) ३१.१२.२०२१ पूर्वी वापरणे आवश्यक आहे, ती त्यानंतर अस्तित्वात आली तरी हरकत नाही. (संदर्भ-सोबत एफएक्यू- १२३) |
14 | हमीची व्याप्ती | - दि नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (एनसीजीटीसी) यांच्याकडून एनपीएच्या दिवशी येणे असलेल्या रकमेवर किंवा दावा केल्याच्या तारखेस असलेल्या रकमेवर यापैकी जी कमी असेल त्यावर १००% हमी प्रदान करील.
- एनसीजीटीसीकडून कर्जाची हमी ही विनाअट आणि मागे घेता येणार नाही, अशा प्रकारची असेल.
- सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र कर्जदाराच्या संदर्भातील तपशील बँकेने यंत्रणेत नोंद केला की सदरच्या यंत्रणेकडून त्या संदर्भातील हमी आपोआप मंजूर होईल आणि आपोआप संदर्भ क्र. आणि क्रेडिट गॅरंटी क्रमांक बँकेला प्राप्त होईल त्याचा वापर बँकेकडून पुढील संदर्भासाठी करण्यात येईल.
- ज्या ठिकाणी वैयक्तीक कर्जाचा विषय असेल जेथे मूळचे कर्ज व्यावसायिक कारणासाठी होते असे प्रमाणपत्र व्यवस्थापन देईत त्या व्यतिरिक्त अन्य वेळी हमीकरता अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आवश्यक नाहीत.
|
15 | हमीकरिता मूल्य | या योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या हमीसाठी कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. |
16 | प्रक्रिया शुल्क | नाही |
17 | आगाऊ परतफेडीसाठी आकार | नाही |
18 | कागदपत्रांसाठी/अन्य आकार | बँकेच्या सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार |