Beti Bachao Beti Padhao

मालमत्ता खरेदीसाठी कर्ज

मालमत्ता खरेदीसाठी कर्ज

सुविधेचा प्रकार

कृषी मुदत कर्ज (एटीएल)

हेतू

कॉफी, चहा, रबर, वेलची, काजू, मिरपूड, नारळ इ. पारंपरिक पिके उगवणाऱ्या मालमत्तेची खरेदी.

पात्रता

  • खरेदीदाराकडे उत्पन्न देणारी संपत्ती असावी आणि खरेदी करण्याच्या प्रस्तावित मालमत्तेचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता असावी.
  • आधीचे समाधानकारक व्यवहार
  • अनुभवी, आर्थिकदृष्ट्या सक्षम, मार्जीन रक्कम आणण्याची आणि कर्ज परतफेडीस समर्थ.
  • खरेदीदाराने संबंधित राज्य सरकारचे निकष पूर्ण केले पाहिजेत.
  • मालमत्ता पूर्णपणे दुर्लक्षित असलेली असावी.
  • खरेदी करण्याची जमिनीसह एकूण धारित जमीन संबंधित राज्यांच्या जमीनधारणेच्या मर्यादेत असावी.

रक्कम

१, २ आणि ३ पेक्षा कमी

१) बाजार मूल्य

२) राज्याने निश्र्चित केले आहेत ते गायडन्स रेट/सर्कल रेट

३) विक्रीसाठी आवश्यक ते मार्जीन अधिक स्टँप ड्युटी आणि नोंदणी आकार राखून ठेवून खरेदीच्या किंमतीएवढी.

जास्तीत जास्त २० लाख रुपये .

मार्जीन

मार्जीन रक्कम मालमत्तेच्या खरेदी रकमेच्या खरेदी रकमेच्या किंवा मालमत्तेच्या

मूल्याच्या ५०% असेल.

व्याज दर

रु. १०.०० लाखांपर्यंत          : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%

सुरक्षा

प्राथमिक :

१) खरेदी करावयाची मालमत्ता तारण

२) शेतात/मालमत्तेवर उगवलेल्या पिकांचे सांपत्वक गहाणतारण

संयुक्त:

१) विद्यमान जमीन मालमत्तेचे गहाणतारण शक्यतो निवासी मालमत्तेसह प्राप्त केलेले असावे.

मात्र कोणत्याही प्रकरणात तर तारण संपत्तीचे मूल्य कर्जाच्या रकमेच्या २००% पेक्षा कमी नसावे.

परतफेड

७ ते ९ वर्षे

विशिष्ट प्रकरणांमध्ये मालमत्तेच्या आवश्यकतेनुसार आणि फेरउभारणीच्या कालावधीनुसार ते २० वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकते.

कर्जाच्या

प्रस्तावासाठी

सादर करण्याची

आवश्यक

कागदपत्रे / दाखले .

  • जमीन धारणेच्या व खरेदी करण्याच्या भूखंडाच्या भूमी अभिलेखांच्या प्रती, संबंधित महसूल अधिकाऱ्यांद्वारे प्रमाणित.
  • जमीन मालमत्ता आणि खरेदी करावयाच्या जमिनीच्या संदर्भातील टायटल आणि अन्य कागदपत्रे.
  • करार केला असल्यास विक्री करायची प्रत किंवा विक्रेत्याकडून प्रस्तावाचे पत्र.
  • खरेदी करावयाच्या आणि सध्याच्या जमिनीतील पिकांचा इतिहास.
  • सूचीमधील मूल्यांकनाने दिलेला खरेदी करावयाच्या किंमतीबाबतचा अहवाल.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदार :-

  • कर्जासाठी अर्ज
  • सर्व ७/१२,८ ए, ६ डी तपशील, अर्जदाराच्या जमिनीच्या चतु:सीमा
  • पीएसीएससह वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे कोणतेही थकीत अन्य संबंधित प्रमाणपत्र.
  • १.६० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी जमीन तारण ठेवणे आहे त्याचा बँकेच्या पॅनेलच्या वकिलांकडून कायदेशीर शोध घेणे.
 

जामीनदार ( १ . ६० लाख रुपयांच्या कर्जासाठी ) :-

  • जामीनदारीसाठी अर्ज
  • सर्व ७/१२,८ अ आणि पीएसीएसच जामीनदाराचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.

अर्ज करा