Azadi ka Amrit Mahatsav

अधीनस्थ कर्ज (सीजीएसडी) कर्ज हमी योजना

अ.क्र.प्रमापक / मापदंडमार्गदर्शक सूचना
1नावया योजनेला 'डिस्ट्रेस्ड असेट्स फंड-सबॉर्डिनेट डेट फॉर स्ट्रेस्ड एमएसएमईज्' असे नाव देण्यात आलेले आहे आणि ज्या क्रेडिट प्रॉडक्टसाठी या योजनेंतर्गत हमी दिली जाईल, त्याला 'क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर सबॉर्डिनेट डेट (सीजीएसएसडी) असे नाव दिले जाईल.
2उद्देश
 • एमएसएमईज्च्या पुनर्रचनेसंदर्भात सब-डेटला समर्थन देण्यासाठी सीजीएसएसडीला हमीची व्याप्ती (गॅरंटी कव्हरेज) पुरविणे.
 • ९०% हमीची व्याप्ती ही योजेनेतून/ट्रस्टकडून (सीजीटीएमएसई) दिली जाईल आणि उर्वरित १०% ही संबंधित प्रवर्तकांकडून दिली जाईल.
 • संकटात असलेल्या एमएसएमई ॲडव्हान्सच्या पुनर्रचनेसाठी आरबीआईच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुनर्रचनेस पात्र असलेल्या व्यवसायांमध्ये इक्विटी/क्वासी इक्विटी म्हणून संकटात असलेल्या एमएसएमईज्च्या प्रवर्तकांना बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज देणे हा ह्या योजनेचा उद्देश आहे.
3या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले एमएसएमईएमएसएमई युनिट्स जसे - वैयक्तिक/प्रोप्रायटरशिप, एलएलपी, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा नोंदणीकृत कंपनी हे या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यास पात्र आहेत.
4सुविधेचे स्वरूपमुदतीचे कर्ज
5कालावधी / योजनेची वैधतासीजीएसएसडी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्व पतसुविधांना, हमीचा लाभ घेतलेल्याच्या तारखेपासून किंवा ३१ मार्च २०२१ पासून, यापैकी जे लवकर असेल, तेव्हापासून १० वर्षांच्या अधिकतम कालावधीसाठी किंवा २०,००० कोटी रुपये एवढ्या रकमेची हमी मंजूर होईपर्यंत ही योजना लागू होईल.
6कर्जदारांसाठी पात्रतेचे निकष
 1. ज्या एमएसएमईज्ची खाती ३१.०३.२०१८ रोजी स्टँडर्ड असतील आणि स्टँडर्ड खाती म्हणून किंवा एनपीए खाती म्हणून आर्थिक वर्ष २०१८-१९ आणि आर्थिक वर्ष २०१९- २०च्या दरम्यान नियमितपणे चालवली जात असतील, त्या सर्व खात्यांना ही लागू असेल.
 2. या प्रस्तावित योजनेत फसवणूक/मुद्दाम कुचराई केलेल्या खात्यांचा विचार केला जाणार नाही.
 3. एमएसएमई युनिट्सच्या प्रवर्तकांना वैयक्तिक कर्ज दिले जाईल. एमएसएमई हे प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा नोंदणीकृत कंपनी, इत्यादी असू शकतात.
 4. ही एमएसएमई युनिट्ससाठी वैध असतील जी दिनांक ३०.०४.२०२० रोजी संकटात असतील, म्हणजेच एसएमए-२ आणि एनपीए खाती असतील, ती आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या पुस्तकांनुसार पुनर्रचना करण्यास पात्र असतील.
7अर्थपुरवठ्याचे प्रमाणशेवटच्या लेखापरीक्षित ताळेबंदानुसार एमएसएमई युनिट्सच्या प्रवर्तकांना त्याच्या/तिच्या एमएसएमई संस्थेतील १५% हिश्श्यापर्यंत (इक्विटी अधिक डेट) किंवा ७५ लाख रुपयांपर्यंत, यापैकी जे कमी असेल, तेवढी पतसुविधा देण्यात येईल.
8व्याजदरप्रस्तावित सुविधेसाठी लागू असलेला व्याजदर हा युनिटला सध्या मिळत असलेल्या सुविधेएवढा असेल (सीजीएसएसडीकरिता व्याजदर हा आरएलएलआरवर आधारित असेल)
9या योजनेंतर्गतच्या पतसुविधेचा कालावधी
 1. हमी प्राप्त केल्याच्या तारखेपासून किंवा ३१ मार्च २०२१ पासून, जो पहिला असेल तो, कमाल १० वर्षांचा कालावधी.
 2. मुद्दल रकमेवर ७ वर्षांचा (कमाल) मोरॅटोरिअम असेल. ७व्या वर्षापर्यंत, फक्त व्याज भरले जाईल.
 3. या सुविधेवरील व्याज नियमितपणे (जेव्हा आणि जसे लागू केले जाईल तसे) भरावे लागेल आणि मुद्दल रक्कम ही सुविधेसाठी मोरॅटोरिअम पूर्ण झाल्यानंतर मंजूर केलेल्या कालावधीमध्ये भरावी लागेल.
 4. कोणताही अतिरिक्त आकार/दंड न आकारता कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यास कर्जदाराला परवानगी देण्यात आलेली आहे.
10मोरॅटोरिअममुद्दल रकमेच्या परतफेडीवर ७ वर्षांचा मोरॅटोरिअम (कमाल) असेल. परंतु व्याज जेव्हा लागू केले जाईल तेव्हा त्याचा भरणा करावा लागेल.
11परतफेड
 1. व्याज - वितरण केल्यानंतर जेव्हा आणि जसे लागू केले जाईल तसे.
 2. मुद्दल रक्कम - मोरॅटोरिअमचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, मुद्दल रक्कम कर्जाच्या कालावधीमध्ये (मंजूर केल्यानुसार) परतफेड मुद्दल समान विभागून केलेल्या (पीईडी) हप्त्यांमध्ये भरावी लागेल.
12मार्जिन रक्कमसीजीएसएसडी सुविधेच्या १०%
13तारणअशा प्रकारे मंजूर करण्यात आलेल्या सब-डेट सुविधेचा विद्यमान सुविधेअंतर्गत वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तांवर, सब-डेट सुविधेच्या संपूर्ण कालावधीदरम्यान २रा अधिकार असेल.
14हमी शुल्क
 1. हमी दिलेल्या रकमेवर थकबाकीच्या आधारे दरसाल १.५०%.
 2. हमीचे शुल्क कर्जदारांना सोसावे लागेल.
 3. कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थेने ट्रस्टला एकदा दिलेले हमी सेवाशुल्क हे परत न मिळणारे असेल.
 4. हमी सेवाशुल्क परत न मिळणारे असेल, फक्त विशिष्ट परिस्थितीचा अपवाद करता, जसे:
  1. जास्तीचे पैसे भरले गेल्यास
  2. एकाच पोर्टफोलिओसाठी एकापेक्षा अधिक वेळा पैसे भरले असल्यास.
15हमीच्या रकमेची व्याप्ती
 1. या योजनेंतर्गत बँकेने दिलेल्या पतसुविधेवर ९०% हमीची व्याप्ती ही सीजीटीएमएसई यांच्याकडून दिली जाईल आणि उर्वरित *१०% संबंधित प्रवर्तकांकडून भरले जाईल.
 2. हमीच्या रकमेवर मर्यादा नसेल आणि ती विनाअट आणि मागे न घेता येणारी असेल.
16विमाशून्य
17प्रक्रिया शुल्कअस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार
18मुदतपूर्व परतफेडीसाठी आकारशून्य
19कागदपत्रांसाठी/इतर आकारअस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार