Beti Bachao Beti Padhao

डिजिटल बँकिंग युनिट (DBU)

व्यक्तिगत, वापरकर्ता अनुकूल, असलेला परंपरागत व डिजिटल बँकिंग मिश्रित अनुभव घेण्यासाठी डिजिटल बँकिंग विभागासोबत नव्या जमान्यातील बँकिंगमध्ये प्रविष्ट व्हा.

वित्तीय व्यवहार हे व्यक्तिगत आणि गुंतागुंतीचे असतात आणि बँकिंग व्यवहारात मानवी संवादाची अनेकदा गरज असते. हे डिजिटल व्यवहारांशी जोडण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय रिझर्व बँकेने डिजिटल बँकिंग विभाग सुरु केले आहेत. डिजिटल वित्तपुरवठ्याला मानवी चेहेरा देण्यासाठी भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत सरकारने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापण्याचे प्रस्तावित केले आहे.

आपली बँक खालील तीन ठिकाणी डिजिटल बँकिंग युनिट्स सक्रीयतेने परीचालीत करीत आहे.

क्रम संख्या जिल्हा राज्य
1सातारामहाराष्ट्र
2छत्रपती संभाजी नगरमहाराष्ट्र
3पुणेमहाराष्ट्र

1. डिजिटल बँकिंग युनिट (DBU) म्हणजे काय ?

डिजिटल बँकिंग युनिट हा एखाद्या परंपरागत बँक किंवा स्वतंत्र एकल डिजिटल बँकेतील एक विशेषीकृत विभाग असून बँकेच्या विविध डिजिटल बँकिंग योजना व सेवा यांचे विकसन, कार्यान्वयन व प्रशासन करण्यावर या विभागाचे लक्ष केंद्रित केलेले असते. वेगाने उत्क्रांत होत जाणाऱ्या वित्तीय परिप्रेक्ष्यात स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि प्रक्रिया स्त्रोत्ररेखीत करून ग्राहकांना बँकिंग व्यवहार करण्याचा आनंददायी अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे डिजिटल बँकिंग विभागाचे प्राथमिक उद्दिष्ट असते. परंतु डिजिटल बँकिंग विभागाने फक्त तंत्रज्ञानाचा वापर करून न थांबता बँकेच्या डिजिटल योजना व सेवांच्या बाबत ग्राहकांना व्यक्तिगत पाठबळ देण्यासाठी सहायक फलिकांची सुविधा देऊ केली आहे.

2. डिजिटल बँकिंग विभागाने कोणत्या सेवा देऊ केल्या आहेत ?

बँक ऑफ महाराष्ट्रच्या डिजिटल बँकिंग विभागाने व्यापक स्तरावर सेवा देऊ केलेल्या आहेत :

  • ऑनलाईन बचत खाते सुरु करून तत्काळ डेबिट कार्ड जारी करणे
  • ए टी एम
  • मुदत / आवर्ती ठेव योजनांचे व्याजदर व शीघ्र गणक
  • रोकड जमा व पुनर्चक्रण यंत्र
  • सामिकृत मासिक हप्ता शीघ्रगणक
  • धनादेश पुस्तिकेसाठी विनंती अर्ज
  • विविध कर्ज योजनांसाठी कर्ज अर्ज व पुरोगती व्युत्पन्नता संस्थळ
  • पत पत्र ( क्रेडीट कार्ड ) जारी करणे
  • इंटरनेट बँकिंग
  • डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड रद्दबातल करणे
  • खातेपुस्तिका छापणे
  • गाऱ्हाणे निवारण प्रणाली
  • फास्ट टॅग सेवा
  • संपत्ती व्यवस्थापन
  • बिजाकांचे प्रदान
  • शासकीय योजनांमध्ये नावनोंदणी

3. डिजिटल बँकिंग विभागात मी कोणत्या प्रकारचे खाते सुरु करू शकतो ?

डिजिटल बँकिंग विभागात एखादी व्यक्ती मुलभूत बचत बँक खाते सुरु करू शकते. यामध्ये सुगम व अभिगम्य बँकिंग सेवा देऊ केल्या असून वापरकर्त्याला सहजगत्या वापरता येतील अशा वित्तीय सेवांचे संरेखन करण्यास डिजिटल बँकिंग विभाग कटिबद्ध आहे.

4. बचत खाते उघडण्यासाठी कोणकोणते दस्तऐवज आवश्यक आहेत ?

बचत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड व स्थायी खाते संख्या ( PAN ) कार्ड आवश्यक आहे. तसेच खातरजमा करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकाशी जोडणी केलेले आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

5. खाते उघडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो ?

ग्राहकाकडे सर्व दस्तऐवज असल्यास डिजिटल बँकिंग विभागात मुलभूत बचत खाते उघडण्यासाठी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.

6. डिजिटल बँकिंग विभागास दस्तऐवजांच्या छापील प्रती सादर करणे आवश्यक आहे काय ?

डिजिटल बंकिंग विभागास दास्तैवाजांच्या छापील प्रती सादर करण्याची आवश्यकता नाही.

7. डिजिटल बँकिंग विभागाकडे मी धनादेश पुस्तिकेसाठी अर्ज सादर करू शकतो काय ?

होय ग्राहक डिजिटल बँकिंग विभागाकडे धनादेश पुस्तिकेसाठी अर्ज करू शकतो. यामध्ये डिजिटल पद्धतीने अर्ज करणे अनुस्यूत असून गरज असलेल्या धनादेश पृष्ठांची संख्या व त्याचे वितरण करण्याचा पत्ता यांची पुष्टी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर धनादेश पुस्तिका धाडण्यात येईल.

8. डिजिटल बँकिंग विभागात सुरक्षित जमा कक्ष सेवा देऊ करण्यात आल्या आहेत काय ?

नाही, डिजिटल बँकिंग विभागात सुरक्षित जमा कक्ष सेवा उपलब्ध नाहीत

9. डिजिटल बँकिंग व्यवहार करताना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत ?

डिजिटल व्यवहार सुरक्षित पद्धतीने होण्यासाठी मजकूर सांकेतिक रीतीने लिपीबद्ध (encryption) करणे, बहुस्तरीय अधिप्रमाणन इत्यादीसह डिजिटल बँकिंग विभाग भक्कम सुरक्षितता नियमावलीचे अनुपालन करत असतो.

10. डिजिटल बँकिंग विभागातील डिजिटल बँकिंग सेवांसाठी काही सेवाशुल्क आकारले जाते काय ?

सेवेशी संबंधित शुल्काच्या अधिक तपशीलासाठी आमच्या सेवा शुल्क पृष्ठास भेट द्यावी

11. डिजिटल बँकिंग विभागामध्ये मी कर्जासाठी अर्ज करू शकतो काय ?

होय कर्ज अर्जाचा तपशील व्युत्पन्न करण्यासाठी पर्याय उपलब्ध असून पुढील कार्यवाहीसाठी बँकेची चमू ग्राहकाशी संपर्क साधेल. तसेच गणकाच्या माध्यमातून ग्राहकांना कर्जावरील समिकृत मासिक हप्त्याची माहिती घेता येईल. डिजिटल बँकिंग विभागात चारचाकी वाहन व निवृत्ती वेतन धारकांसाठी महा आधार कर्जाची त्वरित प्रक्रिया आम्ही देऊ करीत आहोत.

12. PMSBY, PMJJBY & APY योजनेत मला सहभागी व्हायचे असल्यास मी डिजिटल बँकिंग विभागाकडे अर्ज करू शकतो काय ?

प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना , प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना व अटल निवृत्ती वेतन योजनेत आपण महामोबाईल उपयोजनाच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. तसेच उपरोक्त योजनांसाठी आपण डिजिटल बँकिंग विभागाकडे देखील अर्ज करू शकता.

13. डिजिटल बँकिंग विभागाकडून आणखी अतिरिक्त डिजिटल योजना / सेवा देऊ केल्या आहेत ?

  • व्हॉट्स अप बँकिंग (Send 'Hi' to 70660 26640)
  • भ्रमणध्वनी बँकिंग ( अधिक तपशीलासाठी https://bankofmaharashtra.in/maha-mobile या संकेतस्थळाला भेट द्यावी )

14. डिजिटल बँकिंग विभागात खाते उताऱ्याची छपाई शक्य आहे काय ?

ग्राहक आपल्या बँक खात्याचा उतारा व्युत्पन्न करून त्याची सोफ्ट प्रत प्राप्त करू शकतात.

15. डिजिटल बँकिंग विभागा मी नामनिर्देशन करू शकतो काय ?

डिजिटल बँकिंग विभागात ऑनलाईन खाते उघडताना आपण नामनिर्देशनाची नोंदणी करू शकता.

16. डिजिटल बँकिंग विभागात बचत खाते उघडल्यास मला ए टी एम कार्ड देखील मिळेल काय ?

डिजिटल बँकिंग विभागात उघडलेल्या बचत खात्यांवर ए टी एम कार्ड देखील जारी करण्यात येतात.

17. डिजिटल बँकिंग विभागात मी मृत्यूदावा कसा दाखल करू शकतो ?

मयत दावा निपटारा प्रणाली सुविधेत ऑनलाईन अर्ज सादर करून (https://bankofmaharashtra.in/dcss_app/main_menu.aspx) किंवा मयत दावा अर्ज नोंदणी करून मृत्यू दावा सादर करता येईल.

DBU
लोकमंगल, MH

 
DBU Lokmangal

नकाशा स्थान पहा

डिजिटल गॅलरी,
बाणेर, MH

 
Digital Gallery, Baner

नकाशा स्थान पहा

DBU
सातारा, MH

 
DBU Satara

नकाशा स्थान पहा

DBU
संभाजीनगर,MH

 
DBU Sambhajinagar

नकाशा स्थान पहा