Azadi ka Amrit Mahatsav

लोक बचत योजना

उद्देश

"बँकेत खाते उघण्यासाठी "पिरॅमिडच्या खालच्या" (कमी उत्पन्न गट) मधील लोक सक्षम करण्यासाठी .ह

हे खाते कोण उघडू शकतो:

दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) श्रेणीमध्ये येणारी कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावावर किंवा संयुक्तपणे हे खाते उघडू शकते.संयुक्त खातेदार देखील दारिद्र्यरेषेखालील श्रेणी मध्ये असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अल्पवयीन व्यक्ती देखील खाते उघडण्यासाठी पात्र असतील.

दारिद्र्यरेषेखालील गटातील अज्ञान व्यक्तीही हे खाते उघडण्यास पात्र असतात.ग्राहक बँकेच्या समाधानानुसार ओळखीचा आणि पत्त्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा देऊ शकत नसल्यास केवायसी पध्दतीचा पूर्णपणे अवलंब केलेल्या आणि गेल्या सहा महिन्यांमध्ये खात्यांचे व्यवहार समाधानकारक केलेल्या सध्याच्या खातेधारकाची ओळख देऊन खाते उघडता येईल. त्यासाठी अट एकच आहे की त्याच्या सर्व खात्यांमधील एकत्रित शिल्लक वर्षभरात रु. ५०,०००/- पेक्षा जास्त आणि क्रेडिट सारांशही रु.१ लाखापेक्षा जास्त नसावी.

प्रारंभिक रक्कम:

कोणत्याही रकमेने खाते उघडता येऊ शकते. ती रक्कम कमीत कमी रु. १/- (फक्त रु.१/-) असू शकते.

इतर महत्त्वाचे निकष: •

  • या योजनेसाठी किमान शिलकीचा निकष लागू नाही. यामुळे कमीत कमी शिल्लक नसल्यास कोणतेही सेवा शुल्क खात्यातून वळते केले जात नाही.
  • १० पृष्ठांची एक धनादेश पुस्तक मोफत दिले जाईल.
  • तृतीय पक्षाच्या धनादेशांचे संकलन करण्याची परवानगी नाही.
  • बाहेरगावच्या धनादेशांचे संकलन, डीडी / एमटी / टीटीएचे सामान्य शुल्कासाठी अनुज्ञेय करणे.
  • व्हिसा / आईएनएसटीए एटीएम-कम-डेबिट कार्डची कार्यक्षमता या योजनेसाठी नवीन आणि सध्याच्या खातेदारांसाठी उपलब्ध आहे.

व्याज दर :

सर्वसाधारण बचत खात्यांना लागू असतात त्याप्रमाणेच नेहमीच्या बचत खात्यांना लागू असलेले इतर सर्व निकष या योजनेलाही लागू असतात.शिथिल केलेले केवायसी निकष या योजनेला लागू असतात.