Beti Bachao Beti Padhao

डिजिटल सायनेज सिस्टीम

बॅकिंग क्षेत्राच्या संदर्भात बाजारपेठेत होत असलेले बदल आणि अपेक्षा याकडे बँकेचे अर्थातच लक्ष आहे, त्यामुळेच सरकारी क्षेत्रातील बँक असून ही परंपरागत पद्धती बाजूला ठेवून बँकेने आधुनिक ग्राहकाभिमुख व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारला आहे. आजचा काळ असा आहे की ज्या काळात वेगाने  नव्या सेवा सुरू करणे, कार्यक्षमता वाढवणे, जोखीम कमी करून त्यांचे योग्य व्यवस्थापन करून ग्राहकांना लवचिक, व्यापक आणि नाविन्यपूर्ण कामकाज पद्धती देणे ही गरज आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बँकेने अगदी दूरवर सेवा देणारे डिजिटल मीडिया साईनेज (डीएमएस) सोल्युशन; ज्यामध्ये इंटिग्रेटेड क्यू मॅनेजमेंट सोल्युशन (क्यूएमएस) बँकेच्या सर्व शाखा आणि कार्यालये या ठिकाणच्या संपर्काच्या गरजा/हेतू लक्षात घेऊन बसविले आहेत. ज्यायोग विस्तृत सेवा देण शक्य झाले आहे.

सदर डिजीटल मीडिया साईनेज (डीएमएस) सोल्युशन या यंत्रणेमुळे बँकेच्या विविध योजनांची, माहिती, व्याजाचे दर, इत्यादी बँकेच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांना पाहता यावेत यासाठी फलकावर दर्शविण्यास सक्षम आहे.

शाखांमध्ये असलेल्या स्क्रीजवर क्यू मॅनेजमेंट सिस्टीम (क्यूएमएस)च्या माध्यमातून टोकन नंबर दाखविण्याची यंत्रणा यामध्ये आहे.

         

इंटिग्रेटेड क्यू मॅनेजमेंट सिस्टीम (क्यूएमएस)ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

​​

  • टोकन नंबर पडल्यावर दिसणे आणि लोकांना ऐकता येणे यासाठी बँकेच्या शाखांमधील रांगांच नियंत्रण मध्यवर्ती/विस्तारित क्यू मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे (एक किंवा अनेक) करणे.
  • या यंत्रणेमध्ये मध्यवर्ती अशा स्वरूपाची ग्राहकांनी निवडलेल्या सेवेकरिता टोकन प्रिन्टिंग सुविधा असेल, त्याचप्रमाणे या यंत्रणेमध्ये ग्राहकांना टोकन नं. काऊंटर नंबर आणि प्रतीक्षेचा कालावधी इत्यादी एसएमद्वारे कळविण्याची सुविधा आहे.
  • प्राधान्य देण्याच्या ग्राहकांना प्राधान्याने सेवा देण्याची सुविधा.
  • या यंत्रणेमध्ये ज्या टोकनधारकांना सेवा देण्याची येत आहे आणि जे प्रतीक्षा यादीत आहेत त्यांचे टोकन क्रमांक स्क्रीनवर आणि श्राव्य माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची सुविधा आहे.
  • एखाद्या विशिष्ठ काऊंटरवर ग्राहकाचा नंबर आला की त्याला त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविता येते.
  • कोणत्याही खिडकीवर ग्राहक आल्यावर तेथील कर्मचाऱ्यास सदर ग्राहकाचा टोकन नंबर, ग्राहकाचा प्रकार, कोणता व्यवहार करणे आहे, प्रतीक्षेचा कालावधी दत्यादी माहिती पाहता येते. या यंत्रणेत तेथील कर्मचाऱ्यास त्याच्या समोरील स्क्रीनवर टोकन व्यवस्थापन डॅशबोर्ड म्हणजे फलक पाहता येईल, त्याद्वारे त्यास विविध पर्याय जसे की टोकन पाहिले, सेवाकार्य समाप्त झाले, किंवा टोकन वगळणे/पुढे पाठविणे इत्यादी.
  • टोकनधारकास सेवा देत असताना किती टोकन आली आणि त्यासाठी खर्च झालेला वेळ यासंदर्भात एमआयएस अहवाल (सेवेनुसार/टेलरनुसार) तयार होईल, आणि दिवसाचे काम संपताना आलेल्या ग्राहकांची संख्या, कस्टमर मिक्स, ट्रॅन्झॅक्शन मिक्स आणि वेगवेगळ्या सेवांसाठी आवश्यक असलेला सर्वसाधारण कालावधी हेही यातून स्पष्ट होईल.