Beti Bachao Beti Padhao

Whatsapp बँकिंग

ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेने अतिरिक्त सेवा वितरण चॅनल म्हणून “WhatsApp बँकिंग” सेवा सुरू केली आहे. बँकेचे बिगर-ग्राहक देखील या सेवेचा लाभ घेऊ शकतात. बँकेच्या 70660 36640 या क्रमांकावर WhatsApp वर ‘Hi’ असा मेसेज संभाषण करू शकता. Whatsapp बँकिंगच्या मदतीने बँक आपल्या ग्राहकांना अनेक सेवा पुरवू शकते, जसे की खात्यातील शिल्लक (बॅलन्स) ची चौकशी, मिनी-स्टेटमेंट, चेक बुक विनंती, चेकच्या सद्यस्थिति ची चौकशी, बँकेचे एटीएम आणि शाखा शोधणे, काही सेवा सुरू करणे, किंवा रद्द करणे, बँकेबरोबर संपर्क साधणे इत्यादी. या सुविधेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे स्पष्ट केली आहेत

1. ठळक वैशिष्ट्ये :

  1. बँकिंग सेवा कधीही कुठेही २४X७
  2. ग्राहकांना मोफत सेवा
  3. एंड टू एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित सेवा
  4. ग्राहक थेट बँकेकडून अलर्ट, संदेश, सूचना, ऑफर, इत्यादी प्राप्त करू शकतात
  5. सेवांची निवड करण्याची, किंवा निवड रद्द करण्याची सोपी यंत्रणा
  6. इमोजी, स्टिकर्स, वीडियो, फोटो, पीडीएफ, इ. सारख्या रिच मीडिया च्या मदतीने संभाषण करण्याची सुविधा.
 

2. ऑफर केलेल्या सेवा :

Whatsapp बँकिंग सुविधेद्वारे बँकेने आत्ता खालील सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

  1. तुमच्या खात्यातील शिल्लक जाणून घ्या
  2. ग्राहक आयडी जाणून घ्या
  3. मिनी स्टेटमेंट मिळवा
  4. जवळच्या बँकेच्या एटीएम किंवा शाखेची माहिती मिळवा.
  5. नवीन चेकबुकची विनंती
  6. चेकबुकची सद्य स्थिती तपासा
  7. सेवांची निवड करणे, किंवा निवड रद्द करणे
  8. बँकेबरोबर संपर्क साधणे
 

बँकेचे बिगर-ग्राहक खालील सेवांचा लाभ घेऊ शकतात : -

1. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडा

2. जवळच्या बँकेच्या एटीएम किंवा शाखेची माहिती मिळवा

 

ही सेवा वापरण्याची प्रक्रिया खलीलप्रमाणे:

  1. Whatsapp वर बँकिंग सुविधा सक्रिय करण्यासाठी, ग्राहकांनी त्यांच्या फोनच्या संपर्क यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा Whatsapp क्रमांक 7066036640 सेव्ह करणे आवश्यक आहे.
  2. बँकेच्या Whatsapp सोल्यूशनशी संवाद साधण्यासाठी ग्राहकाने Hi असा मेसेज पाठवून संभाषण सुरू करावे.
  3. ग्राहकाने त्यांच्या मोबाईल नंबरवरून केलेल्या विनंतीच्या आधारे बँकेशी असलेले त्यांचे संबंध ओळखले जातात आणि त्यानुसार त्यांना सेवांचा लाभ घेण्यासाठीच्या अटी व शर्ती दाखविल्या जातील.
  4. ग्राहकाने Whatsapp बँकिंगच्या अटी व शर्तींना स्वीकृती दिल्यास पुढील सेवा दिल्या जातील.
  5. उपलब्ध सेवांचा पर्याय देणारा एक संदेश ग्राहकांना दिसेल आणि पुढे त्यातील हवे ते पर्याय निवडून ग्राहक त्यांचे बँकिंग ऑपरेशन्स त्वरित सुरू करू शकतात.
 

व्हिडिओ ट्युटोरियलसाठी येथे क्लिक करा (Whatsapp बँकिंग | बँक ऑफ महाराष्ट्रसह स्मार्ट बँकिंग)

 

कनेक्ट करण्यासाठी क्लिक करा