Azadi ka Amrit Mahatsav

कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी (एलजीसीसीएएस) कर्ज हमी योजना

. क्र.

निकष

वैशिष्ट्ये

1.

लक्ष्य गट

आरोग्य सेवा क्षेत्रात पुढे नमूद केल्यानुसार प्रकल्पांची उभारणी किंवा आधुनिकीकरण/विस्तार

 1. रुग्णालये/दवाखाने/चिकित्सालये/वैद्यकीय महाविद्यालये/रोगनिदान प्रयोगशाळा/ रोगनिदान केंद्र
 2. लस/प्राणवायू/व्हेंटिलेटर/प्राधान्याची वैद्यकीय उपकरणे यांच्या निर्मितीसाठी सुविधा
 3. सार्वजनिक आरोग्यसेवा सुविधा
2.

पात्र कर्जदार

सध्या अस्तित्वात असलेली युनिट्स : ज्यांना पात्र असलेले प्रकल्प विस्तारित/अन्य क्षेत्रात घ्यावयाचे आहेत/उभारायचे आहेत किंवा मेट्रॉपॉलिटिन शहरांव्यतिरिक्त अन्य भागांमध्ये पात्र प्रकल्पांची उभारणी करावयाची आहे ती मेट्रोपॉलिटिन शहरे म्हणजे अहमदाबाद, बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली आणि पुणे शहर यांचे महानगरपालिका क्षेत्र.

3.

पात्रता निकष

या योजनेअंतर्गत पात्रता निकष पुढीलप्रमाणे-

 • कर्जाची एकंदर गरजेची रक्कज रु. १०० कोटींपर्यंत (निधीआधारित किंवा निधी विरहित सुविधेवर आधारित)
 • प्रकल्प नॉन-मेट्रोपॉलिटिन क्षेत्रात निर्माण होणारा असावा.
 • वैयक्तिक पातळीवर देण्यात येणाऱ्या कर्जाचा या योजनेत समावेश असणार नाही.
4.

योजनेचा कालावधी

ही योजना ७ मे २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या कर्जांकरिता असेल किंवा या मुदतीपर्यंत रु. ५०,००० कोटींपर्यंत या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कर्जहमीसाठी या पैकी जी तारीख आधी असेल तिथपर्यंत असेल.

5.

सुविधेचे स्वरुप

मुदत कर्ज, कॅश क्रेडिट, बँक गॅरंटी, लेटर ऑफ क्रेडिट.

6.

कर्जाची रक्कम

निधी किंवा निधिव्यतिरिक्त कर्ज या दोन्हीच्या एकत्रित

 • किमान रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक
 • कमाल रु. १००.०० कोटींपर्यंत
7.

मार्जीन

 • मुदत कर्ज- २५%
 • कॅश क्रेडिट- २५% (स्टॉक्स) येणे रकमेवर ४०% कव्हर कालावधी ९० दिवस.
 • बीजी/एलसी- २५%

मार्जीनचा आढावा घेता येईल- मुदत कर्जाच्या आणि बीजी/एलसीच्या संदर्भात १५% आणि कॅश क्रेडिट १५% (स्टॉक्स), येणे रकमेच्या संदर्भात २५% आणि कव्हर पीरियड ९० दिवस- पुढे नमूद केल्याप्रमाणे केसेससाठी.

 • जी रुग्णालये रोख रकमेची नोंद करण्याकरिता एस्क्रो खाते ठेवण्याचे मान्य करतील त्यांच्यासाठी.
 • ज्या उत्पादकांकडे सरकार/रुग्णालये यांच्याकडून खरेदी करण्याचा करार आहे आणि जे एस्क्रो खाते ठेवण्याचे मान्य करतील त्यांच्यासाठी.
8.

व्याजाचा दर

एमएसएमई युनिट्ससाठी

 • आरएलएलआरशी संलग्न : आरएलएलआर+०.५०+०.५५% (सध्याचा लागू असलेला दर ६.९०%+०.५०+०.५५%=७.९५%)

नॉन-एमएसएमई युनिट्ससाठी

 •  एमसीएलआर.शी संलग्न: एक वर्ष एमसीएलआर +०.६५%(सध्याचा लागू असलेला दर ७.३०%+०.६५%=७.९५%)

टीप: गॅरंटी कव्हर प्राप्त होईपर्यंत व्याजाचा दर ७.९५% असेल म्हणजे कर्जाचा पहिला हप्ता देण्यात आल्यापासून कमाल ५ वर्षांपर्यंत व्याजाच्या दराचा आढावा कर्ज मंजूर करणारे प्राधिकारी/शाखा व्यवस्थापक यांच्याकडून गॅरंटी कव्हरची मुदत संपल्यानंतर घेण्यात येईल. (बँकेच्या गॅरंटीबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार त्या वेळी असलेल्या कर्जाच्या रकमेच्या संदर्भात)

9.

या योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी

 1. कॅश क्रेडिट: वार्षिक नूतनीकरण मागणीनुसार परतफेड
 2. मुदतीचे कर्ज
 • मुदतवाढीच्या कालावधीसह कमाल कालावधी १० वर्षे. रुग्णालये/नर्सिंग होम/क्लिनिक इत्यादीसाठी मुदतवाढीचा कमाल कालावधी १८ महिने. (फक्त संसाधनांच्या खरेदीच्या संदर्भात ६ महिने)
 • परतफेड समान हप्त्यांमध्ये किंवा त्या युनिटमध्ये जमा होणाऱ्या रोख रकमेवर आधारित हप्त्यांमध्ये करता येईल.
10.

प्राथमिक तारण

एलजीएससीएसच्या माध्यमातून जी मालमत्ता तयार होईल/तयार होणार असेल त्यावर बँकेचा पहिला अधिकार राहील. परंतु, एससीजीटीसी यांचा या योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या मालमत्तेवर (ग्रीनफिल्ड वा ब्राऊनफिल्ड या दोन्हीच्या अंतर्गत) दुसरा अधिकार असेल. या संदर्भातील बोजा सध्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या नुसार तयार करण्यात येईल.

11.

दुय्यम तारण

ज्याला सरफेसी लागू होईल अशा प्रकारचे किमान २५% दुय्यम तारण तयार करणे आवश्यक.

ज्या स्थितीत, दुय्यम तारण निर्माण केलेले आहे अशा वेळी ज्याला संरक्षण नाही अशा उर्वरित रकमेच्या संदर्भात हमी प्रदान करण्यात येईल.

12.

हमीचे स्वरूप

हा संपूर्ण कर्जपुरवठा (दुय्यम सुरक्षेव्यतिरिक्त) एजजीएससीएएस अंतर्गत देण्यात येत असून तो एनसीजीटीसी यांच्याकडून या योजनेअंतर्गत कर्ज हमी सुरक्षा या खाली देण्यात येईल ; या बाबत तपशील पुढीलप्रमाणे :

 1. ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी : एकूण कर्जाच्या ७५%
 2. ब्राऊनफिल्ड प्रकल्पासाठी : एकूण कर्जाच्या ५०%
 3. ज्या जिल्ह्यांना प्रकल्प उभारायचा आहे त्यांच्यासाठी: एकूण कर्जाच्या ७५%
13.

सुरक्षा हमीचा कालावधी

या योजनेअंतर्गत सुरक्षा हमी कर्जाचा पहिला हप्ता प्रदान केल्यापासून कमाल ५ वर्षांपर्यंत उपलब्ध आहे.

 • ब्राऊनफिल्ड प्रकल्पांसाठी- व्यापारी कामकाजासाठी (डीसीसीओ) सुरक्षा हमी हे कामकाज सुरू केल्यानंतर २ वर्षांसाठी,
 • कर्जाचा पहिला हप्ता प्रदान करण्यात आल्यानंतर हमी कालावधी ५ वर्षांपर्यंत असेल याच्या अधीन. परंतु अशा प्रकरणांमध्ये व्यापारी कामकाज २ वर्षांच्या शेवटी सुरू झाले तर, हमी आणखी 2 वर्षांपर्यंत उपलब्ध असेल.
14.

हमीसाठी आकार

नाही

15.

सर्व सेवा आकार

सेवा आकाराबाबत सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार

16.

योजनेची वैधता

या योजनेअंतर्गत मंजुरी ३१.०३.२०२२ पर्यंत वैध राहील. परंतु कर्ज प्रदान करण्याचे काम प्रकल्पाच्या गरजेनुसार कर्ज मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांकडून निश्चित करण्यात आल्याप्रमाणे.