Azadi ka Amrit Mahatsav

-गॅजेटस्:

बंच नोट ॲक्सेप्टर (बीएनए) रीसायकलर; हा पेमेंट इंडस्ट्रीमध्ये नाविन्यपूर्ण असा शोध आहे. बीएनए चा समावेश ग्राहकांना त्यांच्या बँकेत न जाता त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी करण्यात आला आहे. बीएनए कामाच्या ठिकाणी अथवा अन्यत्र बसवता येऊ शकते. बीएनए ठेवीदारांकरिता ही यंत्रणा कार्यरत करून बँक आता बीएनए रीसायकलर्सची संकल्पना आणत आहे. अशी यंत्रे रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी वापरता येऊ शकतात.

  1. बँकेने अशी फ्रंट लोडिंग सुविधा असलेली १०० रिअल टाईम बंच नोट ॲक्सेप्टर यंत्रे बसविले आहेत.
  2. बंच नोट ॲक्सेप्टर ५०, १००, ५०० आणि २००० च्या नोटा स्वीकारू शकतो.
  3. बँच नोट ॲक्सेप्टरकडे नोटांचा स्वीकार खात्यात जमा करण्यासाठी करताना त्या नोटांची सत्यता ऑनलाईन पद्धतीने तपासण्याची क्षमता आहे.
  4. बीएमकडे बनावट नोटा शोधून बाजूला काढण्याची क्षमता आहे.

कॅश रीसायक्लर; हे यंत्र बीएमए (बंच नोट ॲक्सेप्टर आणि कॅश डिस्पेंन्सर (एटीएम) अशा प्रकारे नोटा स्वीकारणे आणि देणे अशी दोनही कामे करते. कॅश रीसायकक्लर हा पेमेंट इंडस्ट्रीत एक नाविन्यपूर्ण शोध असून ग्राहकांना एकाच मशीनमध्ये रक्कम जमा करणे आणि काढणे या दोनही सुविधा उपलब्ध होतात. रीसायक्लर हे कॅश रीसायक्लिंग मशीन असून ते ग्राहकांकडून जमा करण्यासाठी रक्कम स्वीकृत करणे आणि तीच रक्कम एटीएम कार्डस्/डिपॉझिट कार्डस्द्वारे काढूनही घेता येते. यामुळे बँकेच्या शाखांमध्ये रोख रक्कम हाताळण्याचे काम कमी होते.

बँकेने १७ सप्टेंबर २०१८ रोजी म्हणजे बँकेच्या स्थापनेच्या दिवशी अशा ७५ रीसायक्लर्सचे उद्घाटन केल. सदर रीसायक्लर्स बँकेच्या अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोवा, जळगांव, कोल्हापूर लातूर, मुंबई, नाशिक, पुणे शहर आणि पुणे पूर्व अंचल येथील शाखांमध्ये बसविण्यात आली आहेत..

सेल्फ-अपडेट पासबुक प्रिन्टिंग किऑस्क

बँकेच्या एटीएम ठिकाणी आणि शाखांमध्ये रात्रंदिवस केव्हाही पासबुक अपडेट करून देणारी स्वयंचलित यंत्रे बसविण्यात आली आहेत.

पासबुक प्रिन्टिंग किऑस्क (प्रणाली) ही ग्राहकांना त्यांचे सेव्हिंग्ज, रिकरिंग डिपॉसिट आणि पीपीएफ खाते पासबुक स्वत: प्रिन्टिंग करून घेण्यासाठी सुविधा आहे. या यंत्रणेत पासबुक आत ओढले जाते आणि खात्यावर झालेले व्यवहार पासबुकवर छपाई करून मिळतात.