Azadi ka Amrit Mahatsav

कोविड प्रभावित पर्यटन सेवा क्षेत्रासाठी कर्ज हमी योजना (LGSCATSS)

. क्र.

निकष

वैशिष्ट्ये

उद्देश

कोविड -१० च्या रोगाच्या साथीमुळे पर्यटन सेवा क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे क्षेत्र पुन्हा उभे करण्यासाठी पर्यटन मंत्रालय आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे मान्यताप्राप्त पर्यटन मार्गदर्शक (टुरिस्ट गाइड) आणि पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या द्वारे मान्यताप्राप्त असलेले प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील घटक (व्यक्ति वा संस्था) या सर्वांना त्यांच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने कर्ज हमी योजना जाहीर केली आहे. अशा मान्यताप्राप्त व्यक्ति व संस्थांना शेड्यूल्ड कमर्शियल बँकांकडून दिल्या जाणार्‍या कर्जांना हमी देणे हा उद्देश आहे.

पात्रता निकष

या योजनेचे पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत :

 1. पर्यटक मार्गदर्शक : पर्यटन मंत्रालय आणि राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे मान्यताप्राप्त / मंजूर / नोंदणीकृत
 2. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील घटक : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त/ मंजूर/ नोंदणीकृत.
  प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील घटक म्हणजे पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या द्वारे मान्यताप्राप्त टूर ऑपरेटर/ ट्रॅव्हल एजंट/ टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
 3. कर्जदार हे वैयक्तिक उद्योजक, किंवा भागीदारी संस्था, नोंदणीकृत कंपनी, ट्रस्ट, एलएलपी (मर्यादित दायित्व भागीदारी संस्था) किंवा इतर कोणतीही कायदेशीर संस्था म्हणून स्थापन केलेल्या संस्था असू शकतात.
 4. पात्र कर्जदार ECLGS योजने अंतर्गत किंवा LGSCATSS योजने अंतर्गत अर्थसहाय्य घेऊ शकतात. पात्र कर्जदाराने आधीच ECLGS योजना 1.0 किंवा 3.0 अंतर्गत लाभ घेतलेला असल्यास, त्यांना LGSCATSS योजनेअंतर्गत कव्हरेजसाठी अर्ज करण्यापूर्वी ECLGS अंतर्गत देय असलेली रक्कम पूर्णपणे फेडवी लागेल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या पात्र कर्जदाराने LGSCATSS योजने अंतर्गत मदत घेतली असेल, तर त्याला ECLGS योजने अंतर्गत कव्हरेजसाठी अर्ज करण्यापूर्वी, LGSCATSS योजने अंतर्गत देय असलेली रक्कम पूर्णपणे फेडावी लागेल.

इतर अटी / शर्ती :

 • कोणत्याही बँकेकडून या पूर्वी कर्ज घेतले नसल्यास: पर्यटक मार्गदर्शक आणि प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील घटक यांनी या पूर्वी कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँकांकडून कर्ज घेतले नसल्यास, परंतु या योजनेखाली ते पात्र असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल कर्जदाराने त्याकरता त्यांनी कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँकेशी संपर्क साधावा.
 • विद्यमान कर्जदारांच्या बाबतीत : शेड्यूल्ड कमर्शियल बँकेशी सध्या संबंध असलेले कर्जदार या योजनेअंतर्गत त्या विशिष्ट बँकेकडून पैसे कर्जाऊ घेण्यासाठी पुढे जाऊ शकतात. कर्ज प्रक्रिया सुलभ आणि जलद, करण्यासाठी आणि कर्ज देताना बँकांची कागदपत्रांची गरज (जसे की केवायसी इ.) कमी करण्यासाठी ही यंत्रणा पुरवली जात आहे.

योजनेची वैधता

ही योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत किंवा योजनेंतर्गत रु. २५० कोटी रकमेची हमी मिळेपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत वैध आहे.

योजनेचा कालावधी

३१ मार्च २०२२ पर्यंत किंवा सर्व बँकांद्वारे योजनेंतर्गत रु. २५० कोटी रकमेची हमी देईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते. योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर मंजूर झालेल्या सर्व पात्र कर्जांना लागू होईल.

सुविधेचे स्वरूप

फक्त निधी आधारित.

 • मुदत कर्ज (TL)

कर्जाचे प्रमाण

ग्राहकांच्या विनंतीनुसार, जास्तीत जास्त रक्कमेपर्यंत:

 1. मान्यताप्राप्त प्रवास आणि पर्यटन घटकांच्या बाबतीत प्रत्येकी रु .१०.०० लाखांपर्यंत आणि
 2. नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शकांसाठी प्रत्येकी रु..०० लाखांपर्यंत .

मार्जिन

शून्य

व्याज दर

 • ७.९५ % द.सा.द.शे.

या योजनेअंतर्गत कर्जासाठी परतफेड कालावधी

 • जास्तीत जास्त परतफेड कालावधी : सवलतीच्या कालावधीसह ५ वर्षे.
 • सवलतीचा कालावधी : मूळ रकमेवर एक वर्ष, ज्या दरम्यान व्याज देय असेल.

१०

सुरक्षा

या योजनेंतर्गत बँकेने वित्तपुरवठा केलेल्या कर्जदाराच्या विद्यमान आणि प्रस्तावित मालमत्ता / सिक्युरिटीज या बँककड़े हायपोथेकेशन / तारण राहतील.

इतर सुरक्षा अटी :

 • या योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणतीही अतिरिक्त तारण देण्याची गरज नाही.
 • बँक स्वतःच्या बाजूने आणि NCGTC च्या वतीने त्या मालमत्तेवर बोज़ा चढ़वेल आणि NCGTC च्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.
 • NCGTC चा त्या मालमत्तेवर दुसरा बोज़ा असेल, जो NCGTC च्या वतीने वितरणाच्या तारखेपासून वाजवी कालावधीत बँकेच्या नावे तयार केला जाईल.
 • सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा बोज़ा ताबडतोब चढ़वला जावा. (कोणत्याही परिस्थितीत या योजनेंचा फायदा  घेण्यास पात्र होण्यासाठी खाते एनपीए होण्याआधी हा बोज़ा चढ़वला जाणे आवश्यक आहे.)

११

गॅरंटी कव्हरेजची व्याप्ती

NCGTC या योजनेंतर्गत कर्जदारांना प्रदान केलेल्या क्रेडिट सुविधेसाठी थकित रकमेवर १००% गॅरंटी कव्हरेज प्रदान करेल.

१२

गॅरंटी कव्हरचा कालावधी

योजनेअंतर्गत हमी पहिल्या वितरणाच्या तारखेपासून कमाल ५ वर्षांपर्यंत उपलब्ध आहे .

१३

योजनेअंतर्गत हमीचे स्वरूप

NCGTC ची क्रेडिट हमी बिनशर्त आणि अपरिवर्तनीय असेल.

१४

हमी फी

शून्य

१५

प्रोसेसिंग फी / फोरक्लोजर / प्रीपेमेंट / खाते बंद करण्याचे शुल्क

शून्य

१६

इतर सर्व सेवा शुल्क

विद्यमान सेवा शुल्क मार्गदर्शक तत्त्वांनुसार.