Accessibility Menu

महाबँक टेक्सटाईल क्लस्टर योजना

नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी टेक्सटाईल युनिटसाठी कर्ज.

एमएसएमई क्षेत्राच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी क्लस्टर आधारित दृष्टिकोन बँकेने विकसित केला आहे, ज्याद्वारे मान्यताप्राप्त एमएसएमई क्लस्टरमध्ये बँकिंग सेवा विस्तारित करून पूर्ण सेवा दृष्टिकोन साध्य करता येईल.

या संदर्भात, बँक ऑफ महाराष्ट्र ने  महाबँक टेक्सटाईल क्लस्टर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत खालील क्लस्टर पात्र आहेत:

  • कोल्हापूर पॉवरलूम क्लस्टर
  • सुरत फॅब्रिक क्लस्टर
  • मालेगाव पैठणी साडी क्लस्टर
  • कोइंबतूर स्पिनिंग मिल्स क्लस्टर
  • तिरुपूर निटवेअर क्लस्टर
  • जयपूर हँडलूम क्लस्टर

प्रमुख वैशिष्ट्ये

  • कमी व्याज दर (RoI): 8.00% पासून सुरू.
  • कर्ज मर्यादा: रु. 100.00 कोटीपर्यंत.
  • प्रोसेसिंग फी मध्ये सवलत: 60% पर्यंत.
  • कमी मार्जिनची आवश्यकता.
  • परतफेड कालावधी: 10 वर्षांपर्यंत (18 महिन्यांचा मोरॅटोरियम कालावधी समाविष्ट).

महाबँक टेक्सटाईल क्लस्टर योजने ची वैशिष्ट्ये व मापदंड:

मापदंड

योजेनेचे तपशील खालील प्रकारच्या एमएसएमईसाठी

पात्रता

व्यक्ती, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड कंपन्या, ज्या एमएसएमई म्हणून वर्गीकृत होण्यासाठी पात्र आहेत, त्यांना पुढील कामांसाठी:

  • पॉवरलूम युनिट, साडी उत्पादन युनिट, स्पिनिंग मिल्स युनिट, निटवेअर युनिट, टेक्सटाईल प्रिंटिंग युनिट यांची स्थापना.
  • यार्नचे उत्पादन व व्यापार (कॉटन, सिंथेटिक सिल्क, यार्नची प्रक्रिया जसे वॉर्पिंग, ट्विस्टिंग, टेक्सचुरायझिंग इ. आणि दोरा, नेट, टेप यांचे उत्पादन)
  • कपड्यांचे उत्पादन व व्यापार (सर्व प्रकारचे कपडे, शाली, ब्लँकेट्स, सुटिंग-शर्टिंग्स, पडदे, निटेड फॅब्रिक, सिंथेटिक सिल्क इ.)
  • कपड्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या जरीचे उत्पादन व व्यापार (मेटालायझिंग, कटिंग इ.)
  • कपड्यांची प्रक्रिया (डाईंग, प्रिंटिंग, फिनिशिंग, एम्ब्रॉयडरी, कापडांवर इतर मूल्यवर्धन इ.)
साडी, ड्रेस मटेरियल, कपडे, पोशाख इत्यादींचे उत्पादन आणि प्रक्रिया.

उद्देश

देशांतर्गत तसेच निर्यात कर्जाच्या उद्देशाने:

  1. खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी
  2. भांडवली खर्च / उपकरणे / यंत्रसामग्री खरेदीसाठी.

सुविधेचा प्रकार:

फंड आधारित तसेच नॉन-फंड आधारित.

कर्ज रक्कम आणि मर्यादा

  • किमान: रु. 0.25 कोटी पेक्षा अधिक.
  • कमाल: रु. 100.00 कोटीपर्यंत.

मार्जिन

  • देशांतर्गत सुविधा: किमान 20% लागू आहे
  • निर्यात कर्ज सुविधा:
    i) प्री-शिपमेंट / पीसी: 10%.
    ii) पोस्ट-शिपमेंट / एफओबीएन: शून्य.

व्याज दर

आरएलएलआरशी लिंक केलेला,

  • सवलतीचा व्याज दर 8.00% पासून सुरू.
  • तारण दिल्यास व्याज दरात सवलत.

सीजीटीएमएसई

रु. 5 कोटींपर्यंतच्या कर्ज रकमेवर सीजीटीएमएसई कव्हर उपलब्ध आहे

सुरक्षा

प्रायमरी: बँकेच्या वित्तपुरवठ्यातून निर्माण झालेल्या मालमत्तेचे हायपोथिकेशन/मॉर्गेज, येणी, इ.

हमी: सीजीटीएमएसई अंतर्गत कव्हर असल्यास कोणतीही थर्ड पार्टी हमीची गरज नाही.

प्रोसेसिंग (प्रक्रिया) शुल्क

वर्किंग कॅपिटल - मंजूर मर्यादेच्या 0.25%.

मुदत कर्ज - मंजूर मर्यादेच्या 0.40%.

सीएमआर नवीन / फ्रेश ग्राहकांसाठी:

सीएमआर 1 ते सीएमआर 5.

एलसी आणि बीजीवरील कमिशनमध्ये सवलत:

सीएमआर

एलसी/बीजी कमिशनमध्ये सवलत

1 आणि 2

50%

3 आणि 4

25%

Bank of Maharashtra, India's leading Public Sector Bank offers Deposits,Loans,Digital products for personal Banking, Corporates,MSMEs & NRI Customers

Bank of Maharashtra use cookies to enhance your experience on Bank’s website. Read More... By using our website, you agree to place these cookies on your device. You can disable/delete these cookies by changing your web browser settings. Bank of Maharashtra is not responsible for cookies placed in the device of user/s by any other website and information collected thereto. Check out our Cookie/Privacy Policy and Terms & Conditions.

Feedback :

How would you rate our services on the scale of 1 to 5 ?

Poor
Fair
Average
Good
Excellent

In case You have other suggestions/feedback please provide

Note: On Exit, all chat history will be cleared
bom logo chat

Bank Of Maharashtra

bomy