Beti Bachao Beti Padhao

ठेवींवर कर्ज (LAD)

तुमची बँकेतील ठेव न मोडता आर्थिक लवचिकतेचा अनुभव घ्या : तुमच्या ठेवीच्या आधारे कर्ज

बँकेतील आपली मुदत ठेव (एफडी) म्हणजे ठराविक कालावधीत बचत आणि वृद्धी साधण्याचा राजमार्ग. परंतु अनपेक्षितपणे आर्थिक गरज निर्माण होऊ शकते, तुमच्या बचतीचे आणि दीर्घकालीन लाभाचे गणित न बिघडवता तुम्हास तातडीने अर्थसहाय्य आवश्यक ठरते. त्यासाठीच आम्ही तुमच्या मुदत ठेवीच्या (एफडी) आधारे कर्जाची सुविधा प्रदान करीत आहोत, ज्या योगे तुम्हास तुमची मुदत ठेव (एफडी) कायमस्वरुपी मोडण्याची गरज नाही. पुढे नमूद केलेला तपशील आणि त्याचे लाभ लक्षात घ्या आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या मोबाइल ॲप द्वारा आपण या सुविधेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकाल हे जाणून घ्या.

मुदत ठेवीच्या आधारे कर्ज योजनेची वैशिष्ट्ये :

 • कर्जाची भरगच्च रक्कम : तुमच्या गरजांची पूर्तता खात्रीपूर्वक व्हावी याकरिता तुमच्या मुदत ठेवीच्या 90% एवढी रक्कम कर्ज म्हणून मिळवा.
 • व्याजाचे स्पर्धात्मक दर : वैयक्तिक कर्जासाठी असलेल्या पारंपरिक व्याजदराच्या तुलनेत व्याजाचे दर कमी, ज्यायोगे हा पर्याय किफायतशीर ठरतो.
 • तातडीने आणि सहजसोपी प्रक्रिया : कागदपत्रांची अजिबात गरज नाही ज्यायोगे तुम्हास तातडीने रक्कम प्राप्त होण्यासाठी मंजुरीची वेगवान प्रक्रिया.
 • कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.
 • रक्कम तातडीने तुमच्या हाती : तुमची मुदत ठेव (एफडी) न मोडता तुम्हास तातडीने रक्कम प्राप्त होईल, ज्यायोगे तुमची बचत सुरक्षित राहील आणि त्यावर व्याज मिळत राहील.
 • परतफेडीसाठी लवचिक पर्याय : परतफेडीचा असा पर्याय तुम्ही निवडू शकता जो तुमच्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत असेल.

तातडीच्या गरजेच्या वेळी मुदतीच्या ठेवींच्या आधारे कर्ज मिळविण्याचे फायदे :

 • तुमची मुदत ठेव मोडण्याची गरज नाही: मुदत ठेव कायमस्वरुपी बंद करण्याऐवजी मुदत ठेवीच्या आधारे मिळणारे कर्ज (FD) म्हणजे मुदत ठेवीवरील व्याज न गमावता मिळणारी सुविधा. कर्जाच्या रकमेचा वापर करीत असताना तुम्हाला तुमच्या मुदत ठेवीवर व्याज मिळत राहील. ज्यायोगे तुम्हास कमाल परतावा मिळेल.
 • कोणत्याही क्रेडिट तपासणीची आवश्यकता नाही: तुमची FD संपार्श्विक म्हणून काम करत असल्याने, क्रेडिट तपासणीची आवश्यकता नाही, ज्यामुळे कर्ज मिळणे सोपे आणि जलद होईल.
 • आर्थिक शिस्त टिकून राहते : ठेवीच्या आधारावर कर्ज घेत असताना तुमची दीर्घकालीन आर्थिक लाभ प्राप्त करण्याचे लक्ष्य कायम रहाते. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तातडीच्या आर्थिक गरजाही भागवता येतात.
 • मन:शांती : तातडीच्या गरजेच्या काळात तुमच्याकडे आर्थिक सुविधा उपलब्ध आहे. हे माहिती असल्यामुळे तुमची मन:शांती कायम रहाते.

मुदत ठेवीच्या आधारे कर्ज कसे प्राप्त करायचे ?

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या तुमच्या मुदत ठेवीच्या आधारे साध्या सरळ पद्धतीने कर्ज कसे मिळवायचे:

 1. महामोबाईल प्लसवर लॉगइन करा: बँक ऑफ महाराष्ट्रचे मोबाईल बँकिंग ॲप उघडा आणि तुमच्या तपशिलाच्या आधारे लॉग इन करा.
 2. ठेवी विभागात नेव्हिगेट करा: मुदत ठेव निवडा आणि 'Apply for Loans aqainst Deposit' लिंकवर क्लिक करा.
 3. तपशील भरा : आवश्यक तपशील जसे की कर्ज रक्कम आणि मुदत भरा.
 4. दाखल (सबमिट) करा आणि मान्यता घ्या : तुमचा ट्रान्झॅक्शन पिन नोंदवा आणि तुमचा अर्ज दाखल करा. कर्जाची रक्कम त्वरित तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुदत ठेवीच्या आधारे कर्ज देण्याचा प्रस्ताव म्हणजे तुमची तातडीची आर्थिक गरज भागविणे आणि तुमचा दीर्घकालीन उत्पन्न मिळविण्याचा मार्गही जपणे होय. सहजसोपी अर्ज करण्याची पद्धत, आकर्षक व्याजदर आणि मोबाईल बँकिंगची सुविधाही तुमच्यासाठी ‘विनविन’ सिच्युएशन आहे. आजच या सुविधेचा लाभ घ्या आणि लवचिक आर्थिक सुविधा अनुभवा.

 
ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा महामोबाईल