ट्रेड्स (TReDS)
- ट्रेड्स (TReDS) म्हणजे काय?
संदर्भ : ट्रेड रिसिव्हेबल्स इलेक्ट्रॉनिक डिस्काऊंटिंग सिस्टीम (टीआरईडीएस) हा ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉम म्हणजे सुविधा ही एमएसएमई म्हणजे मध्यम आणि छोट्या व्यावसायिक विक्रेत्यांसाठी त्यांची व्यापारातली येणी वसूल करणारी यंत्रणा आहे. यामुळे त्यांची व्यापारातील येण्यांची रक्कम लिलाव पद्धतीने त्यांना जमा करून देण्यात येतात.
- सध्या किती टीआरईडीएस प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत?
संदर्भ: सध्या टीआरईडीएस प्लॅटफॉर्म म्हणून काम करणाऱ्या तीन यंत्रणा आरबीआयकडे नोंदणीकृत आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्रने या तीनही संस्थांशी करार केलेला आहे
- अ) ए. ट्रेडस् लिमिटेड (इन्व्हाईस्मार्ट म्हणून ओळखली जाते)
- ब) रिसिव्हेबल्स एक्स्चेंज ऑफ इंडिया (आरएक्सआयएल)
- क) मायएंड सोल्युशन्स (एम 1 एक्स्चेंज म्हणून ओळखली जाते)
- या प्लॅटफॉर्मवर म्हणजे यंत्रणेवर कोणी नोंदणी करावी?
सहभागी
पात्रता
खरेदीदार
कंपन्यांसह कार्पोरेट आणि सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना अणि आरबीआय यांनी मान्यता दिलेल्या अन्य संस्थासह अन्य खरेदीदार
विक्रेते
मिक्रो, स्मॉल ॲण्ड मीडियम एन्टरप्रायझेस डेव्हलपमेंट ॲक्ट २००६ (एमएसएमईडी ॲक्ट)च्या व्याख्येंतर्गत एमएसएमई उद्योग.
धनको
बँका, एनबीएफसी फॅक्टर्स, वित्तीय संस्था आणि आरबीआयने अनुमती दिलेल्या अशा अन्य संस्था.
- नोंदणीकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे
संदर्भ : पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत
- अ) नोंदणीसाठी अर्ज
- ब) अर्जदाराला प्रवेशासाठी केवायसी कागदपत्रे
पॅन
प्रारंभ केल्याचे प्रमाणपत्र
संस्थेचे कागदे आणि नियम
नोंदणीसाठी पत्त्याचा पुरावा.
- क) प्रमोटर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, अधिकृत स्वाक्षरीधारक यांची केवायसी कागदपत्रे
- ड) निवडलेल्या बँकेच्या संदर्भातील कागदपत्रे
- इ) मास्टर ॲग्रीमेंट
- फ) बँक कन्फर्मेशन लेटर
- टीआरईडीएसचे मुख्य लाभ कोणते?
संदर्भ : टीआरईडीएस प्लॅटफॉर्मचे पुढीलप्रमाणे लाभ आहेत.
- अ) सर्व सहभागींसाठी
स्वयंचलित पारदर्शक प्लॅटफॉर्म
कागदपत्रविरहित आणि विनाकटकट
खर्चात कपात
- ब) विक्रेत्यांसाठी फायदे
स्पर्धात्मक किंमतीचा शोध.
विक्रेत्यांना कोणताही त्रास नाही.
एमएसएमईज ना सर्वोत्तम प्रस्ताव निवडण्याचा अधिकार.
विक्री सफल झाल्यानंतर टी+१ प्लॅटफॉर्मवर पेमेंट जमा होते.
पेमेंटसाठी खरेदीदारांकडे तगादा नाही.
एकाच कर्जदात्यावर अवलंबित्व नाही.
वाढीव उत्पादकता आणि प्रभावी विक्री व्यवस्थापन.
व्यापक वित्तीय पर्याय.
- क) खरेदीदारांसाठी फायदे
एमएसएमई ॲक्ट. 2006 अनुरूप उभारणी.
एमएसएमई विक्रेत्यांशी अधिक चांगल्या अटींबाबत चर्चा करू शकतात.
खरेदीदारांसाठी गुंतवणुकीची कमी किंमत.
व्यवस्थापनाचा कमी खर्च.
वाढीव कर्जाचा कालावधी मिळू शकतो.
स्पर्धात्मक किंमतीचा शोध.
रोख निधीचा प्रभावी प्रवाह.
विक्रेत्यांना रोख निधी/खेळत्या भांडवलाची चणचण भासत नाही.
- अ) सर्व सहभागींसाठी
- ट्रेड्स प्रक्रिया प्रवाह कोणता आहे?
- व्याज दर काय आहे?
RoI: RLLR लिंक्ड रेट