Azadi ka Amrit Mahatsav

फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स २०२० (करपात्र)

  • भारत सरकारने फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स २०२० (करपात्र) म्हणजेच फ्लोटिंग व्याज दराचे बचत रोखे ही योजना ०१ जुलै २०२० पासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
  • पात्रता: हे बाँड व्यक्ती (जॉइंट होल्डिंगसह) आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी गुंतवणुकीसाठी खुले आहेत. अनिवासी भारतीय या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत.
  • वैशिष्ट्ये : योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
    1. बाँड्ससाठी बाँड लेजर खात्याच्या स्वरूपात अर्ज केवळ नियुक्त शाखांमध्येच प्राप्त होतील.
      नियुक्त शाखांची यादी मिळविण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा .
    2. रोखे केवळ नॉन-क्युम्युलेटिव्ह स्वरूपात जारी केले जातील. रोख्यांवर व्याज दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी अर्धवार्षिक देय आहे. १ जानेवारी २०२१ रोजीचे कूपन ७.१५% दराने दिले जाईल. पुढील सहामाहीसाठीचा व्याजदर दर सहा महिन्यांनी रीसेट केला जाईल. संचयी आधारावर व्याज देण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध नाही.
    3. बाँडमध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा असणार नाही.
    4. प्राप्तिकर : बॉण्ड्सवरील व्याज हे बॉण्डधारकाच्या संबंधित करपात्रते नुसार प्राप्तिकर कायदा, १९६१ अंतर्गत करपात्र असेल.
    5. संपत्ती कर : संपत्ती कर कायदा, १९५७ अंतर्गत बाँड्सला संपत्ती-करातून सूट दिली जाईल.
    6. हे रोखे जारी केल्याच्या तारखेपासून ७ (सात) वर्षांच्या समाप्तीनंतर परतफेड केले जातील. मुदतपूर्व परतफेडीची अनुमती केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या विशिष्ट श्रेणींसाठीच असेल.
    7. या रोख्यांची दुय्यम बाजारात खरेदी-विक्री होणार नाही आणि बँकिंग संस्था, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या किंवा वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेताना हे रोखे तारण म्हणून वापरण्यास पात्र नाहीत.
    8. वैयक्तिक धारक किंवा हयात असलेला धारकच बाँडचे नामांकन करू शकतो.