Beti Bachao Beti Padhao

महाकृषी – यंत्र सामुग्री भाडेकरार योजना (एमएआरसी)

तपशील

योजनेच्या मार्गदर्शक सूचना

सुविधेचे स्वरूप

मुदत कर्ज (टीएल)

हेतू

पुढे नमूद केल्यानुसार ग्राहकांना सुविधा देण्याकरीता शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा विचार करता येईल.

 • ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, बुलडोझर, ट्रेलर आणि ॲक्सेसरीज, कंबाईन हार्वेस्टर, ग्रेन थ्रेशर्स, स्प्रेअर्स, डस्टर्स, फ्लॉग्ज, ड्रिल्स आणि या स्वरूपाची शेतीसाठी आवश्यक साधने आणि शेतीसाठी लागणारी उपकरणे भाड्याने घेण्यासाठी कस्टम हायरिंग सेंटर्स उभी करण्यासाठी.
 • एरियल स्प्रेईंग मशीनरीज / इंप्लीमेंटस्‌ खरेदी करण्यासाठी कर्ज
 • बोअरिंगवेल खणणे, ट्यूबवेल खोदणे यासाठी ड्रीलिंग रिंग खरेदीसाठी कर्ज
 • विहिरी बांधण्यासाठी साधने खरेदी करणे आणि / किंवा पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त साधने खरेदी करण्यासाठी कर्जपुरवठा
 • शेतकऱ्यांना शेतातून प्रोसेसिंग फॅक्टरीपर्यंत किंवा मार्केट यार्डपर्यंत शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी ट्रक आणि ट्रेलर युनिट खरेदी करण्यासाठी कर्जपुरवठा.
 • खोदकामासाठी साधने खरेदी करणे आणि दुधाची वाहतूक करण्यासाठी टँकर खरेदी करण्याकरिता कर्ज.
 • कुक्कुटपालन क्षेत्रातील पक्षांची वाहतूक करण्यसाठी विशेष पद्धतीचे ट्रक खरेदी करण्यासाठी कर्ज.
 • बैलगाड्या खरेदीसाठी कर्ज.

(या योजनेत नव्या कोऱ्या यंत्रसामुग्रीच्या खरेदीचा विचार करण्यात येईल. सेकंड हॅण्ड किंवा वापरलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी)

पात्रता

वैयक्तिक, स्वयंमालक, भागीदारी संस्था, एफपीओ/एफपीसीज, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि लिमिटेड लायबिलिटी कन्सर्न, सेल्फ हेल्प ग्रुप, जॉईंट लायबिलिटी ग्रुपस्‌‍, शेतकऱ्यांची सहकारी संस्था आणि ग्रामीण उद्योजक (उद्योजक म्हणून ग्रामीण युवक आणि शेतकरी)

रक्कम

किमान : किमान रकमेची मर्यादा नाही.

कमाल : प्रत्येक कर्जदारासाठी रु. 5.00 कोटी

मार्जिन

नवीन मालमत्तेसाठी: किमान 15%

कर्जाची श्रेणी

एकत्रित कर्जाची (फंड + नॉनफंड) रक्कम जिथे रु. 25.00 लाखांपेक्षा अधिक असेल तिथे सर्व खात्यांचे इंटरनल क्रेडिट रेटिंग अनिवार्य आहे. (क्रेडिट रिस्क रेटींग किमान “बीबीबी” असावे.

व्याजाचा दर

आधारित किंमत

आरएलएलआर + 0.10% द.सा.द.शे.

आरएलएलआर + 1.15% द.सा.द.शे.

तारण

प्राथमिक तारण : बँकेच्या कर्जातून खरेदी केलेल्या मालमत्तेचे गहाणतारण.

सामूहिक तारण : कर्जदाराच्या/कर्जदारांच्या नावाने असलेल्या मालमत्तेचे गहाणतारण. त्याचप्रमाणे भागीदारांची मालमत्ता, संचालक किंवा जवळचे नातलग जसे की, जोडीदार, नातलग (वडील आणि आई) भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी आणि सून यांच्या मालमत्ता तारण म्हणून स्वीकारल्या जाऊ शकतील. स्वाभाविकच अशा मालमत्तेचा मालक हा अशा कर्ज सुविधेसाठी जामीनदार असेल.

आरसी बुक मध्ये बँकेच्या बोजाची नोंद असेल. कर्जदारास दोन टीटीओ कोऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल.

विमा

बँकेकडे गहाण* किंवा तारण ठेवलेल्या मालमत्तेचा सर्वंकष विमा बँकेच्या नावे असणे आवश्यक, ज्यामध्ये पूर, भूकंप यापासून विम्याचे संरक्षण बँकेच्या नियमानुसार असणे अनिवार्य.

(जमीन आणि इमारत याबाबतीत इन्शुअरन्स रिप्लेसमेंट व्हॅल्यू, खर्च वाचविण्यासाठी सुचविण्यात येते.)

परतफेड

7 वर्षे (सवलतीच्या 6 महिन्यांच्या कालावधीसह) - उत्पन्न कशाप्रकारे येते त्यावर आधारित मासिक/तिमाही/सहामाही किंवा वार्षिक हप्त्याने त्याचप्रमाणे गुंतवणुकीचा हेतू, मालमत्तेचे आर्थिक आयुष्य आणि येणारी रक्कम या आधारेही परतफेडीचे स्वरूप ठरवता येईल.

अन्य अटी आणि शर्ती

 • केवायसीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
 • सीआयसी रिपोर्ट/आरबीआय डिफॉल्टर लिस्ट प्राप्त करून त्याची पडताळणी करण्यात येईल. सीआयबीआयएल स्कोअर 600 पेक्षा अधिक असणे आवश्यक.
 • प्रस्तावकाचा एकंदर रकमेतील हिस्सा नक्की करून बिलची रक्कम आरटीजीएसच्या/एनईएफटीआर थेट सप्लायर/डीलर यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
 • इन्व्हॉईस/रिसीट, आरसी बुकची प्रत ज्यामध्ये बँकेचा बोजा आणि बँकेच्या तपशीलासह विमा कागदपत्रे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

 1. कर्जासाठीचा अर्ज म्हणजे फॉर्म नं. 138 आणि त्यासोबत बी 2
  • सर्व 7/12, 8 अ, 6 ड उतारे, अर्जदारांच्या जमिनीच्या चतु:सीमा.
  • जर सह-अर्जदार, पगारदार/व्यावसायिक असेल तर अलिकडची पगाराची स्लीप/आयटीआर/फॉर्म 16, बॅलन्सशीट आणि पी/एल स्टेटमेंट
  • अर्जदाराकडून येणे बाकी नसल्याबाबत पीएसी सह आजूबाजूच्या वित्तीय संस्थांचे प्रमाणपत्र
  • ज्या ठिकाणी जमीन गहाण ठेवण्यात येणार आहे त्या बाबतीत लीगल खर्च ॲण्ड व्हॅल्युएशन रिपोर्ट
  • मान्यताप्राप्त डिलर्सकडून वाहन/यंत्रसामुग्रीच्या किंमतीबाबत कोटेशन.
 2. हमी फॉर्म आणि एफ-138
  • सर्व 7/12, 8 ए आणि पीएसीज ड्यू सर्टीफिकेट.
  • जर जमीनदार पगारदार/व्यावसायिक असेल तर अलिकडची पगाराची स्लीप/आयटीआर/फॉर्म 16/बॅलन्सशीट आणि पी/एल स्टेटमेंट.