Beti Bachao Beti Padhao

महाबँक पगार खाते योजना

या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे असतील

अनु. क्र.

वैशिष्ट्ये

महाबँक पगार खाते योजना

1

कोण खाते उघडू शकतो

केंद्र/राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी उपक्रम आणि बँकेकडून पगार  भरणा सुविधा घेतलेल्या कॉर्पोरेट संस्था.

(बँकेच्या स्वतःच्या - पूर्णवेळ किंवा अर्धवेळ - कर्मचार्‍यांचे खाते या योजनेअंतर्गत उघडले जाणार नाही.)

2

वय (किमान)

18 वर्ष

3

खाते सुरुवातीचा भरणा

  1. कोणतीही रक्कम निश्चित केलेली नाही किंवा (आपल्याला इच्छित असलेली कोणतीही रक्कम भरता येईल)
  2. शून्य शिल्लक ने खाते उघडता येते.

4

किमान शिल्लक आवश्यक आहे

  1. शून्य
  2. शून्य शिल्लक खाते
  3. कोणतेही किमान शिल्लक शुल्क नाही

5

कर्मचार्‍यांची संख्या

कोणतीही किमान आवश्यकता नाही

6

चेक बुक सुविधा

वैयक्तिक नावे छापलेली 40 चेक पाने प्रत्येक वर्षाला मोफत

7

एटीएम व डेबिट कार्ड

  1. मोफत रुपे (Rupay) प्लॅटिनम डेबिट कार्ड
  2. कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क नाही

8

एटीएममधून पैसे काढण्याची / पीओएस वर स्वाईप करण्याची मर्यादा  (डिफॉल्ट कमाल प्रति दिवस मर्यादा)

एटीएम- रु . 50,000/- प्रतिदिन

पीओएस - रु . 2,00,000/- प्रतिदिन

(ग्राहकांच्या विनंतीनुसार बदलता येईल)

9

एटीएम व्यवहार

  1. बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममध्ये मध्ये मोफत अमर्यादित व्यवहार
  2. इतर बँकेच्या एटीएममध्ये मोफत अमर्यादित व्यवहार

10

गट विमा
(अपघाती)

मोफत

  1. वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा कव्हर: रु. 40 लाख रुपये
  2. कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व विमा संरक्षण: रु 40 लाख
  3. आंशिक कायमस्वरूपी अपंगत्व विमा संरक्षण: 20 लाख रुपये
  4. हवाई अपघाती मृत्यू विमा कव्हर: रु . 1 कोटी
  5. गोल्डन अवर कॅशलेस उपचार (अपघातानंतर ): 1 लाख रुपयांपर्यंत

(पूरक विमा एप्रिल 2020 पासून उपलब्ध होईल)

11

अतिरिक्त विमा

वैयक्तिक अपघाती विमा आणि कायमस्वरूपी अपंगत्व संरक्षण रु . 2 लाखांपर्यंत
(रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डामध्ये अंतर्भूत)

12

क्लीन वैयक्तिक कर्ज सुविधा

पात्रतेनुसार 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज *

13

रीटेल कर्जावरील व्याज आणि प्रक्रिया शुल्काचा सवलतीचा दर

नियोक्त्याच्या विनंतीनुसार बँके प्रत्येत्क प्रकरणांनुसार ठरवेल.

14

एनईएफटी/आरटीजीएस

इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग/UPI च्या माध्यमातून पैसे पाठवण्याची 24X7 मोफत सुविधा

15

विमानतळांवर लाउंज मध्ये प्रवेश

प्लॅटिनम कार्डधारकांसाठी दर तीन महिन्यांमध्ये प्रत्येकी रु 2 भरून दोन वेळा वापरता येईल (रुपेने देऊ केलेल्या सुविधेनूसार)

* व्याज दर, प्रक्रिया शुल्क, दस्तऐवजीकरण शुल्क आणि परतफेडीचा कालावधी योजना/अगाऊ उत्पादनांनुसार लागू असेल

आता अर्ज करा