Beti Bachao Beti Padhao

डेबिट कार्ड ई - मॅनडेट

बँक ऑफ महाराष्ट्रच्या रूपे व व्हिसा डेबिट कार्डच्या माध्यमातून ई - मॅनडेट / स्थायी सूचना / पुनरावर्ती प्रदान सूचना यासाठी नोंदणी करण्याची सुविधा बँकेने सुरु केली आहे. दूरध्वनी, विमा, वीज, पाणी, वायू पुरवठा करणारे सेवापुरवठादार, विमा हप्ते, ओटीटी सेवा इत्यादी स्वरूपाच्या पुनरावर्ती सेवांचे शुल्क भरण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे डेबिट कार्ड धारक ग्राहक ई – आदेश / स्थायी सूचना / पुनरावर्ती प्रदान सूचना यासाठी नोंदणी करू शकतात. भारतीय रिझर्व बँकेच्या दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी लागू झालेल्या व वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या पुनरावर्ती व्यवहारांच्या ई – आदेश / स्थायी सूचना / पुनरावर्ती प्रदान सूचना प्रक्रिया विषयक नियमावली नुसार बँकेने उपरोक्त सुविधा देऊ केली आहे. 

डेबिट कार्ड ई - मॅनडेट देण्याचे लाभ 

  1. ग्राहक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सेवांचा लाभ घेऊ शकतो  .
  2. वेळेची बचत
  3. सुलभ व सातत्यपूर्ण प्रक्रिया 
  4. विना व्यत्यय व्यवहार 

डेबिट कार्ड ई - मॅनडेट देण्याचे लाभ

  1. डेबिट कार्डद्वारे अनुज्ञेय सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी सदर सुविधा उपलब्ध आहे.  .
  2. डेबिट कार्डद्वारे ई - मॅनडेट व्यवस्था ही फक्त पुनरावर्ती व्यवहारांसाठी लागू असून एकल प्रदानासाठी लागू नाही.  .

नोंदणी करण्यासाठी येथे टिचकी मारावी    https://rh.insolutionsglobal.com/