Beti Bachao Beti Padhao

महा कृषी समृद्धी योजना (MKSY)

लक्ष्य गट

स्टार्टअप्ससह अन्न आणि कृषी आधारित उद्योग आणि कृषी पायाभूत सुविधा प्रकल्प

पात्रता

  1. वैयक्तिक, भागीदारी संस्था, अन्न उत्पादक कंपन्या, खाजगी मर्यादित कंपन्या, सार्वजनिक मर्यादित कंपन्या आणि मर्यादित दायित्व भागीदारी संस्था.
  2. “कृषी” अंतर्गत स्थापन होत असलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या अन्न आणि कृषी-प्रक्रिया युनिटसाठी दिला जाणारा वित्त पुरवठा (इतर बँका/वित्तीय संस्थांकडून टेक ओव्हर होणारा)

उद्देश

  1. नवीन प्रकल्प बांधण्यासाठी / सध्याच्या युनिटच्या विस्तार करण्यासाठी जमिनीचे संपादन/बांधकाम करणेसाठी, तसेच सदध्या चालू असलेला प्रकल्प खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठा करणे.
  2. सर्व भारतभर क्लस्टर पध्दतीने सुरू होणार्‍या यूनिट साठी वित्तपुरवठा करणे

सुविधांचा प्रकार

मुदत कर्ज, खेळते भांडवल / निर्यात क्रेडिट जसे की प्री-शिपमेंट आणि पोस्ट शिपमेंट / बिल परचेस / बिल डिस्कौंट, लेटर ऑफ क्रेडिट, बँक गॅरंटी, इत्यादी.

कर्ज मर्यादा

  • किमान- रु . १०.०० लाख आणि त्याहून अधिक
  • कमाल- पर्यंत रु . १००.०० कोटी

मार्जिन

मुदत कर्ज: - किमान २५%

खेळते भांडवल : -साठा आणि बुक डेट - किमान २५%.

क्रेडिट रेटिंग

  1. रु २५.०० लाख ते रु. २५.०० कोटी पर्यंत (फंड + नॉन-फंड आधारित) कर्ज असलेल्या सर्व खात्यांसाठी अंतर्गत क्रेडिट रेटिंग लागू आहे ..
  2. रु . २५.०० कोटी च्या पुढे (फंड आणि नॉन-फंड आधारित) कर्ज असलेल्या सर्व खात्यांसाठी किमान क्रेडिट जोखीम रेटिंग "BBB" असावी )

ROI

जोखीम आधारित दरानुसार

किमान RLLR + 0.10 %  प्रति वर्ष .

कमाल RLLR + 1.05 % प्रति वर्ष

ROI मध्ये CMR कर्जदारांसाठी सवलत

  1. CMR १ आणि २ असलेल्या कर्जदारांसाठी 0.50% अतिरिक्त सवलत दिली जाईल
  2. CMR ३ आणि ४ असलेल्या कर्जदारांसाठी 0.25 % अतिरिक्त सवलत दिली जाईल
  3. व्याजदरातील वरील सर्व सवलतींसह, प्रभावी व्याजदर MCLR/RLLR च्या बरोबरीने असावा.

परतफेड

मुदत कर्ज : कमाल ७ वर्षांपर्यंतचा कालावधी (मोरेटोरियम कालावधीसह).

खेळते भांडवल : मागणीनुसार परतफेड करण्यायोग्य

पुनरावलोकन/नूतनीकरण

खेळते भांडवल : दरवर्षी पुनरावलोकन / नूतनीकरण

मुदत कर्ज : रु. २५.०० लाख आणि त्याहून अधिक मुदतीच्या कर्जाचे वार्षिक पुनरावलोकन

प्रक्रिया शुल्क

  • CMR-१ ते CMR-२ सह कर्जदार/ युनिट्ससाठी शून्य प्रक्रिया शुल्क
  • CMR ३ आणि CMR-४ सह कर्जदार / युनिट्ससाठी लागू प्रक्रिया शुल्कामध्ये ५०% सवलत
  • CMR ५ आणि CMR-6 सह कर्जदार/युनिट्ससाठी लागू प्रोसेसिंग फीमध्ये २५% सवलत आणि अनरेटेड .

योजनेसाठी व्याप्ती आणि संभाव्य क्षेत्रे

योजनेची खास वैशिष्ट्ये :

  • संपूर्ण भारतात क्लस्टर आधारित पध्दत लागू केली.
  • कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना आकर्षित करण्यासाठी
  • कमाल कर्जाची रक्कम रु. १०० कोटी पर्यंत आहे.
  • सवलतीचा व्याजदर
  • प्रक्रिया शुल्क शून्य
  • क्लस्टर मध्ये मान्य उपक्रम MoFPI , भारत सरकारच्या ODOP दिशानिर्देश आणि DA&FW, भारत सरकारच्या निर्देशांनुसार ओळखले जातात .
  • मोठ्या व्यवसायाच्या संधी मिळविण्यासाठी विशिष्ट क्षेत्र आधारित योजना तयार करून सूचक सूचीच्या व्यतिरिक्त झोन क्लस्टर्स/जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करू शकतात .
  • राज्य/केंद्र सरकारने जारी केलेल्या संबंधित योजना मार्गदर्शक तत्त्वांनुसार या योजनेंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प सरकारच्या इतर योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असू शकतात.

आत्ताच अर्ज करा