महा सुपर फ्लेक्सी गृह कर्ज योजना
(बचत खात्याशी संलग्न असलेले मुदत कर्ज)
या गृहकर्ज योजनेत कर्जदारांचे कर्ज खाते एका विशिष्ट बचत खात्याशी जोडले जाते. त्यामुळे जेव्हा कर्जदार त्यांच्याकडील अतिरिक्त पैसे या खात्यात जमा करतात, तेव्हा ते कर्जासाठी भरलेले पैसे आहेत असे मानले जाते, त्यामुळे कर्जाच्या थकित रकमेवरील व्याज कमी होते. तसेच, गरज भासल्यास, कर्जदार त्यांना आवश्यक असेल तेव्हा पैसे काढण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे, आणि त्या तुलनेत कर्ज पुन्हा समायोजित केले जाते.
महत्वाची वैशिष्टे
- मंजूर गृहकर्ज फ्लेक्सी होम बचत खात्याशी जोडले जाईल .
- व्याजाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी कर्जदार यांना त्यांच्या बचतीची सर्व रक्कम लिंक केलेल्या फ्लेक्सी होम बचत खात्यात जमा करण्याचा पर्याय असेल .
- दिवसाच्या शेवटी कर्ज खात्याशी जोडलेल्या फ्लेक्सी होम बचत खात्यामध्ये उपलब्ध असलेली रक्कम ही गृह कर्ज खात्यातील शिल्लक म्हणून गणली जाईल .
- त्यानुसार, कर्जदार यांना संलग्न फ्लेक्सी होम बचत खात्यातील दैनंदिन शिल्लकच्या मर्यादेपर्यंत गृह कर्ज खात्यावरील व्याजाच्या रकमेत लाभ मिळेल .
- या बचत खात्यामध्ये कर्जदारांना सामान्य बचत बँकेच्या नियमांनुसार चेकबुक सुविधा, इंटरनेट बँकिंग सुविधा आणि मोबाईल बँकिंग, इत्यादी सुविधा प्राप्त होतील.
कर्जदारांना फायदा
- जमा केलेली अतिरिक्त रक्कम त्यांच्या वैयक्तिक/व्यावसायिक हेतूसाठी आवश्यक असेल तेव्हा वापरली जाऊ शकते.
- ही योजना लिक्विडीटी, म्हणजे गरजेच्या वेळी रोख रक्कम वापरण्याची मुभा, तसेच व्याजात सवलत देते.
महा सुपर फ्लेक्सी गृह कर्ज – नवीन किंवा विद्यमान घर/फ्लॅट आणि विद्यमान घर/फ्लॅटच्या विस्तारासाठी घेता येईल
क्र. | तपशील | योजनेची मार्गदर्शक तत्त्वे | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | सुविधेचे स्वरूप | बचत खात्याशी जोडलेले मुदत कर्ज खाते . | ||||||
2 | उद्देश |
| ||||||
3 | पात्रता | वैयक्तिक पगारदार कर्मचारी/स्वयंरोजगार व्यावसायिक/व्यावसायिक/कृषी | ||||||
4 | कर्जाची पात्र रक्कम | खालील पद्धतीच्या आधारावर मूल्यांकन केलेल्या पैकी जी सर्वात कमी रक्कम असेल ती या योजेनेमध्ये कर्जाची कमाल रक्कम असेल.
| ||||||
5 | कर्जाची मर्यादा | किमान - रु 50.00 लाख कमाल - कमाल मर्यादा नाही | ||||||
6 | मूल्यासाठी कर्ज आणि मार्जिन मानदंड |
| ||||||
7 | परतफेड कालावधी | कमाल परतफेड कालावधी हा 30 वर्षे किंवा कर्जदाराचे वय 75 वर्षे यापैकी जे आधी येईल, तितके असेल असेल. | ||||||
8 | व्याज दर | या योजनेसाठी "महा सुपर हाऊसिंग लोन स्कीम" या योजनेला लागू असलेल्या विद्यमान व्याज दरा पेक्षा 0.25% अधिक व्याज दर लागू होईल. | ||||||
9 | वजावट | पगारदार व्यक्तींसाठी. सकल मासिक उत्पन्नावर आधारित 80% पर्यंत बिगर-पगारदार व्यक्तींसाठी सरासरी वार्षिक उत्पन्नावर आधारित 80% पर्यंत | ||||||
10 | फ्लेक्सी क्रेडिट व्यवस्था |
| ||||||
11 | तारण | मालमत्तेचे इक्विटेबल / नोंदणीकृत गहाणखत . | ||||||
12 | प्रक्रिया शुल्क | कर्जाच्या रकमेच्या 0.25 % (कमाल रु. 25,000/- च्या) (सध्या 30.09.2024 पर्यंत माफ) राज्य/केंद्र सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे कर्मचारी यांच्यासाठी कर्जाच्या टेकओव्हर मध्ये प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ. |