Beti Bachao Beti Padhao

महाबँक वाहन कर्ज योजना - सेकंडहॅण्ड कार खरेदी
(आधी वापरलेल्या कार)

अ.क्र.

तपशील

योजनेच्या मार्गदर्शक सूचना

1

योजनेचे नाव

महा वाहन कर्ज योजना - सेकंडहॅण्ड कार खरेदीसाठी (आधी वापरलेल्या कार)

2

योजनेचा हेतू

  • 3 वर्षांपेक्षा जुन्या नसतील अशा सेकंड हॅण्ड कार खरेदी करणे.

ज्यांच्याकडून सेकंड हॅण्ड प्रवासी कार खरेदी करता येतील. अशा नोंदणीकृत प्रीओन्ड कंपन्या/फर्म यांची नावे

अ.क्र.

सर्टिफाईड प्री ओन्ड कंपनी/फर्म यांचे नाव

उत्पादकाचे नाव

1.

ट्रू व्हॅल्यू

मारुती सुझुकी लिमिटेड इंडिया

2.

ऑटो टोरेस

होंडा

3.

एच प्रॉमिस

ह्युंदई

4.

टाटा ॲशुअर्ड

टाटा मोटर

5.

टोयोटा यू ट्रस्ट

टोयोटां किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड

6.

महिंद्रा फर्स्ट चॉईस

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड

7

बीएमडब्ल्यू इन्फीनिटी प्लस

बीएमडब्ल्यू

8

ऑडी ॲप्रूव्हड प्लस

ऑडी इंडिया

9

मर्सिडिज प्री ओन्ड कार

मर्सिडीज बेन्झ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

10

ॲथराईज्ड प्री ओण्ड कार प्लॅटफॉर्म

कार देखो, ओएलएक्स कार, कार ट्रेड, कार 24)

वरील सर्वांच्या संदर्भात, वाहनांचे वय 3 वर्षांपेक्षा अधिक असू नये आणि कमाल मर्यादा 1,50,000 किलोमीटर पेक्षा अधिक असू नये/ वाहनाने पार केलेले किलोमीटर.

3

पात्रता

  • केंद्र सरकार/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना/सरकार अनुदानित शिक्षण संस्था/प्रायव्हेट/पब्लिक लिमिटेड कंपनी इत्यादी यांचे कायम कर्मचारी-सलग सेवा 1 वर्षापेक्षा अधिक असावी.
  • केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक आस्थापना यांचे कर्मचारी ज्यांना निवृत्तीवेतन दरमहा किमान रु. 25000/- एवढे आहे.
  • स्वयंरोजगार असलेले व्यावसायिक जसे की, सीए, डॉक्टर, आर्किटेक्ट, कंपनी सेक्रेटरी, ॲडव्होकेट, सीएमएसइ. ज्यांची स्वत:ची प्रॅक्टीस आहे असे.
  • उद्योजक/स्वतंत्र व्यावसायिक ज्यांचा नियमित उत्पन्नाचा स्रोत आहे असे.
  • जमीन धारण करणारे शेतकरी जे सुदृढ अशी शेती आणि तत्संबंधी अन्य कामकाज करतात ते.
4

किमान वार्षिक उत्पन्न

  • पगारदारांसाठी - रु. 3.00 लाख (गेल्या वर्षीचे उत्पन्न) गेल्या किमान 2 वर्षांचे आयटीआर/मालकांकडून फॉर्म 16 आवश्यक.
  • अन्य व्यक्तीसाठी - रु. 3.00 लाख (गेल्या वर्षीचे उत्पन्न) गेल्या किमान 2 वर्षांचे आयटीआर त्या संबंधित कागदपत्रांसह.
5

पात्र कर्ज रक्कम

कर्जाच्या कमाल रकमेची निश्चिती मान्य वजावट रकमेच्या आधारे करण्यात येईल.

किमान - रु. 2.00 लाख

कमाल - रु. 50.00 लाख

पुढील बाबतीत कमाल कर्जरक्कम कमीत कमी असेल.

सर्टिफाईड प्री ओन्ड कार डिलर यांनी जारी केलेल्या प्री-ओन्ड कारच्या किंमत प्रमाणपत्राच्या 70% रक्कम.

किंवा

मोटार इन्शुअरन्स पॉलिसीनुसार घोषित केलेल्या किमतीच्या (आयडीव्ही) 100% एवढी रक्कम.

6

मार्जीन

प्रमाणपत्रधारक प्री-ओन्ड कार डिलरने जारी केलेल्या वाहनाच्या किंमतीच्या किमान 30% एवढी रक्कम किंवा मान्यतापात्र डिलरने जारी केलेल्या बिलाच्या रकमेच्या 30% एवढी रक्कम.

7

परतफेडीचा कालावधी

कमाल 60 महिने

8

व्याजाचा दर

व्याजदर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

9

परतफेड हप्ता

प्रस्तावित मासिक हप्ता रकमेसहित. एकंदर परतफेडीची रक्कम-एकूण मासिक पगाराच्या (पगारधारकांसाठी) 65% पेक्षा अधिक असू नये/एकंदर वार्षिक सरासरी उत्पन्न (पगारदार नसलेल्यांसाठी)

10

तारण

खरेदी केलेल्या वाहनाचे गहाण तारण.

11

प्रक्रिया शुल्क

कर्ज रकमेच्या 0.50%

किमान रु. 500/-