Beti Bachao Beti Padhao

डॉक्‍टरांसाठी महाबँक कर्ज योजना

निकष

तपशील

पात्र गट

डॉक्टर : किमान पात्रता BAHMS/BAMS/BPT/MBBS/BDS असलेले पात्र नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीक .

 • वैधानिक / नियामक प्राधिकरणाकडून आवश्यक मंजूरी / नोंदणी असणे आवश्यक आहे आणि शिक्षण व नोंदणी नंतर किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विकास कायदा २००६ अंतर्गत सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उपक्रम म्हणून वर्गीकृत होण्यास पात्र आणि त्यांच्याकडे उद्यम नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उद्देश

 • रुग्णालये /क्लिनिक्स/नर्सिंग होम्स/ फिजिओथेरपी सेंटर्स, पॉलीक्लिनिक्स, पॅथॉलॉजिकल लॅब, डायग्नोस्टिक सेंटर, नेत्र केंद्र, ईएनटी केंद्रे, स्किन क्लीनिक, दंत चिकित्सालय, डायलिसिस सेंटर, एंडोस्कोपी केंद्रे, IVF केंद्रे, पॉली क्लिनिक, क्ष-किरण प्रयोगशाळा इ. यांसारखे लहान आणि मध्यम आकाराचे सेंटर सुरू करण्यासाठी मालकी तत्वावर जागा संपादन करण्यासाठी कर्ज देण्याचा उद्देश आहे. राज्य/केंद्र सरकारच्या कायद्यांतर्गत परवाना/नोंदणी आवश्यकतांच्या पूर्ततेच्या अधीन.
 • सहायक उपकरणे, फर्निचर आणि फिक्स्चर, फर्निशिंग, व्यावसायिक साधने, संगणक, UPS, सॉफ्टवेअर इत्यादींसह वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी.
 • विद्यमान केंद्राचे नूतनीकरण, विस्तार आणि आधुनिकीकरण यासाठी.
 • वैद्यकीय व्यवसायासाठी वाहने, रुग्णवाहिका इत्यादींची खरेदी.
 • रुग्णालये / दवाखाने / नर्सिंग होम इत्यादींमध्ये वैद्यकीय वापरासाठी पॉवर बॅकअपसह ऑक्सिजन संयंत्र स्थापित करणे यासाठी.
 • औषधांचा साठा करण्यासाठी कार्यरत भांडवलासाठी

सुविधेचे स्वरूप

 1. मुदत कर्ज
 2. कॅश क्रेडिट

कर्जाची मर्यादा

 • किमान : रु. १०.००० लाखांपेक्षा जास्त
 • कमाल : रु. २५.०० कोटी पर्यंत

व्याज दर

 • RLLR आधारित
 • संपार्श्विक प्रदान केले असल्यास ROI कमी करण्याच्या मार्गाने प्रोत्साहन
 • 5 कोटी रु. पर्यंतच्या कर्जासाठी CGTMSE कव्हर उपलब्ध

मार्जिन

 • २००.०० लाखांपर्यंत : मुदत कर्ज- प्रकल्प खर्चाच्या २०%, वाहन- १५% ऑन-रोड किमतीवर आणि CC-२५%
 • २००.०० लाखांपेक्षा जास्त: मुदत कर्ज- २५% आणि CC-२५%

परतफेड

कमाल १२ वर्षांपर्यंत

फी आणि चार्जेस

मार्गदर्शक सूचनांनुसार


आत्ताच अर्ज करा