Azadi ka Amrit Mahatsav

राष्ट्रउभारणीच्या प्रवासातील बँकेचे महत्त्वाचे टप्पे

नोंदणी तारीख: 16-09-1935 रोजीनोंदणीकृत

21-10-1935 रोजी प्रस्तुत केलेल्या माहिती पुस्तिकेमधील नमूद केलेली प्रतिबद्धता:

“संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार निश्चयपूर्वक करणे आणि संधीमिळेल त्याप्रमाणे, महाराष्ट्राबाहेरही सर्वसाधारण जनतेला विविध सेवा देणेहे बँकेचे मुख्य ध्येय असेल.त्याचवेळी दुसरीकडे उच्च पातळीवरचीसुरक्षितता आणि कार्यक्षमता आत्मसात करुन व्यापार-व्यवसायाला आणि औद्योगिकक्षेत्रालाही सातत्याने साहाय्य करणे, हे देखील बँकेचे एक मुख्य उद्दीष्टअसेल.

1936: 08-02-1936 रोजपुण्यात कामकाजाला सुरुवात.

1938: बँकेच्या दुस-या शाखेचा फोर्ट, मुंबई येथे शुभारंभ.

1940: तिस-या शाखेचा डेक्कन जिमखाना, पुणे येथे शुभारंभ.

1944: शेडय़ूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त

1946: ठेवींनीएककोटींचाटप्पाओलांडला द महाराष्ट्र एक्झिक्यूटर अँड ट्रस्टी कंपनी या पूर्णपणे स्वत:च्या मालकीच्या सलग्न कंपनीची उभारणी.महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या शाखेचा हुबळी येथे शुभारंभ (म्हैसूर संस्थान, आता कर्नाटक).

1949: आंध्र प्रदेशापर्यंत विस्तार :हैद्राबाद शाखेचा शुभारंभ.

1963 गोव्यात विस्तार :पणजीमध्ये शाखेचा शुभारंभ.

1966: मध्यप्रदेशमध्येविस्तार: इंदूर शाखेचा शुभारंभ गुजरातमध्येप्रवेश:बडोदा शाखेचा शुभारंभ.

1969: अन्य 13 बँकांबरोबर राष्ट्रीयीकरण दिल्लीत प्रवेश : 19-12-69 रोजी करोलबाग शाखेत शुभारंभ

1974: ठेवी आधाराने रु.100 कोटींचा टप्पा ओलांडला.

1976: मराठवाडा ग्रामीण बँक, पहिल्या “आरआरबी` - विभागीय क्षेत्रीय बँकेची 26/08/1976 रोजी स्थापना

1978: भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांच्या शुभहस्ते नव्या मुख्य कार्यालयाचेउदघाटन ठेवींच्या आकडय़ाने रु.500 कोटींचा टप्पा ओलांडला..

1979 : संशोधन-विस्तारीत कार्य आणि शेतक-यांना अधिक व्यापक स्वरुपात सेवापुरवण्याच्या दृष्टीनेसार्वजनिक न्यास म्हणून नोंदणी करण्यात आलेल्या “महाबँक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान`ची स्थापना

1985 : तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते नरिमन पॉइंट, मुंबई येथे महाराष्ट्रातील 500 व्या शाखेचा शुभारंभ या शाखेत पहिले अत्याधुनिक लेजर पोस्टींग मशीन (एएलपीएम)स्थापित करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या शुभहस्ते सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सोहळ्यांचा शुभारंभ

1986 : ठाणे ग्रामीण बँक पुरस्कृत

1987 : भारताचे माननीय उपाध्यक्ष डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभहस्ते इंदिरा वसाहत, बीबवेवाडी, पुणे येथे बँकेच्या 1000व्या शाखेचा शुभारंभ करण्यात आले.

1991 :“महाबँक फार्मर क्रेडिट कार्ड`चा शुभारंभ देशांतर्गत क्रेडिटकार्ड क्षेत्रात पदार्पण मेन फ्रेम कॉम्प्युटर स्थापित “स्विफ्ट` चे सदस्यत्व

1995 : हीरक महोत्सवी वर्षाचे सोहळा - डॉ.सी रंगराजन, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्रमुख पाहुणे. ठेवींनी रु. 5000 कोटींचा टप्पा ओलांडला.

1996 :आतापर्यंतच्या “सी` वर्गातून `ए` वर्गात प्रवेश.स्वायत्तता मिळाली..

2000 : ठेवींनी 10000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला

2004 : शेअर्सचे सार्वजनिक वितरण- 24% मालकी सार्वजनिक. बीएसई आणि एनएसईमध्ये सूचीबद्ध.

2005 : बँकॅश्युरन्स आणि म्युच्युअलफंड वितरण व्यवसायाचा प्रारंभ

2006 : एकूण व्यवसायाने रु.50,000कोटींची पातळी ओलांडली. शाखांमध्ये सीबीएस प्रणाली सुरु करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ.

2009 : निष्ठापूर्वक राष्ट्रसेवेच्या 75 व्या वर्षात पदार्पण. एकात्मिक सर्वांगीण विकासाच्या उपक्रमान्वये 75 मागासलेली गावे दत्तक घेतली.

2010 : 100% शाखांचे सीबीएस साध्य - एकूण व्यवसायाने रु.एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला.प्लॅटिनम वर्षात 76 शाखांचा शुभारंभ -शाखांची एकूण संख्या 1506 प्लॅटिनम ज्युबिली वर्षाचा समारोप सोहळा - भूतपूर्व अर्थमंत्री श्रीप्रणब मुखर्जी यांच्या हस्तेविज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संपन्न नव्या संकल्पना - उदा. महाचेतना, पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे ई-लाऊंजचा शुभारंभ, मायक्रो ऍसेट वसुली कक्षांची अंमलबजावणी..

2011 : पहिल्या बचत गट शाखेचे पुणे येथे उदघाटन.पुणे येथे पहिली एसएचजी शाखा उघडण्यात आली. बँक पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 100% सीबीएस साध्य - विक्रमी 77 दिवसांमध्ये77 व्या वर्धापन/स्थापना दिनाचा सोहळा मा. भूतपूर्व अर्थमंत्री श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेया प्रसंगी 5 विशेष शाखा बचत गटांना समर्पित आणि 5 मिड-कॉर्पोरेट शाखांचे शुभारंभ. भूतपूर्व केंद्रीय अर्थमंत्री यांची बँकेच्या प्रधान कार्यालयालापहिली भेट - (भूतपूर्व)मा. अर्थमंत्री श्री प्रणव मुखर्जी यांची 7-11-2011 रोजी बँकेच्या लोकमंगल येथील मुख्यालयाला भेट

Sept 2012: मा. केंद्रीय अर्थमंत्री श्री पी चिदंबरम यांच्या हस्ते 25-08-2012 रोजी राजगंबीरम येथील 1624 व्या शाखेचे उदघाटन. सप्टें.2012 बँकेच्या एकूण व्यवसायाने रु.1,50,000 कोटींचाटप्पा ओलांडला आणितो रु.1,51,320 कोटींपर्यंत गेला.’बँक ऑफ महाराष्ट्र’ला 2012 साठी ’द संडे स्टॅन्डर्ड’तर्फे सर्वोत्कृष्ट बँकर - ग्राहक मित्रत्व पुरस्कार ऍसेट क्वालिटी प्रकारान्वये सर्वोत्कृष्ट सार्वजनिक क्षेत्रातीलबँक म्हणून डन अँड ब्रॅडस्ट्रीट - पोलॅरिस आर्थिक तंत्रज्ञान बँकींग पुरस्कार 2012प्राप्त बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे पुणे येथे 24 व 25 नोव्हेंबर 2012 रोजी बॅन्कॉन आयोजित.मा. केंद्रीय अर्थमंत्री श्री पी चिदंबरम यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन..एकूणव्यवसायानेरु. 2.00 लाखकोटींचा टप्पा पूर्ण केला

2013 : दिल्लीतील सोनिया गांधी यांनी रुपे कार्ड लॉन्च सुरू केली.50 शाखा 15 ऑगस्ट 2013 रोजी उघडल्या एकूण व्यवसाय क्रॉस रु. 2.00 लाख कोटी|

2014 : 162 नवीनशाखांचेउद्घाटन; एकावर्षामध्येउघडण्यात येणारी सर्वात जास्त संख्या ज्यामुळे, शाखेचेनेटवर्क 18 9 0 पर्यंतजाऊन पोहोचले.1199 एटीएमस्थापितकरुनएकूणसंख्या 1827 पर्यंतपोहोचली.बँकेचास्वत:चालागू केलेला ईएफटीस्विच कार्यान्वित करण्यात आला

2015 : 26 नवीनशाखा; शाखानेटवर्क 188 9 पर्यंतपोहोचले "महामोबाइल" - मोबाइलबँकिंगअनुप्रयोगलाँच करण्यात आला आयएसओ 27001:2013: डेटा सेंटर, डीआर सेंटर, पीएमओ आणि एचओ-आयटीसाठी प्रमाणन

2016: बँकेने 2.50 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. "महासेक्युअर" योजना कार्यान्वित करण्यात आली. कोणतेही फिशिंग हल्ले नोंदवले न गेल्याने इंटरनेट बँकिंगसाठी अर्ज करण्यात आला. आयबीए - बँकिंग तंत्रज्ञानातर्फे दिला जाणारा "सर्वोत्तम वित्तीय समावेशन पुढाकार (बेस्ट फायनांशियल इंल्क्यूजन इनिशिएटिव्ह" पुरस्कार प्राप्त झाला