Azadi ka Amrit Mahatsav

आमचे ध्येय

ग्राहकांच्या अपेक्षांना जलद आणि कार्यक्षम प्रतिसाद मिळेल याची खात्री बाळगणे
समाजातील विविध घटकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी योजना आणि सेवा यात नावीन्य आणणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने अवलंब करणे
सक्रिय, व्यावसायिक आणि वचनबध्द कर्मचारीवर्गाची उभारणी करणे.
सर्वोत्कृष्ट कार्यपध्दती आणि कॉर्पोरेट पध्दतीच्या प्रशासनाव्दारे भागधारकांच्या संपत्तीत वाढ करणे
शाखांच्या विस्ताराव्दारे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवेश करणे
समाजातल्या विविध घटकांना सेवा देत, जागतिक पातळीवर स्थान निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकत, भागधारकांचे आणि कर्मचा-यांचे मूल्य वाढवित एक चैतन्यमय, दूरदर्शी, तंत्रसिध्द आणि ग्राहकानुवर्ती बँक म्हणून बँकेचे अस्तित्व सिध्द करणे, हे बँकेचे चालू वर्षाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

आमचे बोधचिन्ह

आमच्या शाखा-सेवेचे प्रतीक

या बोधचिन्हातील तीन “एम` म्हणजे तीन प्रतीके आहेत
म्हणजेच - गतिमान अर्थचलन
कार्यपद्धतींचे आधुनिकीकरण आणि
कर्मचा-यांना निरंतर प्रेरित करणे