Beti Bachao Beti Padhao

सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड

सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड हे मुदत ठेवीचे तारण असलेले प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आहे. या द्वारे आपण आपण आपली मुदत ठेव, म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट, ही खरेदी/ऑनलाइन व्यवहार इत्यादींसाठी वापरू शकता. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर आकर्षक व्याज मिळण्याबरोबरच व्याजमुक्त क्रेडिट कालावधीचा लाभ देखील मिळतो. शिवाय, ग्राहकांना त्यांच्या खरेदी व्यवहारांवर आकर्षक रिवॉर्ड्स देखील मिळू शकतात ज्यांच्या बदल्यात व्हाउचर/वस्तू मिळवता येतील शकतात.

फायदे :

  • क्रेडिट हिस्टरीची आवश्यकता नाही.
  • उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही.
  • जॉइनिंग फी नाही.
  • झटपट मान्यता.
  • आकर्षक पेर्सनलाईज्ड कार्ड.
  • वयाच्या मर्यादेत सूट.

इतर फायदे :

  • प्रति महिना रु.200.00 पर्यंत इंधन अधिभार, म्हणजे फ्युएल सरचार्ज माफ.
  • निवडक 30+ देशांतर्गत विमानतळ लाउंज वापरासंदर्भातील लाभ - प्रति तिमाही दोनदा.
  • कार्डद्वारे केलेल्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट जमा करण्याची सोय. प्रत्येक रु.100.00 किंवा त्याच्या पटीसाठी एक रिवॉर्ड पॉइंट. जमा झालेले पॉइंट ई-व्हाउचर/वस्तू इ. मध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात.
  • रु.2500.00 पेक्षा जास्तीचा खर्चा सुलभ मासिक हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय. सोने/दागिने खरेदीसाठी केलेला व्यवहाराला याची परवानगी नाही.
  • मोफत अॅड-ऑन कार्ड.

पात्रता :

  • किमान वय: 18 वर्षे.
  • किमान फ्रीहोल्ड एफडी रक्कम: रु.12500.00.

आवश्यक कागदपत्रे :

  • बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मुदत ठेव.
  • केवायसी दस्तऐवज जसे की पॅन आणि आधार.

फी आणि शुल्क :

  • दुसऱ्या वर्षांपासून वार्षिक शुल्क रु.500.00. आदल्या वर्षात कार्डचा वापर रु.30,000.00 किंवा त्याहून अधिक खर्चासाठी असल्यास वार्षिक शुल्क माफ.
  • इतर शुल्क सर्वात MITC, म्हणजेच MITC सर्वात महत्वाच्या अटी आणि शर्ती  नुसार आहेत. 

आपले फिक्स्ड डिपॉझिट तारण असलेले-प्लॅटिनम कार्ड तीन सोप्या चरणांमध्ये मिळवा

नोंदणी करा आणि आपले तपशील सत्यापित करा 🡪आपले फिक्स्ड डिपॉझिट निवडा आणि मर्यादा ठरवा करा 🡪आपले कार्ड तयार आहे .

सिक्युअर्ड क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा