Azadi ka Amrit Mahatsav

BoM क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

 • क्रेडिट कार्ड म्हणजे विश्वासाच्या आधारावर नंतर पैसे देण्याच्या सुविधेने झटपट खरेदी करण्याकरिता देण्यात आलेले साधन. डेबिट कार्ड जशी आपल्या बँक खात्याशी संलग्न असतात तसे हे कार्ड नसून प्रत्येक व्यवहारानंतर डेबिड कार्ड खात्यातून ती रक्कम वजा होते, तर क्रेडिट कार्ड तुम्हाला व्यवहार करण्याची कर्जाऊ सुविधा, आपल्या बँक खात्याचे स्वातंत्र्य प्रदान करते; मात्र ही रक्कम आधी सुनिश्चित केलेल्या कर्जमर्यादेच्या अखेरच्या तारखेपर्यंत परत करायची असते, आणि प्रत्येक क्रेडिट कार्डला कर्ज रकमेची एक मर्यादा असते, त्या पलिकडील रकमेचा व्यवहार करता येत नाही.
 • क्रेडिट कार्ड जलदगती, त्रासमुक्त आणि गरज असेल तेव्हा त्वरित रोख रक्कम उपलब्ध करून देते.

बँक ऑफ महाराष्ट्रकडे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याकरिता पात्रता निकष

 • निवासी भारतीय
 • वैयक्तिक व्यक्ती फक्त
 • किमान वय २१ आणि कमाल वय ६५ वर्षे
 • पगारदार मासिक नियमित उत्पन्न दरमहा
 • किमान रू ३०,००० आणि उद्योजक/स्वयंरोजगारित व्यक्ती/व्यावसायिक यांच्यासाठी वार्षिक उत्पन्न किमान रू. ३,६०,०००/- असावे.

क्रेडिट कार्ड प्राप्त करण्यासाठी या सर्वसाधारण अटी आहेत, मात्र आपल्या संबंधित शाखेकडून अतिरिक्त निकषही मागितले जाऊ शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्र यांचे क्रेडिट कार्ड कोणत्या प्रकारचे आहे?

व्हिसा इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पगारदार व्यक्तींसाठी

 • केवायसी कागदपत्रे
 • अलिकडचे पगारपत्र, ट्रेसेस वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला फॉर्म १६
 • गेल्या एक वर्षाचे पगाराच्या बँक खात्याचे स्टेटमेंट

पगारदार व्यक्तींव्यतिरिक्त

 • केवायसी कागदपत्रे
 • संस्थेच्या नोंदणीचा पुरावा
 • ताळेबंदासह आरटीआर
 • उद्योगाचे गेल्या वर्षभरातील बँक खात्याचे स्टेटमेंट
 • संस्था नफ्यात आहे हे दर्शविणारे अलिकडचे ताळेबंद/नफा-तोटापत्रक

बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा ?

 • आपल्या गृहशाखेत जाऊन.

बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डचे फायदे कोणते?

महत्त्वाचे फायदे

 • ग्राहकांकरिता रू. १.५० लाखपर्यंत मर्यादा उपलब्ध
 • अर्जदारांसाठी क्रेडिट कार्ड जारी करण्याचे मूल्य माफ केलेले आहे.
 • अतिरिक्त कार्ड जारी करण्याचे मूल्य नाही
 • कार्डधारकाने या कार्डामार्फत वर्षभरात किमान ३०,०००/- रूपयांची खरेदी करून त्याचे मूल्य प्रदान केले तर नूतनीकरणाचे मूल्य माफ
 • बँकेच्या धोरणानुसार रू. ५० लाख ते रू. १.५० लाखपर्यंत विमाविरहित क्रेडिट कार्ड
 • २०% पर्यंत रोख रकमेची मंजूर मर्यादा
 • परतफेडीसाठी लवचिक सुविधा उपलब्ध
 • ईएमआय सह/ईएमआय विरहित बॅलन्स ट्रान्स्फर सुविधा उपलब्ध

कस्टमर सेल्फ केअर मोड्यूल (सीएससीएम) वर क्रेडिट कार्ड कार्यान्वित कसे करावे

आपणास प्रत्यक्ष पिनव्यतिरिक्त आणि सुरक्षाविषय कारण आणि कार्डाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी ‘निष्क्रिय’ अशा स्वरूपाचे कार्ड देण्यात येईल. सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कस्टमर केअर वेब पोर्टल https://creditcard.bankofmaharashtra.in/ वर स्वत:ची नोंदणी करावी. सदरचा टप्पा क्रेडिट कार्ड सक्रीय करणे, ग्रीन पिन तयार करणे यासाठी आवश्यक आहे; पुढे नमूद करण्यात आलेली चॅनेल मूलता ‘निष्क्रीय’ असतील ती ग्राहकांनी ‘सक्रीय’ करावयाची आहेत.

 1. इलेक्ट्रॉनिक - कॉमर्स (ई-कॉम)
 2. नियर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी - टॅप अॅण्ड पे/ कॉन्टॅक्टलेस पेमेंट)
 3. इंटरनॅशनल ट्रॅन्झॅक्शन्स

फर्गेट पासवर्ड सुविधा कशी वापरावी?

 1. वेब ब्राऊसरद्वारे कार्ड ॲक्टीव्हेशन पोर्टल https://creditcard.bankofmaharashtra.in/ वर लॉगइन करावे - न्यू यूजर रजिस्ट्रेशन - एंटर डीटेल्स - कंटिन्यू - मोबाईल/ई-मेल वर आलेला ओटीपी एंटर करावा- व्हॅलिडेट - टाईप पासवर्ड - सबमिट

बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डवर ईएमआय सुविधा उपलब्ध आहे का?

 • होय, किमान ५०,००० रुपये रक्कम ईएमआयमध्ये परावर्तीत करता येईल.
 • ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीचे म्हणजे ३/६/९/१२/१८/२४ महिन्यांचे ईएमआय करून परतफेड करता येईल.

ग्राहकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री नंबर/तकारनिवारण पोर्टल आहे का?

 • होय, टोल फ्री नं १८०० २३३ ४५२६ / १८०० २०२ २६३६ जर कार्ड हरवले/चोरीस गेले/ गैरवापर झाला तर या क्रमांकावर फोन भरून त्वरित ब्लॉक करता येईल.

बीओएम क्रेडिट कार्ड बिल भरणा

बीओएम क्रेडिट कार्डची सर्वात महत्त्वाची अटी व शर्ती

ॲप्लिकेशन डाऊनलोड करा (अर्ज डाऊनलोडिंग करण्यासाठी लिंक )