Azadi ka Amrit Mahatsav

फॅटका-सीआरएस

फॅटका (FATCA) म्हणजे काय?

फॉरेन अकाऊंट टॅक्स कंप्लायन्स (एफएटीसीए) म्हणजे यू एस टॅक्स रेग्युलेशन्स म्हणजे अमेरिकन सरकारने अमेरिकन नागरिकांना कर चुकवू नये यासाठी आणलेला कायदा आणि या कायद्याची अंमलबजावणी इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हीस (आरएस) यामार्फत करण्यात येते. फॅटकाचा प्राथमिक हेतू म्हणजे अमेरिकेशी (यू.एस) संबधित नसलेल्या अन्य देशांमधील माहिती काढणे.

अमेरिकन नागरिकांच्या संदर्भात फॅटकामुळे जर कोणी अमेरिकन नागरिक कर चुकवीत असेल तर त्यांना शोधणे आणि त्यांच्या विदेशातील मालमत्तेवर कर जमा करणे शक्य होते.

सीआरएस (CRS)म्हणजे काय?

सीआरएस म्हणजे कॉमन रिपोर्टिंग. स्टॅण्डर्ड याचा प्राथमिक हेतू विदेशातील करचुकवेगिरी थांबवणे, बेहिशेबी पैसा विदेशात नेऊन गुंतविण्याची कृती विविध देशांमधील माहिती एकमेकांना देऊन थांबविणे हा आहे. सीआरएस मध्ये ९८ देश सहभागी आहेत.