Beti Bachao Beti Padhao

बँक गॅरंटीबाबत स्पष्टीकरण

  • अ) बँकेकडून जारी करण्यात येणारी रु. ५०,०००/- पेक्षा अधिक रकमेची गॅरंटी बँकेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून यथायोग्य पद्धतीने स्वाक्षरी करून जारी करण्यात येईल. रु. ५०,०००/- पेक्षा अधिक रकमेची बँक गॅरंटी एका व्यक्तीच्या स्वाक्षरीने असेल तर ती वैध असणार नाही.
  • ब) आवश्यक असल्यास बँक गॅरंटीबाबत निश्चितता ही विहित पद्धतीने बँकेच्या विभागीय अधिकार्‍याक्डून जारी करण्यात येईल. विभागीय कार्यालयांची पत्त्यासह यादी या ठिकाणी (येथे) देण्यात आली आहे.
  • क) आमची बँक गॅरंटी ही नियुक्त करण्यात आलेल्या बँकेसाठी स्ट्रक्चरल फिनान्शिअल सिस्टीम (एमएफएमएस) द्वारा कव्हरिंग लेटर जारी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये बँकेची गॅरंटी नंबर, अर्जदाराचे नाव, रक्कम, नाव आणि लाभधारकाचा पत्ता, बँक गॅरंटी समाप्त होण्याची तारीख आणि असल्‍यास बँक गॅरंटी मागण्याची तारीख याचा उल्लेख करण्यात आल्यानंतर कार्यरत होईल.
  • ड) कोणत्याही बँक गॅरंटी त्यासह एमएफएमसीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या पत्रासह नसेल तर ती बँकेवर बंधनकारक नाही.
  • ई) बँक गॅरंटीच्या संबंधित अन्य कोणत्याही माहितीसाठी पुढे नमूद करण्यात आलेल्या संबंधित बँक अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

असिस्टंट जनरल मॅनेजर,
क्रेडिट डीपार्टमेंट, हेड ऑफिस,
लोकमंङगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-०५.
दूरध्वनी : ०२०-२५६१४३८२/२५३
Email ID: agmcredit@mahabank.co.in