Beti Bachao Beti Padhao

अर्हता/पात्रता

कोणीतीही व्यक्ती, व्यक्तिगत मालकी किंवा भागीदारी संस्था/पतपेढी किंवा वैध व्यक्ति म्हणजेच संस्था किंवा कंपनी अथवा विश्वस्त, कॉर्पोरेट संस्था, शासकीय/निमशासकीय खाती/विभाग, सरकारद्वारा स्थापना केलेली एक विकास संस्था हे चालू खाते उघडू शकतात.खाते उघडण्यासाठी बँकेद्वारा ठरवून दिलेल्या बँक खाते उघडण्याच्या अर्जामध्ये सदर करणे आवश्यक आहे.अर्जदाराला लागू पडतील तसे आणि फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने ओळख आणि पत्त्याचा पुरावा, दोन छायाचित्र आणि पॅन नंबर / फॉर्म क्रमांक 60/61 सादर करून केवायसी नियम पूर्ण करावेत जेणेकरुन नवीन खाते उघडता येईल.

खात्यातील किमान शिल्लक

खाली नमूद केल्याप्रमाणे मासिक सरासरीवर खात्यात किमान शिल्लक राखावी.: 

महानगरी / शहरी / निमशहरी शाखांमध्ये: 5,000 / -

ग्रामीण शाखा रू. 2,000 / -

खात्यामध्ये मासिक सरासरी किमान शिल्लक कायम राहिली नाही तर प्रत्येक तिमाहीत सेवा शुल्क आकारले जाईल. 

वेबसाईटच्या होम पेज आकारले जाणारे "सेवा शुल्क" चे तपशील दिले आहे. सर्व शाखांमध्ये शाखा व्यवस्थापक / उपशाखा व्यवस्थापक यांच्याकडे देखील उपलब्ध आहेत.

नामांकन

नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

व्याज

या खात्यावर कोणतेही व्याज दिले जात नाही .

इतर फायदे

  • खातेधारक खातेदाराकडून दुस-या खात्यात पैसे हस्तांतरण, वीज बिले भरणे, विमा प्रीमियम, दूरध्वनी बिल, कर, कर्ज हप्ता इ. सेवा शुल्क आकारले जाते. लागू असणारे शुल्क प्रत्येक शाखेत तसेच बँकेच्या वेबसाइटवर असलेल्या सेवा शुल्क पत्रकामध्ये नमूद केलेले आहेत.
  • टेलीबॅंकिंग सुविधा, एसएमएस बँकिंग सुविधा, मोबाइल बँकिंग सुविधा आणि इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध आहे.
  • मोफत महाबँक रुपे डेबिट कार्ड
  • मुदत ठेवीवरील व्याज या खात्यात जमा करता येईल येते.