Beti Bachao Beti Padhao

ग्राहकांना सूचना

बँक ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर विविध व्यवहार, माहितीपूर्ण, प्रचारात्मक, शैक्षणिक एसएमएस पाठवित असते. ही सेवा सध्या खातेधारकांसाठी विनामूल्य आहे.

ग्राहकांना एसएमएस अलर्ट पाठवण्यामध्ये होत असलेला खर्च पाहता, 01/07/2017 पासून व्यवहार संबंधित एसएमएस पाठविण्यासाठी ग्राहकांकडून खालील शुल्क वसूल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे -

चालू / बचत / कॅश क्रेडिट: रु. 15 / - + कर प्रत्येक तिमाहीत

ही रक्कम तिमाहीच्या सुरुवातीस वजा केली जाईल.

डीफॉल्ट सदस्यता:

विद्यमान तसेच नवीन ग्राहक जो खालील आवश्यकता पूर्ण करेल, स्वयंचलितपणे सदस्यता घेतलेली नसतांना देखील एसएमएस अॅलर्ट सुविधेसाठी सदस्यता घेईल आणि त्यासाठी शुल्क आकारले जाईल

  • चालू, बचत, ओव्हरड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिट खातेधारक
  • खातेधारक ज्यांचा मोबाइल नंबर बँकेकडेनोंदणीकृत आहे
  • नवीन खाते धारकांनी खाते उघडताना सदस्यत्व घेतले नसल्यास

एसएमएस शुल्क सवलत श्रेण्या:

  • बीएसबीडीए / एफआय / पीएमजेडीवाय खातेधारक
  • पेन्शन खातेधारक

सबस्क्रिप्शन / विना-सबस्क्रिप्शनसाठी पर्याय:

आपल्याला शुल्क आकारले जाऊ नये असे ग्राहकांना वाटत असल्यास व्यवहारविषयक एसएमएस ऍलर्ट्सची सदस्यता रद्द करण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे

  • गृह शाखेमध्ये अर्ज देऊन
  • जर ग्राहकाकडे एकापेक्षा जास्त खाती असतील तर त्यांना प्रत्येक खात्यासाठी सबस्क्रिप्शन घेणे / सबस्क्रिप्शन रद्द करणे यासाठी वेगवेगळे अर्ज करणे आवश्यक आहे
  • ग्राहकाला 01/07/2017 पासून एसएमएस अलर्ट शुल्क भरण्याची इच्छा नसल्यास, सदस्यता रद्द करण्यासाठीचा अर्ज 30/06/2017 रोजी किंवा त्यापूर्वीच देणे आवश्यक आहे.

जर खातेदार पुढील तिमाहीच्या सुरुवातीस आपली सदस्यता रद्द करित असेल तर लगेच त्यावर शुल्क आकारले जाणार नाही, मात्र त्या ग्राहकाला चालू तिमाहीत शुल्क आकारले जाईल. सदस्यता रद्द केल्यानंतर अशा ग्राहकांना फक्त अनिवार्य अलर्ट, माहितीपूर्ण आणि शैक्षणिक एसएमएस मिळतील आणि इतर एसएमएस अलर्ट मिळणार नाहीत.

सर्व ग्राहकांना अशी विनंती आहे की वरील माहितीची त्यांनी नोंद घ्यावी.

बँक ऑफ महाराष्ट्रसाठी,
दिनांक – 3 जून 2017
महाव्यवस्थापक
संसाधन नियोजन