Beti Bachao Beti Padhao

ग्रामीण महिला व बालिक विकास मंडळ (जीएमबीव्हीएम)

जीएमबीव्हीएम वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा      GMBVM.IN


जीएमबीव्हीएम ची महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • मुंबई ट्रस्ट ऍक्ट अन्वये1989 मध्ये नोंदणीकृत ट्रस्ट
  • बँक ऑफ महाराष्ट्र आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम)- राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था यांनी स्थापन केलेले मंडळ
  • अध्यक्ष आणि विश्वशस्त मंडळात बँकेतील वरिष्ठ अधिकारी, स्व-मदत गट सदस्य आणि कर्मचा-यांचा समावेश आहे
  • ट्रस्टचे कार्य 95 समर्पित व्यक्तींनी कराराच्या आधारावर केले आहे जे समन्वयक आणि
  • अनिमेटर म्हणून कार्य करतना नफा ना तोटाच्या आधारावर कार्य करतात.

इतर वैशिष्ट्ये

  • स्वमदत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण स्त्रियांना सक्षम बनविणे.
  • उत्पन्न निर्मिती उपक्रम घेण्यासाठी अति लघुसूक्ष्म पतपुरवठा
  • बँक कर्ज म्हणून रु.३६.०८ कोटींच्या सहाय्याने पतपुरवठ्याशी जोडलेले ४९०४ गट आणि ६२५६ स्व-मदत गट
  • महाराष्ट्रातील एनजीओची स्थिती पाहता सरकारच्या ट्रस्टला मदत
  • नाबार्डने वर्ष 2004-05 आणि 2005-06 दरम्यान सर्वोत्तम एनजीओसाठी राज्य स्तरीय करंडक पुरस्कृत केले आहे.

स्त्रियांच्या स्वमदत गटांद्वारे हाती घेतलेले कार्यक्रम

  • लोणचे, पापड, शेवयांयाचे उत्पादन
  • मातीची भांडी, मातीची मूर्ती, गळ्याचे साहित्य, भरतकाम, धूप, उदबत्त्या तयार करणे आकृत्या बनवणे.
  • कृषी उत्पादने आणि गांडुळखतांचे पॅकींग
  • कापड पिशव्या तयार करणे.
  • मार्केटच्या आवश्यकतेनुसार वस्त्रोद्योग निर्मित

भविष्यातील प्रकल्प

  • विकासाच्या कार्यक्रमासाठी लागणा-या निधीउभारणीसाठी भारतीय स्वयंसेवी संस्थांकडे नोंदणी झालेल्या प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क करणे.
  • बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांसाठी स्व-मदत गटांची उभारणी, पत दुवे प्रत्यक्षात आणणे इ
  • नाबार्डचा सहभाग असलेल्या स्व-मदत गटाच्या बँक संधाना अन्वये नवे प्रस्ताव.
  • पुणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर मार्केट आऊटलेट उघडण्यासाठी प्रस्ताव