Beti Bachao Beti Padhao

गॅरंटीड इमर्जन्सी क्रेडिट लाइन (जीईसीएल)

एन

पॅरामीटर

मार्गदर्शक तत्त्वे

1

नाव

  • या योजनेला 'इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस)' असे नाव देण्यात येईल . त्यात खालील घटक असतील, ईसीएलजीएस 1.0 , ईसीएलजीएस 1.0 (विस्तार), ईसीएलजीएस 2.0, ईसीएलजीएस 2.0 (विस्तार), ईसीएलजीएस 3.0, ईसीएलजीएस 3.0 (विस्तार) आणि ईसीएलजीएस 4.0
  • योजनेंतर्गत ज्या कर्ज उत्पादनासाठी हमी दिली जाईल त्याला ' गॅरंटीड इमर्जन्सी क्रेडिट लाइन ( जीईसीएल )' असे नाव देण्यात येईल .
2

सुविधेचे स्वरूप

  1. ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत , ईसीएलजीएस 1.0 ( विस्तार )
    • निधी आधारित खेळते भांडवल मुदत कर्ज
  2. ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत , ईसीएलजीएस 2.0 ( विस्तार ) , ईसीएलजीएस 3.0 आणि ईसीएलजीएस 3.0 ( विस्तार )
    • निधी आधारित खेळते भांडवल मुदत कर्ज
    • नॉन फंड आधारित सुविधा
    • फंड + नॉन फंड या दोन्हींचे संयोजन
  3. ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत
    • निधी आधारित (मुदत कर्ज)
    • नॉन फंड आधारित ( भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी एलसी)
3

पात्रता निकष

  1. ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत
    • 29.2.2020 रोजी सर्व पतपुरवठा संस्थांकडील कर्ज खात्यांची मिळून एकत्रित थकीत रक्कम रुपये 50 कोटी पर्यंत असणारे व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम /व्यक्ती यांना विशिष्ट व्यवसाय उद्देशांसाठी (वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) मध्ये नमूद केल्यानुसार) दिलेले कर्ज पात्र आहेत. कर्जदाराच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी पतपुरवठा संस्थांनी कर्जदाराची एकूण थकबाकी क्रेडिट ब्युरोकडे तपासणे अपेक्षित आहे.
    • ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत पात्र होण्यासाठी, कर्जदाराची खाती 29 फेब्रुवारी 2020 रोजी 60 किंवा कमी दिवस देय ( नियमित , SMA-0 आणि SMA-I) असली पाहिजेत, म्हणजे 29 फेब्रुवारी 2020 रोजी कोणत्याही पतपुरवठा संस्थेद्वारे ती खाती SMA 2 किंवा NPA म्हणून वर्गीकृत केलेली नसावीत.
  2. ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत ( विस्तार )
    • सर्व कर्जदार ज्यांनी ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत सहाय्य घेतले आहे किंवा 31 मार्च 2021 च्या सुधारित संदर्भ तारखेच्या आधारे ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत पात्र असलेले आणि या मार्गदर्शक तत्त्वांच्या इतर अटींची पूर्तता करणारे नवीन व्यवसाय पात्र आहेत .
  3. ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत
    • कामथ कमिटी ऑन रिझोल्यूशन फ्रेमवर्क आणि हेल्थकेअर सेक्टर द्वारे ओळखल्या गेलेल्या 26 कोविड संबंधित तणावग्रस्त क्षेत्रांमधील सर्व व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम ज्यांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे  आणि ज्यांची एकूण थकबाकी 29.02.2020 रोजी रुपये 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि रु. 500 कोटी पर्यंत आहे, असे सर्व उपक्रम पात्र आहेत.
    • ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत पात्र होण्यासाठी, कर्जदाराची खाती 29 फेब्रुवारी 2020 रोजी 60 किंवा कमी दिवस देय ( नियमित , SMA-0 आणि SMA-I) असली पाहिजेत, म्हणजे 29 फेब्रुवारी 2020 रोजी कोणत्याही पतपुरवठा संस्थेद्वारे ती खाती SMA 2 किंवा NPA म्हणून वर्गीकृत केलेली नसावीत.
  4. ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत ( विस्तार )
    • सर्व कर्जदार ज्यांनी ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत सहाय्य घेतले आहे किंवा 31 मार्च 2021 च्या सुधारित संदर्भ तारखेच्या आधारे ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत पात्र असलेले आणि या मार्गदर्शक तत्त्वांच्या इतर अटींची पूर्तता करणारे नवीन व्यवसाय पात्र आहेत.
  5. ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत
    • हॉस्पिटॅलिटी आणि संबंधित क्षेत्रातील सर्व व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम - हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स , मॅरेज हॉल , कॅन्टीन इ ., ट्रॅव्हल आणि टुरिझम , ट्रॅव्हल एजंट , टूर ऑपरेटर , साहसी किंवा हेरिटेज सुविधा , विश्रांती आणि क्रीडा , खाजगी बस ऑपरेटर , कार दुरुस्ती सेवा , भाडे कार सेवा प्रदाते , इव्हेंट / कॉन्फरन्स आयोजक , स्पा क्लिनिक , ब्युटी पार्लर / सलून , मोटर व्हेइकल एग्रीगेटर , सिनेमा हॉल , स्विमिंग पूल , मनोरंजन पार्क , थिएटर , बार , ऑडिटोरियम , योग संस्था , व्यायामशाळा , इतर फिटनेस सेंटर्स कॅटरिंग किंवा स्वयंपाक आणि फ्लोरिकल्चर उत्पादने आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रामध्ये गुंतलेली व्यक्ती - एअरलाइन्स ( शेड्युल्ड आणि नॉन - शेड्युल एअरलाइन्स , चार्टर्ड फ्लाइट ऑपरेटर , एअर अॅम्ब्युलन्ससह ), विमानतळ , विमान वाहतूक सहाय्यक सेवा जसे की ग्राउंड हँडलिंग आणि पुरवठा साखळी , असे कर्जदाराची ज्यांची खाती 29 फेब्रुवारी 2020 रोजी 60 किंवा कमी दिवस देय ( नियमित , SMA-0 आणि SMA-I) आहेत, ते पात्र आहेत .
  6. ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत ( विस्तार )
    • सर्व कर्जदार ज्यांनी ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत सहाय्य घेतले आहे किंवा 31 मार्च 2021/31 जानेवारी 2022 च्या सुधारित संदर्भ तारखेच्या आधारे ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत पात्र असलेले नवीन व्यवसाय आणि या मार्गदर्शक तत्त्वांच्या इतर अटींची पूर्तता केली आहे ते पात्र आहेत.
  7. ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत
    • सर्व रुग्णालये / नर्सिंग होम / दवाखाने / वैद्यकीय महाविद्यालये / लिक्विड ऑक्सिजन , ऑक्सिजन सिलिंडर इ . च्या निर्मितीमध्ये गुंतलेली सर्व विद्यमान युनिट्स , ज्यांची कर्ज खाती 31.03.2021 रोजी 90 किंवा कमी दिवस देय ( नियमित , SMA-0 आणि SMA-I) आहेत, त्यांना साइटवर ऑक्सिजन उत्पादन करणासाठी प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या स्थापनेसाठी रु .2 कोटी पर्यंतच्या मदतीसाठी पात्र आहेत .
  • प्रोप्रायटरशिप , भागीदारी , नोंदणीकृत कंपनी , ट्रस्ट आणि मर्यादित दायित्व भागीदारी (LLPs) किंवा इतर कायदेशीर संस्था म्हणून स्थापन केलेले व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम यांना दिलेली कर्जे योजनेअंतर्गत पात्र असतील . व् ‍ यक् ‍ ती / प्रोप्रायटरशिप फर्म यांना व् ‍ यवसाय उद्देशांसाठी दिलेली कर्जे ईसीएलजीएस 1.0/3.0 (FAQs मध्ये नमूद केल्यानुसार ) विनिर्दिष्ट श्रेणी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र असतील .
  • ईसीएलजीएस 1.0 च्या उद्देशासाठी, 29.2.2020 रोजी किंवा त्यापूर्वी वितरित  झालेल्या आणि MUDRA पोर्टलवर अहवाल दिलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत असलेल्या व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम यांच्या कर्जांचा समावेश केला जाईल. सर्व पात्रता अटी यासह मागील देय दिवसांशी संबंधित अटी देखील PMMY कर्जांना लागू होतील
  • वैयक्तिक पातळीवर दिलेली कर्जे ईसीएलजीएस 1.0/3.0 अंतर्गत समाविष्ट आहेत. तथापि, अशी कर्जे व्यक्तींनी (FAQs मध्ये नमूद केल्यानुसार) त्यांच्या स्वत:च्या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जांपुरती मर्यादित असावी आणि गॅरंटी अर्जाच्या वेळी या साठी व्यवस्थापन प्रमाणपत्रासह जोडावे. या कर्जांनी योजनेच्या इतर पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे.
  • पतपुरवठा संस्थांच्या पुस्तकांवर असलेल्या विद्यमान ग्राहकांसाठी ही योजना वैध आहे.
  • कर्ज मंजूर करताना सर्व पतपुरवठा संस्थांमधील कर्जांचा देय दिवसांचा कालावधी क्रेडिट ब्युरोकडून तपासला जाईल .
  • 29.2.2020 रोजी NPA किंवा SMA-2 स्थिती असलेली सर्व कर्जदार खाती ईसीएलजीएस 1.0, ईसीएलजीएस 2.0 आणि ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत पात्र असणार नाहीत. त्याचप्रमाणे, 31.03.2021 रोजी NPA किंवा SMA-2 स्थिती असलेली सर्व कर्जदार खाती ईसीएलजीएस 1.0 (विस्तार), ईसीएलजीएस 2.0 (विस्तार ) अंतर्गत पात्र असणार नाहीत. 31.03.2021 किंवा 31.01.2022 रोजी NPA स्थिती किंवा SMA-2 स्थिती असलेली सर्व कर्जदार खाती ईसीएलजीएस 3.0/3.0 (विस्तार) अंतर्गत पात्र असणार नाहीत.
  • 31.03.2021 रोजी NPA स्थिती असलेली सर्व कर्जदार खाती ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत पात्र असणार नाहीत.
  • तथापि, सप्टेंबर 08, 2020 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, कर्जदाराच्या त्यांच्या क्रेडिट कार्ड/बचत खाते/चालू खात्याच्या संदर्भात थकबाकीसाठी अपवाद मंजूर करण्यात आला आहे बशर्ते उक्त थकबाकी ही ईसीएलजीएस सुविधेअंतर्गत वितरित करण्यात येणार्‍या कर्जाच्या रकमेच्या (म्हणजे जीईसीएल रक्कम) 1% पेक्षा जास्त नसावी आणि ईसीएलजीएस अंतर्गत अर्थसहाय्य मिळवण्यापूर्वी  थकीत रक्कम नियमित केली गेली असावी, तसेच पतपुरवठा करणार्‍या संस्थांनी हे सुनिश्चित केले असावे की थकीत रक्कम ही पतपुरवठा संस्थाद्वारे अनुसरण करण्यात येत असलेल्या मटेरियलिटी संकल्पनेअंतर्गत संरक्षित केली गेली आहे.
  • व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कर्जदार हे जेथे अशी नोंदणी अनिवार्य आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये जीएसटी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . ही अट जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी आवश्यक नसलेल्या व्यावसायिक उपक्रम / सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम यांना लागू होणार नाही .
  • योजनेंतर्गत अन्यथा पात्र असलेले कर्जदार खाते मंजुरी / वितरणाच्या तारखेरोजी NPA नसावे .
  • या योजनेच्या उद्देशासाठी कर्जदारांची विद्यमान कर्जे विद्यमान NCGTC किंवा CGTMSE योजनेंतर्गत समाविष्ट केली जाणे आवश्यक नाही.
4

निवड करा / बाहेर पडा पर्याय

  • ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत पात्र कर्जदारांना जीईसीएल सुविधेतून बाहेर पडायचे आहे की नाही हे निवडण्यासाठी त्यांना 'निवड रद्द' पर्याय प्रदान केला जावा.
  • ईसीएलजीएस 2.0, ईसीएलजीएस 3.0 आणि ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत सुविधा मात्र 'ऑप्ट-इन' आधारावर असेल.
5

वित्तपुरवठ्याचे  परिमाण

  1. ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत
    • 29 फेब्रुवारी 2020 रोजी रु. 50 कोटी  पर्यंत च्या (फक्त निधी आधारित ) थकबाकी च्या 20%.
  2. ईसीएलजीएस 1.0 ( विस्तार ) अंतर्गत
    • 29 फेब्रुवारी 2020 किंवा 31 मार्च 2021 रोजी (ज्या दिवशी जास्त असेल ते ) (ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत प्राप्त सहाय्य जोडून) रु.50 कोटी पर्यंत च्या (केवळ निधी आधारित ) त्यांच्या एकूण थकबाकीच्या 30% पर्यंत  
  3. ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत
    • 29 फेब्रुवारी 2020 किंवा 31 मार्च 2021 रोजी (ज्या दिवशी जास्त असेल ते ) (ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत केवळ निधी आधारित प्राप्त सहाय्य जोडून) रु. 500 कोटी पर्यंत च्या  थकबाकीच्या 30% पर्यंत.
    • ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत देण्यात येणारी कर्ज सुविधा निधी आधारित किंवा नॉन-फंड आधारित सुविधेच्या स्वरूपात असू शकते किंवा दोन्हीचे मिश्रण असू शकते.
  4. ईसीएलजीएस 2.0 ( विस्तार ) अंतर्गत ,
    • 29 फेब्रुवारी 2020 किंवा 31 मार्च 2021 रोजी (ज्या दिवशी जास्त असेल ते) (ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत केवळ निधी आधारित प्राप्त सहाय्य जोडून) रु. 500 कोटी पर्यंत च्या  थकबाकीच्या 30% पर्यंत (सध्याच्या 20% वरून वाढवलेले), कर्जदार सर्व पात्रता निकष पूर्ण करण्याच्या शर्तीवर.
    • ईसीएलजीएस 2.0 (विस्तार) अंतर्गत येणारी कर्ज सुविधा निधी आधारित किंवा नॉन-फंड आधारित सुविधेच्या स्वरूपात असू शकते किंवा दोन्हीचे मिश्रण असू शकते.
  5. ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत
    • विमान वाहतूक क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व पात्र क्षेत्रातील  (पात्रता निकषांमध्ये नमूद केल्याप्रमाणे), पात्र कर्जदारांना 29.02.2020 रोजीच्या थकबाकीच्या (फक्त निधी आधारित) 50% पर्यंत जीईसीएल निधीची रक्कम मिळेल, प्रति कर्जदार रु. 200 कोटी च्या मर्यादेच्या अधीन राहून!
    • ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत पात्र असलेले आणि ईसीएलजीएस 1.0 किंवा ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत लाभ घेतलेले कर्जदार 29.02.2020 पर्यंत त्यांच्या एकूण कर्जाच्या 20% पर्यंत अतिरिक्त कर्जासाठी पात्र असतील.
  6. ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत ( विस्तार )
    • एव्हिएशन क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व पात्र क्षेत्रातील पात्र कर्जदारांना 29.02.2020 किंवा 31.03.2021 किंवा 31.01.2022 रोजीच्या थकबाकीच्या (ज्या दिवशी जास्त असेल ते) ( फक्त निधी आधारित ) 50% पर्यंत प्रति कर्जदार रु. 200 कोटी मर्यादेच्या अधीन .

    टीप: विमान वाहतूक क्षेत्रातील व्यवसायांसाठी ईसीएलजीएस 3.0 आणि ईसीएलजीएस 3.0 (विस्तार) अंतर्गत, 29.02.2020 किंवा 31.03.2021 31.01.2022 रोजी पात्र कर्जदारांना जीईसीएल निधीची रक्कम एकतर निधी आधारित सुविधा-अतिरिक्त खेळते भांडवल मुदत कर्ज सुविधेच्या स्वरूपात (बँका आणि वित्तीय संस्थांच्या बाबतीत) किंवा मुदत कर्ज सुविधा (NBFC च्या बाबतीत) किंवा नॉन-फंड आधारित सुविधा, त्यांच्या एकूण थकबाकीच्या 50% पर्यंत (फंड आधारित आणि नॉन-फंड आधारित दोन्ही), ज्या दिवशी जास्त असेल ते, प्रति कर्जदार रु.400 कोटी मर्यादेच्या अधीन राहून, आणि कर्जदार इतर सर्व पात्रता निकषांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून दिले जाईल.

  7. ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत
    • पात्र कर्जदारांना जीईसीएल निधीची रक्कम निधी आधारित ( टर्म लोन ) किंवा नॉन - फंड बेस्ड ( भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी एलसी ) सुविधेच्या स्वरूपात असेल आणि ऑन-साइट ऑक्सिजन उत्पादन संयंत्र उभारण्यासाठी प्रति कर्जदार रु .2 कोटीपर्यंत मर्यादित असेल .
    • एकूण थकबाकी रकमेमध्ये ताळेबंदत उल्लेख असलेली सर्व थकबाकी, जसे की खेळते भांडवल कर्जे, मुदत कर्जे आणि खेळते भांडवल मुदत कर्जावरील थकबाकी, यांचा समावेश केला जाईल. ताळेबंद आणि नॉन-फंड आधारित थकबाकी वगळली जाईल.
6

एका पेक्षा जास्त वित्तपुरवठा संस्थेकडून कर्ज आणि कन्सोर्टियम बँकिंग

  • कर्जदाराची अनेक वित्तपुरवठा संस्थांकडून कर्ज प्रकरणे चालू असतील तर कर्जदार आणि बँक यांच्यातील करारानुसार जीईसीएल  सुविधा एका किंवा अनेक बँका / संस्था यांच्याकडून घेता येईल.
  • कर्जदाराला कोणत्याही वित्तपुरवठा संस्थेकडून 30% पेक्षा जास्त रक्कम घ्यायची असल्यास [50% ईसीएलजीएस 3.0 आणि ईसीएलजीएस 3.0 (विस्तार) च्या बाबतीत, निर्दिष्ट केल्यानुसार कॅपच्या अधीन राहून] तर ज्या संस्थेचा ईसीएलजीएस हिस्सा इतर विशिष्ट संस्थेकडून घेण्याचा प्रस्ताव आहे, तर अशा पहिल्या संस्थेकडून ना  हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल. तथापि, त्या विशिष्ट संस्थेने सर्व वित्तपुरवठा संस्थाच्या वतीने ईसीएलजीएस सुविधा प्रदान करण्यासाठी सहमती देणे आवश्यक आहे.
  • तथापि कर्जदाराला कोणत्याही वित्तपुरवठा संस्थेकडून 30% पेक्षा कमी रक्कम घ्यायची असल्यास [50% ईसीएलजीएस 3.0 आणि ईसीएलजीएस 3.0 (विस्तार) च्या बाबतीत, निर्दिष्ट केल्यानुसार कॅपच्या अधीन राहून] तर ना  हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक नाही.
7

कार्यकाळ

  1. ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत : पहिल्या वितरणाच्या तारखेपासून चार वर्षे .
  2. ईसीएलजीएस 1.0 ( विस्तार ) अंतर्गत : पहिल्या वितरणाच्या तारखेपासून पाच वर्षे .
  3. ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत : निधी आधारित सुविधेच्या पहिल्या वितरणाच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा नॉन - फंड आधारित सुविधेच्या वापराची पहिली तारीख , यापैकी जे आधी असेल . मंजूर नॉन-फंड आधारित सुविधेच्या गॅरंटी कव्हरसाठी पात्र होण्यासाठी, प्रथम वापर 30 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
  4. ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत ( विस्तार ): निधी आधारित सुविधेच्या पहिल्या वितरणाच्या तारखेपासून सहा वर्षे किंवा नॉन - फंड आधारित सुविधेच्या वापराची पहिली तारीख , यापैकी जे आधी असेल . मंजूर नॉन-फंड आधारित सुविधेच्या गॅरंटी कव्हरसाठी पात्र होण्यासाठी, प्रथम वापर 30 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
  5. ईसीएलजीएस 3.0 आणि 3.0 अंतर्गत ( विस्तार ): पहिल्या वितरणाच्या तारखेपासून सहा वर्षे .
  6. ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत :  निधी आधारित सुविधेच्या पहिल्या वितरणाच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा नॉन - फंड आधारित सुविधेच्या वापराची पहिली तारीख , यापैकी जे आधी असेल . निधी आधारित सुविधेअंतर्गत वितरण आणि नॉन-फंड सुविधेअंतर्गत एलसीचा वापर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2022 असेल. योजनेअंतर्गत निधी आधारित सुविधेसाठी वितरणाची अंतिम तारीख 30 जून 2023 असेल.

टीप: योजनेअंतर्गत निधी आधारित सुविधेसाठी वितरणाची अंतिम तारीख 30 जून 2023 असेल .

ईसीएलजीएस 2.0, आणि 2.0 (विस्तार) अंतर्गत नॉन-फंड आधारित सुविधेसाठी कोणतीही अंतिम तारीख निर्धारित केलेली नसली तरी, वित्तपुरवठा संस्थेने नॉन-फंड आधारित सुविधे अंतर्गत त्यांचे दायित्व हळूहळू कमी करणे सुनिश्चित केले पाहिजे. ईसीएलजीएस 2.0 आणि 2.0 (विस्तार) अंतर्गत कर्जदाराने वापरल्याच्या पहिल्या तारखेपासून 5 वर्षे आणि 6 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा ईसीएलजीएस 2.0 कर्जदारांच्या बाबतीत 30 जून 2028 आणि ECLG2020 च्या बाबतीत 30 जून 2029 रोजी, जे आधी असेल ते, तेव्हा कर्जाची मुदत संपेल.

8

मोराटोरियम

  • ईसीएलजीएस 1.0 आणि 2.0 अंतर्गत कर्जदारांना मूळ रकमेवर एक वर्ष आणि ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत 6 महिने प्रदान केले जातील ज्या दरम्यान व्याज देय असेल.
  • ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत जीईसीएल सुविधेच्या कर्जदारांना मूळ रकमेवर 2 वर्षे प्रदान केली जातील, ज्या कालावधीत व्याज देय असेल.
  • ईसीएलजीएस 1.0 ( विस्तार ), 2.0 ( विस्तार ), 3.0 आणि 3.0 ( विस्तार ) अंतर्गत जीईसीएल क्रेडिटच्या निधी आधारित भागासाठी कर्जदारांना मूळ परतफेडीवर 2 वर्षे प्रदान केले जातील .
9

वितरण आणि परतफेड

  • निधी आधारित सुविधेची मंजुरी आणि वितरणाची अंतिम तारीख अनुक्रमे 31 मार्च 2023 आणि 30 जून 2023 आहे.
  • निधी आधारित सुविधेतून संपूर्ण वितरण 30 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी झाले पाहिजे.
  • ईसीएलजीएस 2.0/2.0(विस्तार) / ईसीएलजीएस 3.0/3.0(विस्तार) अंतर्गत नॉन-फंड आधारित सुविधेअंतर्गत पहिल्या टप्प्याचा वापर 30 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी झाला पाहिजे.
  • ईसीएलजीएस 2.0/2.0 (विस्तार)/ ईसीएलजीएस 3.0/3.0 (विस्तार) अंतर्गत नॉन-फंड आधारित सुविधेअंतर्गत पुढील टप्प्यांचा वापर नंतर गॅरंटी कव्हरच्या चलनादरम्यान होऊ शकतो.
  • ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत संपूर्ण नॉन-फंड आधारित सुविधेचा (भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी एलसी) वापर 30 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी झाला पाहिजे, जरी ती खरेदी नंतर अस्तीत्वात येणार असेल.
  • लवकर परतफेड झाल्यास प्री-पेमेंट दंड नाही.
  • मोराटोरियम कालावधी दरम्यान व्याज देय असेल.
  • मोराटोरियम कालावधी संपल्यावर ईसीएलजीएस 1.0, आणि 1.0 (विस्तार) अंतर्गत मुद्दलाची परतफेड 36 मासिक हप्त्यांमध्ये, ईसीएलजीएस 2.0, 2.0 (विस्तार), 3.0, आणि 3.0 (विस्तार) अंतर्गत 48 मासिक हप्त्यांमध्ये आणि ईसीएलजीएस 4.0. मध्ये 54 मासिक हप्त्यांमध्ये केली जाईल.
10

मार्जिन

  • ईसीएलजीएस अंतर्गत फंड सुविधेसाठी शून्य.
  • ईसीएलजीएस 2.0 अंतर्गत नॉन-फंड सुविधेच्या बाबतीत: मार्जिन विद्यमान नॉन-फंड सुविधेनुसार असावे.
  • जर कोणतीही नॉन-फंड सुविधा नसेल तर, 25% मार्जिन घेतले पाहिजे [केवळ ईसीएलजीएस 2.0, ईसीएलजीएस 2.0 (विस्तार ) च्या नॉन-फंड भागासाठी].

ईसीएलजीएस 3.0/3.0 (विस्तार) अंतर्गत नॉन-फंड आधारित सुविधेच्या बाबतीत फी/कमिशन 0.5% प्रति वर्ष मर्यादित केले गेले आहे आणि कोणतेही रोख मार्जिन निर्धारित केले जाऊ नये.

11

नॉन-फंड सुविधेसाठी व्याज दर / कमिशन

  1. ईसीएलजीएस 1.0, ईसीएलजीएस 1.0 (विस्तार), ईसीएलजीएस 2.0, ईसीएलजीएस 2.0 (विस्तार), ईसीएलजीएस 3.0 आणि ईसीएलजीएस 3.0 (विस्तार) साठी

    A. सूक्ष्म, लघु आणि माध्यम उपक्रमांसाठी

    • RLLR + 0.05% जास्तीत जास्त 9.25% पर्यंत. (या कर्ज सुविधेच्या संपूर्ण कालावधीत).

    B. सूक्ष्म, लघु आणि माध्यम उपक्रम नसलेल्यांसाठी

    • MCLR + स्प्रेड 0.20% ते 1%, मंजूर प्राधिकरणाने केस दर केस आधारावर ठरवले जाईल, कमाल 9.25% पर्यंत (या कर्ज सुविधेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान).
  2. ईसीएलजीएस 4.0 साठी,

    RLLR/MCLR शी लिंक केलेले जास्तीत जास्त 7.5% दराने

    • व्याज जेव्हा लागू केले जाईल तेव्हा भरणे आवश्यक.
    • निर्धारित कालावधीत हप्ते आणि व्याज चुकवल्यास सध्याच्या बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दंडात्मक व्याज आकारले जाईल

    .

    • विद्यमान कर्ज सुविधांवरील आधीच स्वीकृत केलेल्या करारांचे पालन न केल्यास मंजूरीच्या काळात या उत्पादनावर कोणतेही दंड व्याज आकारले जाऊ शकत नाही.

नॉन-फंड सुविधेवर कमिशन :

  • विद्यमान नॉन-फंड सुविधेच्या बाबतीत : विद्यमान मंजूरीनुसार शुल्क.
  • नॉन-फंड सुविधेला नव्याने मंजुरी मिळाल्यास : सेवा शुल्काच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार.

अपवाद :

  • ईसीएलजीएस 3.0/3.0 (विस्तार) अंतर्गत नॉन-फंड आधारित सुविधेसाठी 0.5% प्रति वर्ष आणि रोख मार्जिन नाही
12

05 मे 2021 च्या आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात पुनर्रचना ( आरबीआय च्या परिपत्रकानुसार 04 जून 2021 च्या सुधारित )

  • ज्या कर्जदारांनी ईसीएलजीएस 1.0 अंतर्गत सहाय्य घेतले आहे आणि 05 मे 2021 च्या आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार (04 जून 2021 रोजीच्या आरबीआय परिपत्रकानुसार सुधारित) पुनर्रचनेसाठी पात्र आहेत त्यांना त्याचा लाभ घेण्याची परवानगी आहे. अशा प्रकरणांमध्ये जीईसीएल कर्जांना 5 वर्षांपर्यंत, म्हणजे 24 महिन्यांपर्यंतचा कालावधी, ज्यामध्ये फक्त व्याज देय असेल आणि त्यानंतर मूळ हप्ते 36 मासिक हप्त्यांमध्ये देय असतील.
  • आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुनर्रचनेचा लाभ घेणाऱ्या कर्जदारांना 29 फेब्रुवारी 2020 रोजी संबंधित वित्तपुरवठा संस्थेकडून त्यांच्या थकबाकीच्या 10% पर्यंत अतिरिक्त सहाय्य मिळण्याची परवानगी असेल, जर त्यांनी ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत अतिरिक्त सहाय्य घेतले नसेल तर. ते नंतर ईसीएलजीएस 3.0 साठी पात्र होणार नाहीत, म्हणजे कर्जदार एकतर या अतिरिक्त 10% किंवा ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत अतिरिक्त सहाय्य घेऊ शकतात, परंतु दोन्ही नाही.
  • सर्व शाखा आणि कर्जदारांनी या आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांच्या अटी व शर्तींचे पालन केल्याची खात्री करावी.
13

सुरक्षा

  • अतिरिक्त खेळते भांडवल मुदत कर्ज किंवा ईसीएलजीएस (ईसीएलजीएसचे सर्व घटक) अंतर्गत मंजूर केलेली नॉन-फंड आधारित सुविधा सध्याच्या कर्ज सुविधांसह रोखे (परतफेडीसह) आणि सुरक्षिततेच्या बाबतीत, योजनेच्या अंतर्गत वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेवर शुल्कासह सेकंड चार्ज असेल , जो  30 जून 2023 रोजी किंवा एनपीए होण्याची तारीख, यापैकी जी तारीख आधी असेल त्या तारखे रोजी तो बोजा चढवला जावा.
  • जीईसीएल अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी कोणतेही अतिरिक्त तारण मागितले जाणार नाही.
  • ईसीएलजीएस 4.0 अंतर्गत सहाय्य घेणारे कर्जदार ज्या बंकेहा बोजा असेल, त्या बँकेत एस्क्रो खाते उघडतील.  
14

तारण

या योजनेअंतर्गत अतिरिक्त कर्ज सुविधा देऊ केल्यास कोणतेही अतिरिक्त तारण मागितले जाणार नाही .

15

योजनेची वैधता

ही योजना वैधता NCGTC द्वारे ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याच्या तारखेपासून ३१.०३.२०२३ पर्यंत किंवा जीईसीएल अंतर्गत ४,५०,००० कोटी रुपयांची हमी जारी होईपर्यंत, जे आधी असेल ते, (ईसीएलजीएस चे सर्व घटक विचारात घेऊन) मंजूर केलेल्या सर्व कर्जांना लागू असेल.

16

प्रणाली प्रक्रिया

या योजनेअंतर्गत अतिरिक्त कर्ज सुविधा देण्यासाठी कर्जदाराचे स्वतंत्र कर्ज खाते उघडले जाईल .

17

हमी कव्हरेज

  • या योजनेंतर्गत प्रदान केलेल्या कर्ज सुविधेसाठी एनपीए होण्याच्या तारखेला किंवा दावा दाखल करण्याच्या तारखेला , ज्या दिवशी रक्कम कमी असेल त्या रकमेवर नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (NCGTC) कडून 100% हमी कव्हरेज मिळेल.
  • NCGTC कडून कर्जावरील हमी बिनशर्त आणि अपरिवर्तनीय असेल.
  • एकदा बँकेने योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र कर्जदाराला मंजूर केलेल्या कर्जाचा तपशील प्रविष्ट केला की, प्रणाली आपोआप हमी मंजूर करेल आणि बँकेला अर्ज संदर्भ क्रमांक आणि कर्ज हमी क्रमांक प्रदान करेल, ज्याचा वापर बँकेद्वारे संदर्भासाठी नंतर केला जाईल.
  • वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत जेथे मूळ कर्ज व्यावसायिक हेतूंसाठी घेतले असल्याचे व्यवस्थापन प्रमाणपत्र लागते, ते सोडून इतर कोणताही हमी अर्ज दाखल करताना कोणतीही कागदपत्रे मागितली जात नाहीत,.
  • तथापि, नॉन-फंड आधारित सुविधेसाठी गॅरंटी कव्हर कालांतराने प्रमाणानुसार कमी होईल (ईसीएलजीएस 2.0, ईसीएलजीएस 2.0 विस्तार, ईसीएलजीएस 3.0, ईसीएलजीएस 3.0 विस्तार स्थगन कालावधीनंतर दरवर्षी 25% ने), जोखीम वजन नॉन-फंड आधारित सुविधेची थकबाकी MLIs द्वारे त्यानुसार त्या वर्षात उपलब्ध हमी संरक्षणाच्या आधारावर लागू केली जाईल.
18

हमी फी

या योजनेअंतर्गत प्रदान केलेल्या सर्व कर्ज सुविधांसाठी कोणतेही हमी शुल्क नाही .

19

विमा

बँकेला आकारण्यात येणाऱ्या सर्व सिक्युरिटीजचा सर्वसमावेशक विमा बँक क्लॉजसह घ्यावा.

20

प्रक्रिया शुल्क

शून्य (ईसीएलजीएससाठी वेगळे प्रक्रिया शुल्क वसूल केले जाणार नाही)

21

प्रीपेमेंट शुल्क

शून्य

22

CIBIL शुल्क

100/- + GST

23

दस्तऐवजीकरण/इतर शुल्क

बँकेच्या विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार