Beti Bachao Beti Padhao

अप्रत्यक्ष (सेंट्रल एक्साइज अँड सर्व्हिस) कर रकमेचा ई-भरणा

निधी हस्तांतरण सुविधेसह आमच्या सर्व रिटेल आणि कॉर्पोरेट इंटरनेट बँकींग ग्राहकांसाठी उपलब्ध असलेली सेवा!

बँक ऑफ महाराष्ट्र तुमचा सीबीडीटी रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधा देते. इंटरनेट बँकिंग चे ग्राहक असल्यास तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येतो.या सुविधेचा वापर करण्यासाठी, तुम्ही सेंट्रल एक्साईज किंवा सेवा कर विभागासाठी असोसिएशन ऑफ सेंट्रल एक्साईज आणि कस्टम्स म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच, ग्राहकाकडे इंटरनेट बँकिंग आयडी असणे आवश्यक आहे. या सुविधेचा वापर करून, आपण दिवसभरात केव्हाहीदेय रक्कम भरू शकता. नेहमीच्या कामकाजाच्या दिवशी कट ऑफ वेळ संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे, जो सहसा तिमाही-समाप्ती आणि वर्ष अखेरच्या दिवशी वाढविण्यात येईल. कट-ऑफ टाईम नंतर भरल्या जाणाऱ्यारी देयकांच्या पावत्यांची नोंद पुढील कामकाजाच्या दिवशी केली जाईल. ही सुविधा सेंट्रल एक्साईजच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर जमाकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

अप्रत्यक्ष कर रकमेचा ई-भरणा करण्यासाठी अनुसरण करावयाच्या पायऱ्या

  1. उत्पादन शुल्क व सेवा कराचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी या पृष्ठाच्या तळाशी असलेल्या "नवीन भरणा सुरू करा" लिंकवर क्लिक करा. हे तुम्हाला एनएसडीएल वेबसाइटवर पुनर्निर्देशित करेल
    website https://cbec.nsdl.com/EST/InputPageForEPaymentServlet
  2. करपात्र व्यक्तीचा 15 आकडी कोड प्रविष्ट करा. सिस्टम स्वयंचलितपणे करपात्र व्यक्तीच्या कोड संबंधित माहिती प्रदर्शित करेल
  3. प्रधान शीर्ष (करपात्र व्यक्तीचा कोड आणि प्रकारशी संबंधित) सिस्टीमद्वारे निश्चित करण्यात येतील आणि अनुक्रमे खाते शीर्ष, खाते शिर्षाच्या लिंकमध्ये प्रदर्शित केले जातील.
  4. दिलेल्या लिंकवरूनगौण शीर्ष (एका वेळी 6 गौण शीर्षे निवडली जाऊ शकतात) निवडा.5. सूचीमधून “बँक ऑफ महाराष्ट्र” निवडा आणि “सबमिट” वर क्लिक करून पुढे चला
  5. तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर भरणा प्रवेशमार्गाकडे (इंटरनेट बँकिंग साइट) निर्देशित केले जाईल.
  6. आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर पेमेंट गेटवे (इंटरनेट बँकिंग साइट) कडे निर्देशित केले जाईल
  7. कॉर्पोरेट / रिटेल पर्याय निवडा.
  8. लॉग इन पृष्ठावर वापरकर्ता आयडी आणि लॉगइन पासवर्ड प्रविष्ट करा.
  9. लॉग इन पासवर्डची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला देयक पृष्ठावर नेले जाईल ज्यामध्ये चलन तपशील दाखवले जातील..
  10. खाते कोडनुसार रक्कम प्रविष्ट करा. डेबिट आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड बनवण्यासाठी खाते निवडा आणि सबमिट करा वर क्लिक करा
  11. तुम्ही भरलेल्या आणि निवडलेल्या सर्व चलन तपशीलांसह भरणा पुष्टीकरण पृष्ठ सादर केले जाईल तुम्ही भरणा करू इच्छित असल्यास “पुष्टी करा” वर क्लिक करा किंवा तुम्ही व्यवहार रद्द करू शकता.
  12. भरणा पूर्ण झाल्यानंतर सायबर पावती प्रदर्शित केली जाईल, जी तुम्ही प्रिंट करु शकता.
  13. तुम्ही "डुप्लिकेट चलन" मेनू अंतर्गत इंटरनेट बॅंकिंगमध्ये सामान्य लॉगइन करून डुप्लिकेट चलनाची प्रिंट घेऊ शकता.

तुम्ही अद्याप आमची महा संपर्क कनेक्ट बँकिंग सुविधा घेतलेली नसल्यास कृपया –

  1. निधी हस्तांतरण सुविधचा वापर करून महाकनेक्ट इंटरनेट बँकिंग सेवेसाठी अर्ज करा.
  2. विनंती अर्ज डाऊनलोड करण्यासाठी आणि तुमच्या शाखेत सादर करण्यासाठी संबंधित हायपरलिंकवर क्लिक करा.
  3. आपण पोस्ट / कूरियरद्वारे तुमचा कॉर्पोरेट आयडी आणि / किंवा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त कराल.
  4. कृपया बीओएम च्या इंटरनेट बँकिंग साइटवर लॉग इन करा,
  5. “कर रकमेचा ई-भरणा” पर्याय निवडा
  6. वर नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा.