Beti Bachao Beti Padhao

कोविड -19 बाबत बँक ऑफ महाराष्ट्रच्या घोषणा

सामान्य प्रश्न

किरकोळ कर्ज विभागाशी संबधित कोविड-१९शी संबंधित ताणतणावाच्या निवारणासाठी उपाययोजनांची चौकट

Q: किरकोळ कर्ज विभागाशी संबधित कोविड-१९शी संबंधित ताणतणावाच्या निवारणासाठी उपाययोजनांच्या चौकटीअंतर्गत कोणत्या प्रकारचे कर्जदार पात्र आहेत (वैयक्तिक कर्जे).

A: निवारण करण्याच्या चौकटीनुसार फक्त वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेली किरकोळ कर्जेच यासाठी पात्र आहेत.

Q: किरकोळ कर्ज विभागाशी संबधित कोविड-१९शी संबंधित ताणतणावाच्या निवारणासाठी उपाययोजनांच्या चौकटीअंतर्गत कोण पात्र आहेत (वैयक्तिक कर्जे)

A: ज्या कर्जखात्यांमध्ये कोविड-१९मुळे ताण आला असेल, अशाच कर्जदारांना बँकांनी ही निवारणाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे.
ज्या खात्यांचे वर्गीकरण स्टँडर्ड म्हणून करण्यात आले होते, त्या कर्जदारांची खातीच पात्र असतील, पण त्यांनी परतफेडीची केलेली कुचराई १ मार्च १०२० रोजी ३० दिवसांपेक्षा अधिक नसायली हवी, म्हणजेच असे खाते १ मार्च २०२० रोजी स्टँडर्ड किंवा एसएमएओ म्हणून वर्गीकृत असले पाहिजे.

Q: निवारणाच्या ह्या चौकटीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकासाठी कोणती अंतिम तारीख आहे?

A: ह्या चौकटीच्या अंतर्गत निवारणासाठीची मदत ३१ डिसेंबर २०२० या तारखेच्या आत मागितली पाहिजे.
मदतीची मागणी करण्याची तारीख (वैयक्तिक कर्जासाठी) म्हणजे ज्या तारखेस कर्जदार आणि बँक यांनी ह्या चौकटीच्या अंतर्गत निवारणाची योजना लागू करण्याचे मान्य केल्याची तारीख.

Q: निवारण चौकटीच्या अंतर्गत मंजुरीचे कोणते नियम व अटी बदलतील/त्यांमध्ये सुधारणा केली जाईल?

A: निवारण योजना लागू केल्यानंतर कर्जाचा कालावधी आणि मासिक हप्ता त्यानुसार बदलेल.

Q: कोणती नवीन/अतिरिक्त कागदपत्रे सही करून द्यावी लागतील का? असतील, तर कोणत्या अतिरिक्त कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतील?

A: आधी दिलेल्या कागदपत्रांच्या व्यतिरिक्त खालील कागदपत्रे द्यावी लागतील

  1. निवारण योजना उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज/विनंतीपत्र.
  2. सुधारित अटी व परतफेड वेळापत्रकांसह पूरक कर्ज करार
  3. बी२जी२

Q: निवारण चौकटीच्या अंतर्गत मोरॅटोरिअमच्या कालावधीचा लाभ घेतला जाऊ शकतो का? असेल, तर मोरॅटोरिअमचा कमाल कालावधी किती?

A: होय, अर्जदाराला आवश्यक असल्यास मोरॅटोरिअमच्या कालावधीचा लाभ घेतला जाऊ शकतो. परंतु, ह्या निवारण योजनेंतर्गत मोरॅटोरिअमच्या कालावधीतील व्याजाचे भांडवलीकरण केले जाईल आणि ते मुद्दल रकमेत जोडले जाईल. या चौकटीच्या अंतर्गत जास्तीतजास्त २४ महिन्यांच्या मोरॅटोरिअमच्या कालावधीसाठी परवानगी दिली जाईल.

Q: कर्जदारावर कोविड-१९ चा परिणाम झालेला आहेत किंवा नाही हे बँक कसे ठरवील/ओळखील?

A: पगारदार: पगारदार वर्गाच्या बाबतीत, कर्जदारांनी सादर केलेल्या इतर माहितीसोबतच शाखा फेब्रुवारी २०२० या महिन्याच्या पगाराच्या पावत्यांची सध्याच्या/अलीकडील पगाराच्या पावत्यांची तुलना करून पडताळणी करतील व कर्जदार अर्जदाराच्या उत्पन्नाच्या स्रोतांची छाननी करतील. त्यानुसार, शाखा त्याची/तिची पात्रता ठरवील.

व्यवसाय/स्वयंरोजगार: कोविड-१९चा परिणाम कर्जदाराच्या व्यवसायावर/इतर कामकाजावर झालाय का ह्याची खातरजमा, कर्जदाराशी वैयक्तिक चर्चा करून आणि त्याने/तिने सादर केलेली माहिती पाहून त्याआधारे करावयाची आहे.

Q: माझे खाते जर ०१.०३.२०२० रोजी स्टँडर्ड असेल आणि बँकेने मला आधीच ऑगस्ट २०२० पर्यंत ६ महिन्यांचा मोरॅटोरिअम दिलेला असेल. मी सप्टेंबर २०२० नंतर परतफेडीचा कोणताही हप्ता भरलेला नाही आणि ३०.११.२०२० रोजी निवारण चौकटीसाठी शाखेशी संपर्क साधला आहे. बँकेने माहिती दिली की, माझे खाते ०.१.१२.२०२० रोजी एनपीए बनेल. तर मी निवारण चौकटीच्या अंतर्गत पात्र असेन का?

A: होय, तुम्ही जर तुमची संमती शाखेकडे ३०.११.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी दिली तर तुम्ही पात्र असाल.

Q: मी ६ महिन्यांसाठी मोरॅटोरिअमचा पर्याय निवडून ३ महिन्यांनंतर परतफेड सुरू करू शकतो/ते का?

A: होय, अर्जदार ६ महिन्यांसाठी मोरॅटोरिमच्या कालावधीचा पर्याय निवडू शकतो, ज्यात व्याजाचेही भांडवलीकरण केले जाईल. परंतु, अर्जदाराने जर ३ महिन्यांनंतर कर्जाची परतफेड सुरू केली, तर ३ महिन्यांपर्यंतच्या व्याजाचे भांडवलीकरण केले जाईल.

Q: जर मी परतफेडीचा कालावधी २४ महिन्यांसाठी (जास्तीतजास्त) वाढवून घेण्याचा पर्याय निवडला; मी निवारण चौकटीच्या पुढील महिन्यापंसून परतफेडीला सुरुवात केली, तर कर्जाचा मासिक हप्ता कमी होईल का?

A: होय, जर अर्जदाराने निवारण चौकटीच्या पुढील महिन्यापासून परतफेडीची सुरुवात केली, तर कर्जाचा मासिक हप्ता कमी होईल.

मासिक हप्ते भरण्यापासून ग्राहकांना सूट (मोरॅटोरिअमशी संबंधित शंका)

ह्या योजनेचा उद्देश, ज्या कर्जदारांच्या पैशाच्या उपलब्धतेवर कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनने परिणाम झालेला आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांच्याकडे नियमितपणे पैसे येत आहेत, अशांनी मासिक हप्ते भरणे चालू ठेवणे गरजेचे आहे.

Q: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोविड-१९ रेग्युलेटरी पॅकेजच्या अंतर्गत कर्जखात्यांना कोणता दिलासा दिलेला आहे?

A: भारतीय रिझर्व्ह बँकेने, दिनांक ०१.०३.२०२० रोजीनुसार स्टँडर्ड असेट असलेल्या सर्व खात्यांना, मासिक हप्त्यांमध्ये तीन महिन्यांची सूट देण्यास बँकेला परवानगी दिलेली आहे, ज्यांचे हप्ते १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० च्या दरम्यान देय असतील. त्याअनुसार, जर कर्जदारांची तशी इच्छा असेल, तर ह्या कालावधीमध्ये बँक हप्त्याची मागणी करणार नाही आणि कर्जदारांनी हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. त्यानुसार, परतफेडीचा उर्वरित कालावधी पुढील तीन महिन्यांसाठी वाढविण्यात येईल.

हा दिलासा १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यान देय असलेल्या कर्जाच्या हप्त्यांसाठी देण्यात आलेला असल्याने, खात्याचे डाऊन-ग्रेडेशन टाळण्यासाठी १ मार्च २०२० रोजी किंवा त्यापूर्वी थकीत असलेले कोणत्याही कर्जाचे हप्ते/इतर रक्कम यांचा भरणा ३१ मार्च २०२० पूर्वी करावा लागेल.

कर्जदाराने स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स मागे घेतल्या नाहीत, तर बँक त्या तशाच पुढे चालू ठेवील, कारण कर्जदाराची इच्छा असल्यास त्याला हप्त्यांचा भरणा चालू ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे.

Q: मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक फक्त मुद्दल रकमेसाठी असते की त्यात व्याजाचाही समावेश असतो?

मुद्दल रकमेच्या परफेडीचे वेळापत्रक १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यानच्या तीन महिन्यांसाठी पुन्हा ठरविले जाऊ शकते. उदाहरणार्थ, समजा मुदतीच्या कर्जाचा हप्ता १ मार्च २०२० रोजी देय असला, तर तो १ जून २०२० रोजी देय होईल. समान मासिक हप्त्यांवर आधारित मुदतीच्या कर्जांसाठी तो १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यान देय असलेल्या तीन समान मासिक हप्त्यांसाठी असेल आणि कालावधी तीन महिन्यांनी वाढवला जाईल आणि त्यांचा भरणा विस्तारित कालावधीमध्ये करावा लागेल.

इतर मुदतीच्या कर्जांसाठी तो याच कालावधीत देय असलेला हप्ता आणि व्याज असा असेल, ज्यात परतफेडीच्या कालावधीचा विचार केला जाणार नाही, उदा. मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक, बुलेट पेमेंट (एकरकमी भरणा), इत्यादी. ज्या मुदतीच्या कर्जांमध्ये भरणा सुरू झालेला नसेल, त्यांच्या बाबतीत तीन महिन्यांसाठी फक्त व्याज विचारात घ्यावयाचे आहे.

Q: हप्ते पुढे ढकल्याची सूट (मोरॅटोरिअम) प्राप्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते?

ही योजना १ मार्च २०२० रोजी देय असलेल्या सर्व मानक मुदतीच्या कर्जांना एकसमान लागू असेल. यासाठी कर्जदाराने स्वतंत्र विनंती करण्याची आवश्यकता नाही. जेथे कर्जदाराने मार्च २०२० चा हप्ता आधीच भरलेला असेल, त्यांच्यासाठी ही सूट एप्रिल २०२० आणि मे २०२० साठी लागू असेल.

Q: सूट असल्याचा कालावधी/मोरॅटोरिअम पूर्ण झाल्यानंतर काय होईल?

मोरॅटोरिअमच्या कालावधीत थकीत असलेल्या हिश्श्यावर व्याज वाढत जाईल आणि ते बाकी असलेल्या कर्जाच्या रकमेत जोडले जाईल, ज्यामुळे समान मासिक हप्त्याच्या रकमेत थोडासा बदल होऊ शकेल. सूट असलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशा कर्जासाठीचे तसेत उर्वरित कालावधीचे परतफेडीचे वेळापत्रक, मोरॅटोरिअम कालावधीच्या नंतर तीन महिन्यांपर्यंत संपूर्ण कर्जाच्या रकमेवर टाकण्यात येईल.

Q: या मोरॅटिअमच्या कालावधीमुळे माझ्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होईल का?

नाही.

Q: माझ्या कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक ३१.०५.२०२० नंतर सुरू करावयाचे असेल तर काय?

हे पॅकेज जी खाती ३१.०५.२०२० पर्यंत अजूनही मोरॅटोरिअम कालावधीखाली असतील, त्यांच्यासाठी उपलब्ध नाही. जर कर्जमंजुरीच्या पत्रात मोरॅटोरिअमच्या कालावधीत व्याज देय असेल, तर अशा व्याजाचा भरणा ०१.०३.२०२० ते ३१.०५.२०२० ह्या कालावधीसाठी पुढे ढकलून परतफेडीचे योग्य ते वेळापत्रक तयार केले जाईल.

Q: खेळत्या भांडवलावरील (वर्किंग कॅपिटल) व्याजाच्या सुविधेचे काय होईल?

३१ मार्च, ३० एप्रिल आणि ३१ मे २०२० रोजी कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्टला लागू केलेल्या व्याजाची वसुली ‘पुढे ढकलण्यात’ येत आहे. परंतु असे संपूर्ण व्याज हे ३० जून २०२० रोजी लागू करण्यात आलेल्या व्याजासोबत वसूल केले गेलेच पाहिजे आणि ज्या बाबतीत मासिक व्याज लागू केले जात नसेल, तेथे ते व्याज भरण्याच्या पुढील तारखेस वसूल केले गेले पाहिजे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना (PMGKY)

Q: प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचे (पीएमजीकेवाय) लाभार्थी कोण आहेत?

A: महिला पीएमजेडीवाय खातेधारक, नरेगामधील कामगार, विधवा निवृत्तीवेतनधारक हे या योजनेंतर्गतचे लाभार्थी असतील.

Q: महिला पीएमजेडीवाय खातेधारकांच्या खात्यात किती रक्कम जमा होईल?

दिनांक ०३.०४.२०२० पासून दरमहा ५०० रुपये एवढी रक्कम लाभार्थींच्या खात्यात पुढील तीन महिने जमा केली जाईल.

Q: एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला पीएमजेडीवाय लाभार्थींच्या खात्यात पीएमजीकेवाय अंतर्गत रक्कम जमा केली जात असताना, बँकेच्या शाखा हे पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी कशी काय हाताळणार आहेत?

महिला पीएमजेडीवाय लाभार्थींकडून पैसे काढण्याचे वेळापत्रक पुढील प्रकारे तयार करण्यात आलेले आहे:

अ.क्र.खाते क्रमांकांची व्याप्तीपैसे काढण्याची तारीख
1. शेवटचा अंक 0, 1 असणारी खाती 03 एप्रिल 2020
2. शेवटचा अंक 2, 3 असणारी खाती 04 एप्रिल 2020
3. शेवटचा अंक 4, 5 असणारी खाती 05 एप्रिल 2020
4. शेवटचा अंक 6, 7 असणारी खाती 06 एप्रिल 2020
5. शेवटचा अंक 8, 9 असणारी खाती 07 एप्रिल 2020

Q: काही कारणामुळे मला जर माझ्या बँकेच्या शाखेत जाता आले नाही, तर माझ्या खात्यात जमा झालेली मदतीची रक्कम मला कशी काढता येईल?

बँकेच्या शाखेत जाण्याव्यतिरिक्त, लाभार्थी पुढील माध्यमातूनही रक्कम काढू शकतील -

  1. बँकेचे प्रतिनिधी (बीसी)
  2. एटीएम
  3. आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (एईपीएस) ची सोय असलेले ग्रामीण डाक सेवक

खरे म्हणजे, सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून लाभार्थींना सल्ला देण्यात येतो की, बँकेच्या शाखेतील गर्दी टाळण्यासाठी त्यांनी ही रक्कम बँकेचे प्रतिनिधी, एटीएम, ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून काढावी.

Q: जर मी ही रक्कम जमा झालेल्या तारखेस किंवा दिनांक ०९.०४.२०२० पर्यंत काढली नाही, तर मला मदत म्हणून मिळालेली रक्कम नंतर काढण्यासाठी उपलब्ध असेल का?

होय. ही रक्कम लॉकडाऊनच्या ह्या काळात कठीण काळ निभावून नेण्यासाठी सरकारने दिलेली तातडीची मदत आहे. जर एखाद्याने ही रक्कम उपरोक्त कालावधीत काढली नाही, तर ती नंतर काढण्यासाठी उपलब्ध असेल.

Q: माझे खाते निष्क्रिय आहे. हे खाते सक्रिय बनविण्यासाठी आणि माझी रक्कम काढण्यासाठी मला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

विशेष कारणामुळे देण्यात आलेल्या मदतीसाठीची उपाययोजना असल्याने, निष्क्रिय खाती सक्रिय बनविण्यासाठी सरकारने सध्या सर्व बँकांना नव्याने केवायसी प्राप्त करण्याचे काम पुढे ढकलण्यास सांगितलेले आहे. निष्क्रिय महिला पीएमजेडीवाय खाते ३०.०६.२०२० पर्यंत नव्याने केवायसी कागदपत्रे न मागता मुक्तपणे सक्रिय बनवता येईल.

Q: मी माझ्या बँकेकडून/दुसऱ्या बँकेकडून/वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेले आहे. ह्या कर्जांच्या समान मासिक हप्त्यांच्या परतफेडीसाठी ह्या रकमेचा विनियोग केला जाईल का?

विशेष कारणामुळे देण्यात आलेल्या मदतीसाठीची उपाययोजना असल्याने सरकारने सर्व बँकांना कोणताही मासिक हप्ता किंवा इतर कोणताही आकार कापून न घेण्याचा सल्ला दिलेला आहे आणि मदतीची सर्व रक्कम लाभार्थीला उपलब्ध करून दिली जाईल.

Q: माझे खाते एनपीए आहे. मदतीची रक्कम माझ्या हप्त्यांसाठी समायोजित केली जाईल का?

नाही. विशेष कारणासाठी दिलेली मदतीची उपाययोजना म्हणून सरकारने बँकांना कर्जाचा हप्ता न कापण्याचा सल्ला दिलेला आहे आणि मदतीची ही संपूर्ण रक्कम लाभार्थींना उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

Q: मी माझ्या खात्यासाठी ईसीएस मँडेट/स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स (एसआय) दिलेल्या आहेत. ईसीएसद्वारे/एसआयनुसार पैसे पाठविण्यासाठी जर निधी कमी पडला, तर ह्या ईसीएस/एसआय, थांबवलेली रक्कम, इत्यादींसाठी ही मदतीची रक्कम वापरली जाईल का?

विशेष कारणासाठी दिलेली मदतीची उपाययोजना म्हणून सरकारने बँकांना मदतीची रक्कम  ईसीएस मँडेट/एसआयसाठी उपयोगात न आणण्याचा सल्ला दिलेला आहे आणि मदतीची सर्व रक्कम लाभार्थींना उपलब्ध करून देण्यात येईल.

विदेशी मुद्रा व्यवहार (Forex)

Q: कोरोना व्हायरस साथीच्या ह्या परीक्षा पाहणाऱ्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र परकीय चलनाशी संबंधित व्यवहार हाती घेत आहे का?

A: बँक ऑफ महाराष्ट्र परकीय चलनाशी संबंधित आवश्यक असलेली सर्व कामे करीत आहे, ज्यात परदेशात पैसे पाठवणे, निर्यात (बँकेच्या माध्यमातून दस्तऐवज वगळून) आणि आयात यांचा समावेश आहे, मात्र चलनाचे रूपांतर आणि परकीय चलनी नोटा देणे वगळून.

Q: माझ्या परकीय चलनाशी संबंधित व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी मी कुठे संपर्क साधावा?

सर्व ग्राहकांना त्यांच्या स्वत:च्या शाखेत (जेथे त्यांचे खाते उघडून चालू ठेवलेले आहे ती शाखा) परकीय चलनाशी संबंधित असलेल्या व्यवहारांवर प्रक्रिया करण्यास आवश्यक कागदपत्रांच्या सबमिशनसाठी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Q: माझ्या परकीय चलनाशी संबंधित समस्या कोठे सोडवल्या जातील?

बँक ऑफ महाराष्ट्रची ३६ फोरेक्स केंद्रे आहेत. परकीय चलनाशी संबंधित तुमच्या कोणत्याही शंकेसाठी किंवा मदतीसाठी कृपया तुमच्या नजीकच्या फोरेक्स केंद्राशी संपर्क साधा. फोरेक्स केंद्रांची यादी आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तुमची शंका खालील आयडीवर मेल केली जाऊ शकते-

ईमेल आयडी: ibd@mahabank.co.in आणि agmintl@mahabank.co.in

दूरध्वनी क्र.: 022-22780316 / 022-22780306 / 022-22780336

(आपली परीक्षा पाहणाऱ्या या काळात आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही तुमच्या शंका सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० च्या दरम्यान विचाराव्यात.)

Q: बँकेकडे किती नॉस्ट्रो खाती आहेत?

बँकेकडे, जागतिक दर्जाच्या प्रमुख बँकांसह, १३ नॉस्ट्रो खाती आहे. नॉस्ट्रो खात्यांचे तपशील आमच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत.

Q: परकीय चलनाशी संबंधित व्याजदर/सेवा आकार यांचे अलीकडील तपशील मला कुठे मिळतील?

परकीय चलनाशी संबंधित व्याजदर/सेवा आकार आमच्या बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतात.

Q: मला बँकेच्या विविध परकीय चलनाशी संबंधित उत्पादनांची माहिती कुठे मिळेल?

विविध परकीय चलन उत्पादनांशी संबंधित तपशीलवार मार्गदर्शक सूचना/प्रचालनात्मक सूचना आमच्या संकेतस्थळावर पहायला मिळतील.

आर्थिक समावेशन

Q: बीसी पॉईंट्स बँकिंग सेवेसाठी उघडे आहेत का आणि सदयाच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊन दरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे का?

A: होय, सर्व बीसी पॉईंट्स बँकिंग सेवेसाठी उघडे आहेत. आम्ही आमच्या सर्व बीसीएनी नियमितपणे हात धुणे आणि प्रत्येक व्यवहारानंतर सॅनिटायझर्स वापरणे यासारख्या स्वच्छताविषयक पद्धतीं पाळण्याच्या सूचना बँकेने दिलेल्या आहेत. आम्ही आमच्या सर्व बीसी यांना सॅनिटायझर्स, मुखवटे, हात-मोजे या स्वच्छतेच्या साधनांसाठी रु. 2,000/- अदा केलेले आहेत.

Q: कोविडमुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊन दरम्यान आधार नोंदणी केंद्रे उघडी आहेत का?

नाही, कोविडमुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊन दरम्यान आधार नावनोंदणी केंद्रे उघडी ठेवलेली नाहीत परंतु याकाळात फक्त आवश्यक बँकिंग सेवा शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Q: या कठीण काळात बीसींसाठी अतिरिक्त काही प्रोत्साहनपर आहे का?

होय. या कठीण काळात बीसी एजंटसना त्यांच्या सेवांमध्ये वृद्धी करण्यास प्रोत्साहित करण्याकरिता बँकेतर्फे प्रत्येक सक्रिय बीसी एजंट्सला सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत किमान 5 व्यवहार करण्यासाठी रु. 100/- दिले जातील. याशिवाय अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून 50 जणांच्या व्यवहारांवर प्रती व्यवहार रु. 2/- दिले जातील. ही सुविधा 14.04.2020 पर्यंत उपलब्ध असेल.

Q: कोविड-19 मुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊन दरम्यान बीसी पॉइंट्स उघडण्यास काही अडचण आहे काय?

आमचे बीसी पॉईंट बहुतेक ठिकाणी योग्यप्रकारे कार्यरत आहेत.

डिजिटल उत्पादने

Q: कोविड-१९च्या उद्रेकादरम्यान कोणत्या वेगवेगळ्या डिजिटल उत्पादनांचा उपयोग केला जाऊ शकतो?

A: डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग (महाकनेक्ट, महासेक्युअर) मोबाईल बँकिंग (महामोबाईल) आणि यूपीआय (महायूपीआय)

एटीएम

Q: एटीएममधून रोख रक्कम काढताना आरोग्यशास्त्राविषयी कोणते नियम पाळायचे असतात??

A: आयबीएच्या निर्देशांनुसार ग्राहकांनी आरोग्यशास्त्रविषयक खालील नियमांचे पालन करावयाचे आहेत -

  1. कोणत्याही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी प्रवेश करण्यापूर्वी ग्रांहकांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी त्यांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.
  2. कोविड -१९ व्हायरस पासून ग्राहकांचे संरक्षण करण्याकरिता आमचे सर्व एटीमएम मशीन्स दिवसातून एकदा सॅनिटाईझ करण्यात येतात.
  3. जर ग्राहकाला सर्दी, खोकला आणि ताप असेल, तर एटीएमला भेट देऊ नका. वैद्यकीय मदत घ्या.
  4. शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड मास्कने/हातरुमालाने झाका.
  5. एटीएमच्या जागी बँकेच्या कर्मचाऱ्यांना/ग्राहकांना आरोग्यपूर्ण वातावरण राखण्यास मदत करा.

Q: आपल्या जवळचे एटीएम कसे शोधावे?

तुम्ही एम-कनेक्ट प्लस/भीम बरोडा पे/बँकेचे संकेतस्थळ येथे बँकेच्या आसपासच्या शाखांचा/एटीएमचा शोध घेऊ शकता.

डेबिट कार्ड

Q: आपल्या डेबिट कार्डची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत?

  • महाबँक रूपे/व्हिजा डेबिट कार्डमुळे तुम्हाला तुमच्या बचत सेवेसाठी कोणत्याही रूपे/व्हिजा मानांकित व्यापारी आस्थापनेत किंवा एटीएममध्ये जाण्याचे स्वातंत्र्य मिळते.
  • ह्या कार्डमुळे तुम्हाला किरकोळ दुकानांतून खरेदी करता येते आणि भारतातील आणि परदेशातील एटीएममधून पैसे काढता येतात.
  • तुमच्या बचत खात्यासाठी डायरेक्ट ऑनलाईन डेबिट.
  • एटीएममधून २०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सोय अहोरात्र उपलब्ध, ३ ते ६ टिअर गावांमध्ये २००० रुपयांसाठी आणि टिअर १ व २ शहरांमध्ये १००० रुपयांसाठी कॅश पीओएस.
  • प्रवेशासाठी शु्ल्क (जॉईनिंग फी) नाही.
  • पूर्णत: सुरक्षित आणि भरवशाचे.
  • रुपे कार्डधारकांसाठी २,००,००० रुपयांपर्यंतचे अपघातविमा संरक्षण.

Q: कार्डधारकांसाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत?

  • इतर बँकांच्या कार्डधारकांसाठी/ग्राहकांसाठी या महाबँक एटीएममध्ये जास्तीतजास्त १०,००० रुपयांची रक्कम काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
  • महाबँक एटीएमचा कार्डचा वापर करणाऱ्या धारकांना इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठीही अधिकतम १०,००० रुपयांची मर्यादा घालण्यात आलेली आहे.
  • दुसऱ्या वर्षापासून पुढे एटीएम कम डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क रु.१०० अधिक जीएसटी असे असेल. (प्रभावी दिनांक ०१-०३-२०१४)

Q: इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी काही आकार आहेत का?

दिनांक २१.०३.२०२० पासून ३ महिन्यांसाठी रिटेल वापरकर्त्यांसाठी डेबिट कार्ड चार्जेस शून्य असतील.

Q: माझ्या डेबिट कार्डसाठी ग्रीन पिन जनरेट करण्यासाठी कोणते टप्पे आहेत?

नवीन डेबिट कार्डसाठी ‘‘ग्रीनपिन’’ जनरेट करण्यासाठी पुढील टप्प्यांचा अवलंब करावा लागेल:

  1. शाखेकडून डेबिट कार्ड प्राप्त झाल्यानंतर ३ तासांनंतर नजीकच्या कोणत्याही महाबँक एटीएमला भेट द्या.
  2. महाबँक एटीएममध्ये कार्ड घाला आणि स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसणारे ‘‘रि-पिन रिक्वेस्ट’’ निवडा.
  3. हा पर्याय निवडल्यानंतर कृपया कन्फर्म दाबा.
  4. सिस्टीम तुमचा मोबाईल क्रमांक पडताळून पाहील आणि पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ८ तासांनंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी २४ तासांसाठी वैध असेल.
  5. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर पिन सेट करण्यासाठी महाबँकेच्या कोणत्याही एटीएममला भेट द्या.
  6. महाबँक एटीएममध्ये कार्ड घाला आणि स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसणारा ‘‘ॲक्टिव्हेट न्यू पिन’’ हा पर्याय निवडा.
  7. त्यानंतर सिस्टीम ओटीपी देण्यासाठी सांगेल.
  8. ओटीपी वैध केल्यानंतर एटीएम ४ अंकी नवीन पिन सेट करण्यास सांगेल..

Q: माझे डेबिट कार्ड कसे ब्लॉक करावे?

क्रेडिट कार्डच्या मागच्या बाजूला दिलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून किंवा आमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ह्या डिजिटल चॅनेल्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक करू शकता.

इंटरनेट बँकिंग

Q: लॉगिन आणि/किंवा ट्रँझॅक्शन पासवर्ड कसा रिसेट करावा?

A: लॉगिन पेजवर दिलेल्या ‘फरगॉट पासवर्ड’ वर क्लिक करा. विनंती केलेले तपशील भरा आणि सबमिट करा. जर तुम्ही दिलेली महिती वैध आणि अचूक असेल, तर आम्ही तुमच्यासाठी नवीन पासवर्ड जनरेट करू.

Q: युजर आयडी कसा रिसेट करावा?

तुमचा युजर आयडी जाणून घेण्यासाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा किंवा तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर इंटरनेट बँकिंग सेलशी संपर्क साधू शकता किंवा तुमचा संपर्क क्रमांक मेलमध्ये लिहून mahaconnect@mahabank.co.in वर मेल पाठवू शकता.

Q: 'Enter correct Login Id and/or Password' ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

ह्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही जो लॉगिन आयडी किंवा पासवर्ड नोंदवीत आहात तो अचूक नाही. कृपया लॉगिन आयडी/पासवर्ड पुन्हा तपासून पहा. कृपया तुमच्या कीबोर्डवरील कॅप्स लॉकची स्थिती तपासून पहा कारण पासवर्ड हा केस सेन्सिटिव्ह असतो.

Q: 'Invalid Password - Try Again’ ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

ह्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही जो पासवर्ड नोंदवीत आहात तो अचूक नाही. कृपया पासवर्ड पुन्हा तपासून पहा. कृपया तुमच्या कीबोर्डवरील कॅप्स लॉकची स्थिती तपासून पहा कारण पासवर्ड हा केस सेन्सिटिव्ह असतो.

Q: 'User already logged on, try logging in after closing the current session' ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

ह्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही आधीच यशस्वीपणे लॉगिन केलेले आहे आणि ते सेशन चालू आहे किंवा तुमचे शेवटचे सेशन तुमच्याकडून अकल्पितपणे संपवले/खंडित केले गेले (म्हणजेच तुम्ही योग्यपणे लॉगआऊट केले नाही). कृपया २० मिनिटे वाट पहा आणि पुन्हा लॉगिन करण्याचा प्रयत्न करा.

Q: 'Exceeded maximum number of tries, so the User Id has been locked' ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

ह्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही ३ वेळा चुकीचा पासवर्ड टाकलेला आहे म्हणून तुमचे इंटरनेट बँकिंग अकाऊंट लॉक केले गेले आहे. कृपया पासवर्ड पुन्हा निर्माण करण्यासाठी 'Forgot Password' लिंक वर क्लिक करा. तुम्हाला जर पासवर्ड आठवत असेल, तर तुमचे खाते अनलॉक करण्यासाठी इंटरनेट बँकिंग सेलशी संपर्क साधा.

Q: 'User has not logged in within dormant period from date of activation' ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

ह्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही ॲक्टिव्हेशन केल्यापासून ६० दिवसांच्या आत लॉगिन केलेले नाही. ॲक्टिव्हेशन केल्यापासून युजरने (वापरकर्त्याने) ६० दिवसांच्या आत लॉगिन करणे आवश्यक असते, अन्यथा तुमचे खाते निष्क्रिय होईल. तुमचे खाते सक्रिय करण्यासाठी कृपया इंटरनेट बँकिंग सेलशी संपर्क साधा.

तुमच्या संपर्क क्रमांकाचा उल्लेख मेलमध्ये करून तुम्ही आम्हाला mahaconnect@mahabank.co.in वर मेल पाठवू शकता.

Q: ‘Request could not be processed’ ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

टेंपररी फाईल्स डिलिट करा, त्यानंतर ‘Request could not be processed’ अशी एरर (त्रुटी) येणार नाही. Path- click on start>> Type %temp% >> Delete all temporary files

Q: 'Issue with Mahasecure activation’ ही एरर (त्रुटी) कशी हाताळावी?

पुढील युजर माहितीसह mahasecure@mahabank.co.in वर मेल पाठवा.

  1. खाते क्रमांक आणि नाव
  2. युजर आयडी (रिटेल युजर) आणि कॉर्प आयडी आणि युजर आयडी (कॉर्पोरेट युजर)
  3. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक.

मोबाइल बँकिंग

Q: मोबाईल बँकिंग अहोरात्र (२४/७) चालू आहे का?

A: होय, मोबाईल बँकिंग सेवा २४/७ उपलब्ध असतात.

Q: मोबाईल बँकिंगमध्ये कोणत्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतात?

  1. निधी हस्तांतरण (बँकेतून बँकेत/एनईएफटी/आयएमपीएस)
  2. बिलांचा भरणा  (वीज / गॅस / पाणी / दूरसंचार / विमा / कर / क्रेडिट कार्ड)

कार्ड सेवा, ट्रँझॅक्शन सर्च, खात्याच्या विवरणाची विनंती, चेकबुकसाठी विनंती, चेकच्या स्थितीची चौकशी, चेक थांबवणे आणि टीडीएसची चौकशी यांसारख्या इतर अनेक सेवाही ग्राहकाने मोबाईल बँकिंग चॅनेलचा पूर्णपणे वापर करावा म्हणून उपलब्ध असतात.

Q: मर्यादा किती-किती असतात आणि त्या कशा वाढवायच्या?

आयएमपीएस/एनईएफटी/युटिलिटी बिल पेमेंट यांच्यासाठी दैनंदिन मर्यादा रु.५०,०००/- आहे.

आयएमपीएस (पी२एम) साठी दैनंदिन मर्यादा रु.५,०००/- आहे.

स्वत:च्या खात्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

Q: मी मोबाईल बँकिंगमधून डेबिट कार्डच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकेन का?

होय, तुम्ही डेबिट कार्ड ब्लॉकिंग, डेबिट कार्ड पिन रिजनरेशन, वॉर्म लिस्टिंग (तात्पुरते ब्लॉक करणे) आणि अनवॉर्म लिस्टिंग (ब्लॉक काढून टाकणे) यांसारख्या अनेक डेबिट कार्ड क्रियांवर नियंत्रण ठेवू शकता.

Q: मोबाईल बॅंकिंगचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचे बँक खाते असण्याची गरज असते का?

होय, ज्या बँकेने ही सुविधा दिलेली असते त्या बँकेत ग्राहकाचे खाते असणे आवश्यक असते.

Q: मी m-Connect+  (एम-कनेक्ट + ) साठी माझी नोंदणी बँकेच्या शाखेत न जाता कशी करू शकेन?

डाऊनलोड लिंक प्राप्त करण्यासाठी ९२२३१८१८१८ या क्रमांकावर MAHAMOBILE असा एसएमएस पाठवा किंवा आम्हाला ॲप स्टोअर्समध्ये शोधा.

Q: मी चेकवर आधारित व्यवहार करू शकेन का?

तुम्ही चेकबुक प्राप्त करण्यासाठी नवीन विनंती करू शकता, आधीच दिलेल्या चेकची स्थिती तपासून पाहू शकता आणि तुम्ही दिलेल्या चेकसाठी स्टॉप पेमेंट असा निर्देशही देऊ शकता.

Q: जर ग्राहकाला पुढील समस्या येत असेल, नोंदणी करताना ‘‘तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवलेला नाही’’ अशी त्रुटी येत असेल तर काय करावे?

नोंदणी करताना, ग्राहकाने खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन ग्राहकाचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि खाते क्रमांक तपासून पाहते. एकदा पडताळणी करून झाली की, युजरला त्याच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून ॲक्टिव्हेशन कोड प्राप्त होतो आणि युजर ॲक्टिव्हेशन फॉर्ममध्ये सीआयएफ मॅप केले जाईल, ॲक्टिव्हेशन कोडची पडताळणी झाल्यानंतर युजरला नोंदणी करण्यासाठी ३ पर्याय दिले जातील.

जर ग्राहकाला वरील संदेश प्राप्त झाला, तर:

  • जर ग्राहक मोबाईल बँकिंग ॲप नोंदणीसाठी नोंदणीकृत मोबाईलचा वापर करीत असेल.
  • जर ग्राहक ड्युअल सिम फोन वापरीत असेल आणि नोंदणीकृत सिम हे सिम१ स्लॉटमध्ये नसेल तर.

Q: नवीन चेकबुकसाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही आमच्या बँकेचे महामोबाईल बँकिंग ॲप्लिकेशनचा वापर करून नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकता.

Q: माझ्या चेकची स्थिती कशी तपासून पहावी?

तुम्ही आमच्या बँकेच्या महामोबाईल बँकिंग ॲप्लिकेशनचा वापर करून चेकची स्थिती तपासून पाहू शकता. तुमचे सर्व चेक संपले असतील, तर तुम्ही नवीन चेकबुकसाठीही विनंती करू शकता.

यूपीआय (UPI)

Q: यूपीआय ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी कशी करावी?

A: मोबाईल युजरला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ‘सेंड एसएमएस’ हा पर्याय निवडून एसएमएस पाठवावा लागतो. पडताळणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी व्हॅलिडेशन केले जाईल. प्रथम स्वत:चे नाव, आडनाव, ईमेल आयडी नोंदवा. यशस्वीरीत्या नोंदणी केल्यानंतर स्क्रीनवर कन्फर्मेशन दिसेल.

Q: यूपीआय ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशन पिन कसा सेट करावा?

नोंदणी केल्यानंतर युजर त्याला हवा तो ॲप्लिकेशन पिन सेट करू शकेल आणि तो रि-एंटर करून त्याची खात्री करू शकेल.

Q: किती चुकीचे प्रयत्न केल्यानंतर ॲप्लिकेशन पासवर्ड ब्लॉक होतो?

चुकीचे प्रयत्न ५ वेळा केल्यानंतर खाते २४ तासांसाठी ब्लॉक होईल.

Q: मी यूपीआय ॲप्लिकेशनविषयीची तक्रार कशी नोंदवावी?

तक्रार नोंदविण्यासाठी साईड ड्रॉवरमध्ये जा, कंप्लेंट हा पर्याय निवडा. जर युजरने आधीच तक्रार नोंदवलेली असेल, तर स्क्रीनवर यादी येईल. नवीन तक्रार नोंदविण्यासाठी स्क्रीनवरील + आयकॉन सिलेक्ट करा. सबमिशन केल्यानंतर ईमेल आयडी, विषय आणि वर्णन नोंदवा, तुमची तक्रार यादीत दिसू लागेल.

Q: पेमेंट ॲड्रेस कसा सेट करावा?

लॉगिन केल्यानंतर युजर त्याला हवा तो पेमेंट ॲड्रेस नोंदवून त्याचा पेमेंट ॲड्रेस सेट करू शकेल. पेमेंट ॲड्रेसमध्ये a-z, A-Z 0-9, - (hyphen) चा समावेश असावा, उदा. Raj123@mahb

पॉस(POS)

Q: माझे टर्मिनल सदोष आहे, मी कोणाशी संपर्क साधावा?

A: 1ONGO मशीन : कृपया तुमचा एमआयडी आणि टीआयडी/खाते क्रमांक आणि पीओएस मशीनशी संबंधित समस्या सादर करा आणि itsl.helpdesk@agsindia.com आणि trupti.dalvi@indiatransact.com वर मेल पाठवून आमच्या व्हेंडरच्या माध्यमातून तांत्रिक साह्यासाठी विनंती करा. किंवा तुम्ही टोल पे क्र./ग्राहकसेवा क्र. १८००२६६९७९३ वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. ह्या विनंतीची नोंद घेऊन तुम्हाला कंप्लेंट आयडी दिला जाईल.

एअरपे मशीन: कृपया तुमचा एमआयडी आणि टीआयडी/खाते क्रमांक आणि पीओएस मशीनशी संबंधित समस्या सादर करा आणि pos.support@airpay.co.in वर मेल पाठवून आमच्या व्हेंडरच्या माध्यमातून तांत्रिक साह्यासाठी विनंती करा.

Q: मला काही टर्मिनल पेपर रोल्ससाठी ऑर्डर द्यायची आहे. मी कोणाशी संपर्क साधावा?

itsl.helpdesk@agsindia.com आणि trupti.dalvi@indiatransact.com वर मेल पाठवून आमच्या व्हेंडरला विनंती करू शकता किंवा त्यांचा टोल पे क्र./ग्राहकसेवा क्र. १८००२६६९७९३ वर कॉल करून विनंती करू शकता. तुमच्या विनंतीची नोंद घेतली जाईल आणि ती शक्य तेवढ्या लवकर सोडवली जाईल.

Q: माझे टर्मिनल ऑफलाईन आहे, मी व्यवहारांचा स्वीकार कसा करावा?

आम्ही तुम्हाला टर्मिनल पुन्हा सुरू करून पुन्हा प्रयत्न करण्याची विनंती आणि शिफारस करीत आहोत. परंतु तरीही समस्या चालूच राहिली, तर तुम्ही आमच्या व्हेंडरकडे ईमेल/कॉल लॉगच्या माध्यमातून उपरोक्त पॉइंट नं. १ वर म्हटल्याप्रमाणे विनंती करू शकता.

Q: जर टोल फ्री क्रमांक १८००२२३२२५ बंद असेल तर मी माझ्या इतर समस्यांसाठी/मदतीसाठी कुठे संपर्क साधावा?

सावधानतेची एक उपाययोजना म्हणून टोल फ्री क्र. १८००२६६९७९३ बंद करण्यात आलेला आहे. परंतु तुम्ही तुमची शंका/विनंती moumita.paul@mahabank.co.in वर ईमेल करू शकता. तिच्या निवारणासह तिच्याकडे लक्ष दिले जाईल.

Q: पीओएस/क्यूआरच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांचे पैसे मला कसे आणि कधी मिळतील?

तुम्ही पूर्ण केलेल्या व्यवहारांवर आणि सेटलमेंटवर आम्ही टी+१ (बँकेच्या नियंत्रणाबाहेरील स्थितीचा अपवाद वगळून) आधारे प्रक्रिया करू आणि त्यानुसार तुमच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.

आरटीजीएस / एनईएफटी / आयएमपीएस

Q: आरटीजीएस/आयएमपीएससंबंधी काही समस्या असल्यास कुठे संपर्क साधावा?

A: ग्राहकांच्या तक्रारींसाठी संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत:

  • एनईएफटीसाठी ग्राहकसुविधा केंद्र : ०२२-२२७८०३२५
  • एनईएफटी कक्षचा ईमेल आयडी: bomneft@mahabank.co.in
  • आरटीजीएस कक्ष: ०२२-२२७८०३२४
  • आरटीजीएस कक्षाचा ईमेल आयडी: cmrtgs@mahabank.co.in

Q: एनईएफटी/आयएमपीएस व्यवहार केले जाऊ शकतील असे विविध डिजिटल चॅनेल्स कोणते आहेत?

एनईएफटी/आयएमपीएस व्यवहार बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग डिजिटल चॅनेल्सच्या माध्यमातून केले जाऊ शकतात.

Q: ऑनलाईन एनईएफटी/आयएमपीएस व्यवहारांसाठी किती पैसे आकारण्यात येतात?

बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या एनईएफटी/आयएमपीएससाठीचे चार्जेस हे २१.०३.२०२० पासून ३ महिन्यांसाठी युजर्ससाठी शून्य आहेत.

एसपीजीआरएस पोर्टल (तक्रारींसाठी)

Q: तक्रार कोठे दाखल करावी?

A: सर्व डिजिटल तक्रारी एसपीजीआरएसवरच नोंदवल्या पाहिजेत. (https://www.bankofmaharashtra.in/pgrs/default)

Q: तक्रारीच्या निवारणाची स्थिती कशी जाणून घ्यावी

एसपीजीआरएस, कंप्लेंट आयडी/ट्रॅकर क्रमांक टाकून तपासावी.

Q: एसपीजीआरएसवर तक्रारीची स्थिती कशी तपासून पहावी?

लॉगिन केल्यानंतर ट्रॅक कंप्लेंट स्टेटसवर क्लिक करा आणि कंप्लेंट आयडीच्या साह्याने स्थिती तपासून पहा.