Beti Bachao Beti Padhao

व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया (व्ही-सीआयपी)

पार्श्वभूमी :-

व्ही-सीआयपी ही बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याद्वारे फेशियल रेकग्निशन (म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चेहऱ्याची ओळख) च्या सहाय्याने ग्राहकांची ओळख पटविण्याची पर्यायी पद्धत आहे. या प्रक्रियेला आरबीआयने मान्यता दिली आहे. ही पेपरलेस, कॉन्टॅक्टलेस ऑनलाइन सुविधा ग्राहकांची केवायसी प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे.

यूआयडीएआय कडून आधार ओटीपी पडताळणी आणि एनएसडीएल कडून पॅन पडताळणी करून खाते डिजिटल पद्धतीने उघडले जाते.

व्ही-सीआयपी प्रक्रियेत आपले केवायसी दस्तऐवज आणि स्वाक्षरी बँकेच्या अधिकाऱ्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे रिअल टाइममध्ये पडताळली जातात. हे अद्ययावत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालित फेस मॅच तंत्रज्ञान आणि कागदपत्रांचे रिअल टाइम ऑनलाइन सत्यापन वापरते. यामध्ये डेटा ची उच्च सत्यता आणि गोपनीयतेची उच्च मानके राखले जातात.

आपल्याला बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. आपली केवायसी प्रक्रिया आपल्या सोयीनुसार भारतातील कोणत्याही ठिकाणाहून पूर्ण केली जाऊ शकते.

ठळक वैशिष्ट्ये :-

या अॅप्लिकेशन मध्ये सध्या खालील सोयी उपलब्ध आहेत

  1. नवीन सामान्य बचत खाते उघडणे.
  2. विद्यमान ऑनलाइन बीएसबीडी खात्याचे सामान्य बचत खात्यात रूपांतर करणे.
  3. विद्यमान ग्राहकांद्वारे नवीन ग्राहकांची बँकेला ओळख करून देणे.
  4. अशा नव्याने ओळख झालेल्या ग्राहकांचे नवीन बचत खाते उघडणे.
  5. ग्राहकांचे केवायसी नियतकालाने अद्ययावत करणे (री-केवायसी).

याचा वापर कसा करावा :-

• व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेसाठी "V-CIP" टॅबवर क्लिक करा.

V-CIP - आता तुमचे खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा