Azadi ka Amrit Mahatsav

भागधारक संपर्क

पत्रव्यवहारासाठी पत्ता

गुंतवणूकदार सेवा विभाग:

कंपनी सचिव,
गुंतवणूकदार सेवा विभाग,
बँक ऑफ महाराष्ट्र,
लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे 411005,
फोन नं : 020 25511360 Fax No. : 020 2553 2346
ई-मेल आयडी : investor_services@mahabank.co.in

रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट:

एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लि.,
ऑफिस 3B3, तिसरा मजला “B” विंग गुंदेचा ऑनक्लेव्ह प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लिमिटेड, खेराणी रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व)
मुंबई – ४०० ०७२
संपर्क व्यक्ती: श्री मधुकर पारसे
फोन. क्रमांक :०२२ २८५१६०२१/ २२/ ४६०४९७१७
ई-मेल आयडी:helpdeskmum@mcsregistrars.com / mparase@mcsregistrars.com
संकेतस्थळ:www.mcsregistrars.com

स्टॉक एक्स्चेंजवर बँकांचे शेअरचे विवरण:

बँक स्टॉक एक्सचेंजेसमध्ये खालील शेअरची नोंदणी केली आहे

बीएसई लिमिटेड (बीएसई)
पत्ता: फिरोझ जीजीभॉय टॉवर्स,
दलाल स्ट्रीट, मुंबई - 400001
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)
पत्ता: एक्सचेंज प्लाझा, प्लॉट नं. सी / 1,
जी ब्लॉक, बांद्रा (पूर्व), मुंबई - 400051

स्टॉक कोड :

बीएसई लिमिटेड (बीएसई): 532525
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई): महाबँक ईक्यू
आंतरराष्ट्रीय सुरक्षा ओळख क्रमांक (ISIN) : आयएनई457A01014

समभागांच्या हस्तांतरणासाठी कोणती प्रक्रिया आहे?

समभागांच्या हस्तांतरणासाठी कोणती प्रक्रिया आहे?

प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरणासाठी, शेअर हस्तांतरण फॉर्म व्यवस्थित भरून शेअर हस्तांतरण फॉर्मच्या अंमलबजावणीच्या तारखेला शेअर्सच्या प्रचलित बाजार मूल्याच्या 0.25% रकमेचे योग्य आणि अनुज्ञेय स्टॅम्प (विशेष ऍडीझिव्ह शेअर ट्रान्स्फर स्टॅम्प) हस्तांतरण करारावर लावावेत. व्यवस्थित भरलेले शेअर हस्तांतरण फॉर्म हस्तांतरण करणाऱ्या (मूळ व्यक्ती) आणि ज्याच्याकडे हस्तांतरित केले जाणार आहे ती व्यक्ती, अशा दोघांच्या पॅनकार्डच्या स्व-साक्षांकित प्रती अर्जासह हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बँक किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे भरून द्याव्यात कंपनीच्या रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंटला हस्तांतरणाची प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 15 दिवस लागतात

हस्तांतरण करार बँकेच्या रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट एमसीएस शेअर ट्रान्स्फर एजंट लि. कार्यालय नं. 022, तळमजला, काशीराम जमनादास बिल्डिंग, 5, पी. डी मेलो रोड, घाडीयाळ गोडी, मस्जिद (पूर्व), मुंबई 400009 या पत्त्यावर पाठवावा.

वरील प्रक्रिया डीमॅट स्वरूपात असलेल्या समभागांवर लागू नाही अशा समभागधारकांनी जेथे त्यांचे डिमॅट खाते चालू आहे अशा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) शी संपर्क साधावा.

शेअर हस्तांतरण फॉर्मसाठी इथे क्लिक करा

समभागांचे हस्तांतरण करण्यासाठी काय करावे लागेल?

समभागांचे हस्तांतरण करण्यासाठी काय करावे लागेल?

एकल समभागधारकाच्या आणि जेथे नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती झाली आहे अशा प्रकरणात नुकसानभरपाईसह शपथपत्र सादर केल्यावर नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे समभाग हस्तांतरित केले जातील. व्यवस्थित भरलेल्या नुकसानभरपाईसह शपथपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने (मॅजिस्ट्रेट, नोटरी पब्लिक, भारत सरकार किंवा कोणत्याही शेड्यूल्ड बँकेचे व्यवस्थापक) प्रमाणित केलेला मृत नोंदणीकृत भागधारकाच्या मृत्यूचा दाखला, मूळ शेअर प्रमाणपत्रासह, बँकेकडे किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे पाठवावा

एकल शेअरहोल्डरच्या बाबतीत, जिथे कोणालाही नामनिर्देशित केलेले नाही परंतु मृत्युपत्र मात्र तयार केलेले आहे अशा प्रकरणात नोंदणीकृत मृत शेअरधारकाच्या अधिकृत मृत्युपत्रान्वये जी व्यक्ती वारसदार होणार आहे तिच्या नावे शेअर हस्तांतरित केले जातील

जर मृत भागधारकाचे मृत्युपत्र नसल्यास आणि नामनिर्देशन देखील झाले नसल्यास या संदर्भात आवश्यक त्या प्रक्रियांचे पालन केल्यावरच शेअर हस्तांतरित केले जातील या साठी कायदेशीर वारसदाराला खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे

  1. दावेदारांनी दाखल केलेले शपथपत्र
  2. क्षतिपूर्ति बाँड
  3. अधिकार हक्क फॉर्म
  4. इतर वारसदारांकडून शेअरवर दावा करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे ना हरकत प्रमाणपत्र
  5. जामीन विषयक फॉर्म

हस्तांतरण प्रभावी होण्यासाठी उपरोक्त दस्तऐवज, सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे (मॅजिस्ट्रेट, नोटरी पब्लिक, भारत सरकार किंवा कोणत्याही शेड्यूल्ड बँकेचे व्यवस्थापक) योग्यरित्या प्रमाणित मृत नोंदणीकृत भागधारकाच्या मृत्यूच्या सर्टिफिकेटची प्रत आणि मूळ शेअर प्रमाणपत्र बँकेकडे किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे पाठवावी वरील कार्यपद्धती डीमॅट स्वरूपात असलेल्या समभागांवर लागू नाही. यासाठी नामनिर्देशित / कायदेशीर वारसांना जिथे त्यांचे डिमॅट खाते चालू असते त्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्टशी संपर्क साधावा लागतो.बँक किंवा रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.

समभाग हस्तांतरण फॉर्म साठी येथे क्लिक करा

समभागांची एकत्रीकरणाची आणि उपविभागाची प्रक्रिया काय आहे?

समभागांची एकत्रीकरणाची आणि उपविभागाची प्रक्रिया काय आहे?

समभाग / उपविभागासाठी मूळ समभाग प्रमाणपत्राबरोबर समभागधारकाने लेखी अर्ज करणे आवश्यक आहे आणि अशा प्रकरणात मूळ प्रमाणपत्राऐवजी नवीन प्रमाणपत्र जारी केले जातील. लाभांश, हस्तांतरण इत्यादीच्या रकमा भरणे सोयीचे व्हावे यासाठी एकाच नावासह वेगवेगळ्या फोलिओमध्ये असलेले समभाग हे एकाच फोलिओमध्ये एकत्रित करणे योग्य राहील

डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी काय करावे लागेल?

डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी काय करावे लागेल?

खराब / नुकसान झालेल्या शेअर प्रमाणपत्रासाठी:
डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र खराब / नुकसान झालेल्या शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात जारी केले जाईल. डुप्लिकेट सर्टिफिकेट जारी करणे सुलभ होण्यासाठी खराब / नुकसान झालेली शेअर प्रमाणपत्रे विनंती अर्जाबरोबर संबंधित माहितीसह पाठविली जाऊ शकतात.

प्रमाणपत्राची चोरी झाल्यास किंवा हानी झाल्यास :
शेअर सर्टिफिकेटचे नुकसान झाल्यास त्याची माहिती ताबडतोब बँक किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे प्रमाणपत्र नंबर / फोलियो क्रमांक व अशा समभागांचे स्टॉप ट्रान्सफर" चिन्हांकित करण्यासाठी आणि नकल जारी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी असलेल्या विशिष्ट क्रमांकासह चिन्हांकित करून पाठवावी प्रमाणपत्र हरविल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवून संबंधित एफआयआरची प्रत प्राप्त करावी. त्यानंतर एफआयआरची प्रत तसेच प्रक्रियेत नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक असलेली कागदपत्रे नकल जारी करण्यासाठी बँकेकडे किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे पाठविली जातील. नकल शेअर सर्टिफिकेट नुकसान झालेल्या / हरविलेल्या मूळ प्रमाणपत्राविषयी दोन वृत्तपत्रात सार्वजनिक नोटिस जारी करण्याच्या 15 दिवसाच्या मुदत समाप्तीनंतर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट दिले जाईल

मूळ समभाग प्रमाणपत्राची पुनर्प्राप्ती झाल्यास:
जर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी केले असेल तर भागधारकाने मूळ शेअरचे प्रमाणपत्र बँक किंवा रजिस्ट्रारकडे ताबडतोब परत करण्याविषयीची त्यास विनंती करण्यात आलेली असेल.तथापि, जर डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी मूळ शेअर सर्टिफिकेट मिळाल्यास कृपया बँकेच्या किंवा रजिस्ट्रारला संबंधित फोलियोबाबत घ्यावयाच्या दक्षताबाबतच्या सूचना ताबडतोब काढून टाकण्यासाठी लगेच सूचना द्या आवश्यक फॉर्मसाठी कृपया बँकेच्या रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटशी संपर्क साधावा

डुप्लिकेट लाभांश वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया काय आहे?

डुप्लिकेट लाभांश वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया काय आहे?

ज्या भागधारकांना लाभांश वॉरंट पाठविल्यापासून योग्य त्या कालावधीमध्ये प्राप्त न झाल्यास त्यांना संबंधित फोलिओ क्रमांक आणि प्रमाणपत्र क्रमांक नमूद करून अर्ज करावा लागेल.समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर त्यांचे डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद केलेले असल्यास ते प्रत्यक्ष स्वरूपात असतील. बँकेच्या स्टेटमेंटची पडताळणी केल्यानंतर आणि नमूद वॉरंटची रक्कम भरलेली नसल्यास डुप्लिकेट वॉरंट जारी केले जाईल.

डिव्हिडंड क्लेम फॉर्मसाठी येथे क्लिक करा

संयुक्त समभागधारकाच्या बाबतीत, एका समभागधारकाच्या मृत्युनंतर, सर्व्हायव्हिंग समभागधारकाला समभाग स्वतःच्या नावावर कसे करता येतील?

संयुक्त समभागधारकाच्या बाबतीत, एका समभागधारकाच्या मृत्युनंतर, वारसदार समभागधारकाला समभाग स्वतःच्या नावावर कसे करता येतील?

उत्तर: कोणत्याही संयुक्त समभागधारकाच्या मृत्युनंतर कंपनीकडे प्रमाणित मृत्यु प्रमाणपत्राच्या प्रतीसह एक अर्ज करावा लागतो. त्यानंतर प्राप्त मृत्यू प्रमाणपत्रासह प्राप्त अर्ज आणि समभागविषयक प्रमाणपत्रे विचारात घेऊन मृत्यू पावलेल्या समभागधारकाचे नाव कंपनीद्वारे काढून टाकले जाते आणि इतर जिवंत असलेल्या समभागधारकाच्या नावाने समभागविषयक प्रमाणपत्रे जारी केली जातात.

नामनिर्देशित व्यक्तीला त्याच्या / तिच्या नावावरत शेअर मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय आहे?

नामनिर्देशित व्यक्तीला त्याच्या / तिच्या नावावरत शेअर मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय आहे?
  1. समभाग नामनिर्देशित व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी खालील दस्तऐवज पाठविणे आवश्यक आहे
  2. अर्ज
  3. योग्यप्रकारे प्रमाणित शेअरहोल्डरच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
  4. मूळ शेअर प्रमाणपत्रे आणि
  5. नामनिर्देशित व्यक्तीच्या पॅनची प्रत आणि पत्त्याचा पुरावा

नामनिर्देशित व्यक्तीच्या नावावर शेअर्सची नोंदणी करण्यासाठीच्या फॉर्मकरिता येथे क्लिक करा

डिव्हिडंड वॉरंट्स पुन्हा सत्यापित करण्यासाठी कोठे पाठवायची आवश्यकता आहे?

डिव्हिडंड वॉरंट्स पुन्हा सत्यापित करण्यासाठी कोठे पाठवायची आवश्यकता आहे?

वैधता कालावधीच्या समाप्तीनंतर, वॉरंट (बँक) किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे पुन्हा सत्यापित करण्यासाठी / नवीन वॉरंट जारी करण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे.

शेअर प्रमाणपत्र, डिव्हिडंड वॉरंट मधील चूक कशी दुरुस्त करता येईल?

शेअर प्रमाणपत्र, डिव्हिडंड वॉरंट मधील चूक कशी दुरुस्त करता येईल?

शेअर सर्टिफिकेट / डिव्हिडंड वॉरंटमध्ये दुरुस्ती करण्याची विनंती सर्व धारकांना योग्य प्रकारे सही करून मूळ कागदपत्रांसोबत बँकेकडे किंवा आमच्या रजिस्ट्रारकडे पाठवता येईल.

जर पत्त्यातील / ईमेल / पॅन अद्ययावत माहितीमध्ये काही बदल झाला असेल तर तो रेकॉर्ड करण्यासाठी काय प्रक्रिया आहे? पत्त्यातील बदलासाठी संयुक्तधारक विनंती करू शकतो का?

जर पत्त्यातील / ईमेल / पॅन अद्ययावत माहितीमध्ये काही बदल झाला असेल तर तो रेकॉर्ड करण्यासाठी काय प्रक्रिया आहे? पत्त्यातील बदलासाठी संयुक्तधारक विनंती करू शकतो का?

भागधारकाने आपला पत्ता ईमेल / पॅन कार्डमध्ये अद्ययावत केलेला तपशील किंवा झालेला कोणत्याही प्रकारचा बदल (अचूक पिन कोडसह) बँकेकडे किंवा बँकेच्या आर अँड टी एजंट्सकडे ताबडतोब लिखित स्वरूपात फोलियो क्रमांक नोंदवून कळवावा.

बदललेल्या पत्त्याच्या फॉर्मसाठी आणि ईमेल अद्ययावत करण्यासाठी येथे क्लिक करा

समभागधारकाच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर तो रेकॉर्ड करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

समभागधारकाच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर तो रेकॉर्ड करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

व्यक्तींच्या नावातील बदल:
समभागधारकांनी त्यांच्या नावामधील बदलाची विनंती मॉल प्रमाणपत्राबरोबर शासकीय राजपत्रातील अथवा वर्तमानपत्रातील अधिसूचनेच्या प्रतीसह किंवा शपथपूर्वक योग्य मूल्य लावलेल्या स्टँम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्रासह पाठविणे आवश्यक आहे. बँकरला देखील नवीन प्रमाणित नमुना स्वाक्षरी रजिस्ट्रारकडे सबमिट करावी लागेल.

लग्न/घटस्फोट यामुळे झालेला नावातील बदल:
लग्न/घटस्फोट यामुळे झालेल्या नावातील बदलासाठी सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या विवाह प्रमाणपत्राच्या/घटस्फोटविषयक आदेशाच्या मूळ प्रमाणपत्रासह रजिस्ट्रारकडे पाठवावे. बँकरला देखील नवीन प्रमाणित नमुना स्वाक्षरी रजिस्ट्रारकडे सबमिट करावी लागेल.

कंपन्यांच्या नावातील बदल:
नाव बदलण्यास इच्छुक असलेल्या कंपनीने ज्या नावाने शेअर प्रमाणपत्र जारी केले आहेत अशा कंपनीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या, कंपनीच्या रजिस्ट्रारद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रमाणित प्रमाणपत्राची मूळ शेअर प्रमाणपत्रासह प्रत सादर करणे आवश्यक आहे

इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा सुविधा (ईसीएस)

इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा सुविधा (ईसीएस)

लाभांश देय देण्यासंबंधी, बँकेद्वारे ज्यांचे बँकेत खाते आहे अशा बँकेच्या सर्व समभागधारकांना ईसीएसची सुविधा पुरवली जाते.प्रत्यक्ष समभाग बाळगणाऱ्या समभागधारकांपैकी ज्यांची ईसीएस सेवेचा लाभ घेण्याची इच्छा आहे असे समभागधारक त्यांची विनंती आमच्या रजिस्ट्रारकडे खालील तपशीलासह पाठवू शकतातः

  1. लेजर फोलिओ क्रमांक
  2. जेथे खाते उघडले आहे त्या बँकेचे नाव व शाखेचा पत्ता
  3. शाखेतील ज्या खात्यामध्ये लाभांश व्याज जमा केले जाते त्या खात्याचा क्रमांक
  4. ज्या खात्यामध्ये लाभांश / व्याज जमा केले जाणार आहे त्या खात्याच्या रद्द केलेल्या धनादेशाची एक प्रत

तथापि, जेव्हा समभाग डिमॅट स्वरूपात असतील तेव्हा या सुविधेचा लाभ घेण्यासाठी भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) कडे ज्या खात्यामध्ये लाभांश / व्याज जमा केले जाते त्या खात्याच्या तपशिलासह संपर्क साधणे आवश्यक आहे.,

ईसीएस फॉर्मसाठी येथे क्लिक करा

इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये मी शेअर्स कसे खरेदी / विक्री करू?

इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये मी शेअर्स कसे खरेदी / विक्री करू?

आपल्या ब्रोकर आणि डीपीशी समन्वय साधून आपण डिपॉझिटरीद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री करू शकता. असे व्यवहार सोपे आणि वेगवान असतील. प्रत्यक्ष स्वरूपातील प्रमाणपत्रांसाठी ज्याप्रमाणे रकमेचा भरणा केला जातो त्याचप्रमाणे अशा व्यवहारासाठी रकमेचा भरणा केला जातो पेआउटच्या पुढील दोन दिवसात हस्तांतरण करार भरण्याची कोणतीही औपचारिकता न करता किंवा रजिस्ट्रेशनसाठी कंपनीकडे अर्ज केल्याविना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात खरेदी केलेल्या सिक्युरिटीज आपल्या खात्यात जमा केल्या जातील.अशा सर्व व्यवहारांना मुद्रांक शुल्क माफ आहे आणि त्यानुसार कोणत्याही शेअर हस्तांतरणाच्या स्टँपची आवश्यकता नाही.

असे व्यवहार हे बँकेमार्फत केले जात नाहीत आणि डेबिट / क्रेडिट थेट डिपॉझिटरी सिस्टीममध्ये होते. तथापि, लागू असलेल्या रेकॉर्डच्या तारखेला / बुक क्लोजरच्या तारखेला अशा सिक्युरिटीज धारक व्यक्तीस कॉर्पोरेट लाभ दिले जातील

मी माझ्या पेपर प्रमाणपत्रांना रुपांतरीत इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये कसे करू?

मी माझ्या पेपर प्रमाणपत्रांना रुपांतरीत इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये कसे करू?

सर्वप्रथम तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) बरोबर एक डीमॅट खाते उघडावे लागेल आणि क्लायंट आयडी नंबर प्राप्त करावा लागेल. त्यानंतर आपण डीपीद्वारा देण्यात आलेला डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म (डीआरएफ) भरून इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये रूपांतरित करून प्रत्यक्ष शेअर प्रमाणपत्रांसह डीपीकडे सादर करावेत.

शेअर सर्टिफिकेट आणि डीआरएफ पावती मिळाल्यानंतर डीपी डिमॅटच्या पुष्टीकरणासाठी बँकेच्या आर अँड टी एजंटला डिपॉझिटरीद्वारे इलेक्ट्रॉनिक विनंती पाठवेल. प्रत्येक विनंतीसाठी एक विशिष्ट व्यवहार क्रमांक असेल.

त्याच वेळी, डीपी डीआरएफ आणि शेअर्सची प्रमाणपत्रे बँकेच्या आर अँड टी एजंटला देतील आणि डीमॅटची पुष्टी करण्यासाठी बँकेच्या आर अँड टी एजंटला विनंती करणाऱ्या एका पत्रासह ते सादर करतील. डीपीकडून मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, कंपनीचा आर अँड टी एजंट डिपॉझिटरीकडे डिमॅटची पुष्टी करतील. पुष्टी केल्याची ही बाब आपले खाते असलेल्या डीपीकडे डिपॉझिटरी वरून दिली जाईल. त्यानंतर डीपीद्वारे संबंधित खात्यामध्ये डीमॅट केलेले शेअर जमा केले जातील. त्यानंतर डीपी तुमच्या शेअर्सना डिमॅट स्वरूपात स्वतःकडे ठेवेल आणि आपण या शेअर्सचे लाभार्थी मालक व्हाल.