Beti Bachao Beti Padhao

पात्र संस्थात्मक प्लेसमेंट

प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज

अस्वीकरण

कृपया ही सूचना काळजीपूर्वक वाचा. ही वेबसाइट पाहणाऱ्या सर्व व्यक्तींना ही सूचना लागू होते. ही माहिती पाहणे काही विशिष्ट अधिकारक्षेत्रांमध्ये कायदेशीर असू शकत नाही. कृपया लक्षात घ्या की खाली नमूद केलेले अस्वीकरण बदलले  किंवा अपडेट केले जाऊ शकते. आपण प्रत्येक वेळी वेबसाइटला भेट देता तेव्हा आपण ते पूर्ण वाचले पाहिजे.

या मध्ये नमूद केलेले विषय युनायटेड स्टेट्स किंवा भारताबाहेरील इतर अधिकारक्षेत्रांमधील व्यक्तींकडे निर्देशित नाही, किंवा त्यांच्या वाचनासाठी नाही. ही माहिती बँक ऑफ महाराष्ट्र ("बँक") द्वारे या वेबसाइटवर केवळ सेक्युरिटीझ अँड इक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) रेगुलेशन्स, २०१८ ("आयसीडीआर  नियम") यांच्या वेळोवेळी अद्ययावत झालेल्या तरतुदींचे पालन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. .

आपल्याला या वेबसाइटवरील माहिती पाहण्याची परवानगी नसल्यास किंवा आपल्याला ही माहिती  पाहण्याची परवानगी आहे की नाही याबद्दल शंका असल्यास, कृपया या वेबपेज मधून बाहेर पडा.

खालील अस्वीकरण हे बँकेच्या 1 जून 2023 रोजीच्या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजावर लागू होते (“प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज”) आणि त्यामुळे प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज वाचण्यापूर्वी हा अस्वीकरण काळजीपूर्वक वाचण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो. प्रिलिमिनरी प्लेसमेंट डॉक्युमेंट वाचल्यास, आपण खालील निर्बंध, अटी आणि नियमांना, त्यात वेळोवेळी केलेल्या कोणत्याही बदलांसह, बांधील राहण्यास सहमती देत आहात.

प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज केवळ भारतीय कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी माहितीच्या उद्देशाने बँकेच्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला आहे. या वेबसाइटवर प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे म्हणजे युनायटेड स्टेट्सकिंवा भारताबाहेरील कोणत्याही अधिकारक्षेत्रात विक्रीची ऑफर किंवा सिक्युरिटीज खरेदी करण्याच्या ऑफरची मागणी आहे असा याचा अर्थ होत नाही.

येथे असलेल्या कोणत्याही माहितीच्या माध्यमातून सिक्युरिटीजची विक्रीसाठी ऑफर करणे बेकायदेशीर असलेल्या कोणत्याही अधिकारक्षेत्रात अशी ऑफर केली जात आहे असे मानता येणार नाही. संलग्न प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजात वर्णन केलेल्या सिक्युरिटीज या यूएस सिक्युरिटीज अॅक्ट 1933, सुधारित केल्याप्रमाणे, किंवा अमेरिकेतील कोणत्याही राज्याच्या सिक्युरिटीज कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या नाहीत, आणि केल्या जाणार नाहीत. अशा प्रकारे नोंदणीकृत असल्याशिवाय, किंवा अशा नोंदणीपासून सूट मिळाल्याशिवाय, किंवा नोंदणी लागू नसलेल्या व्यवहाराशिवाय या सिक्युरिटीज युनायटेड स्टेट्समध्ये विक्रीसाठी ऑफर केल्या जाऊ शकत नाही, किंवा विकल्या किंवा वितरित केल्या जाऊ शकत नाहीत.

त्यानुसार, यू.एस. सिक्युरिटीज अॅक्ट अंतर्गत विनियमांवर अवलंबून राहून ऑफशोर व्यवहारांमध्ये या सिक्युरिटीज विक्री साठी ऑफर केल्या जात आहेत आणि युनायटेड स्टेट्सच्या बाहेर, त्या त्या अधिकार क्षेत्रातील कायद्यांना अनुसरून विकल्या जात आहेत.

संलग्न केलेले प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज भारतातील कोणत्याही कंपनीच्या रजिस्ट्रारकडे प्रॉस्पेक्टस म्हणून नोंदणीकृत केलेले नाही आणि केले जाणार नाही. हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज केवळ प्राप्तकर्त्यासाठीच आहे आणि सामान्य जनतेला या वर्णन केलेल्या सिक्युरिटीजची सदस्यता घेण्याची ऑफर तयार करत नाही.

हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज हे स्टॉक एक्सचेंजकडे खाजगी प्लेसमेंट ऑफर पत्र म्हणून दाखल केले जाईल.

हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज हे भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही नियामक प्राधिकरणाद्वारे पुनरावलोकन केलेले नाही आणि मंजूर केलेले नाही, ज्यात भारताच्या सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डाचा समावेश आहे. हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज हे भारतातील जनतेला आमंत्रण, ऑफर किंवा कोणत्याही सिक्युरिटीजची विक्री म्हणून ग्राह्य धरले जात नाही आणि समजले जाऊ नये.

या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजाचा मसुदा आणि वितरण हे आयसीडीआर नियमावलीच्या चॅप्टर VIII आणि शेड्यूल XVIII वर अवलंबून राहून केले जात आहे. अर्जासोबत प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज प्राप्त करणार्‍या सर्व पात्र क्यूआयबीझची नावे आणि संपर्क तपशील सेबीकडे सबमिट केले जातील.

येथे प्रस्तुत केलेली (“माहिती”) ही आयसीडीआर नियमांना अनुसरून प्रस्तुत केलेली आहे. आयसीडीआर नियमांमध्ये परिभाषित केल्यानुसार पात्र संस्थागत खरेदीदारां व्यतिरिक्त हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज हे सार्वजनिक पातळीवर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा गुंतवणूकदारांच्या वर्गाच्या आत किंवा बाहेरील गुंतवणूकदारांना ऑफर किंवा आमंत्रण किंवा विनंती तयार करत नाही.

जोपर्यंत अर्जासोबत पूर्व-क्रमांकित प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजाच्या माध्यमातून कोणा व्यक्तीला बोली लावण्यासाठी आमंत्रित केले जात नाही, तोपर्यंत अशी ऑफर केली गेली आहे, असे मनात येणार नाही.

या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजाच्या आणि इक्विटी शेअर्स च्या वितरणाच्या ऑफर, विक्री आणि हस्तांतरणावरील इतर काही निर्बंधांसाठी, प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजामधील ‘नोटीस टू इन्व्हेस्टर्स’, ‘रिप्रेझेंटेशन बाय इन्व्हेस्टर्स’, ‘सेलिंग रिस्ट्रिक्शन्स’, आणि ‘ट्रान्स्फर रिस्ट्रिक्शन्स’ हे वाचावे.

हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज भारतातील जनतेला किंवा इतर कोणत्याही अधिकारक्षेत्रात प्रसारित किंवा वितरित केले जाणार नाही आणि भारतात किंवा इतर कोणत्याही अधिकारक्षेत्रात सार्वजनिक ऑफरची आहे असे मानता येणार नाही.

आपण वर नमूद केलेला अस्वीकरण वाचला आणि समजून घेतला आहे आणि आपण अशा अधिकारक्षेत्रातील  अशी व्यक्ती आहात जिच्या ताब्यात हे प्लेसमेंट दस्तऐवज कायदेशीररित्या वितरित केले जाऊ शकते, या आधारावर स्मरण करून दिले जाते की आपण प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजात प्रवेश करत आहात. जर असे नसेल किंवा आपण या नोटिसमधील अटींशी सहमत नसाल, तर आपण प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजात प्रवेश करू नये आणि आपण आपल्या ताब्यात असलेल्या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजाच्या सर्व प्रती नष्ट केल्या पाहिजेत.

व्हायरस आणि इतर कोणत्याही विध्वंसक गोष्टीपासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहात. आपण आपल्या जबाबदारीवर या वेबसाइटवर प्रवेश करत आहात आणि ही वेबसाईट ती व्हायरस आणि विध्वंसक स्वरूपाच्या इतर गोष्टीपासून मुक्त आहे याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

हा प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक किंवा इतर माध्यमातून, संपूर्ण किंवा अंशतः, डाउनलोड, वितरित, अग्रेषित किंवा वितरित केला जाऊ शकत नाही, तसेच इतर कोणत्याही व्यक्तीस, कधीही उघड केले जाऊ शकत नाही. या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजाचे कोणत्याही प्रकारे संपूर्ण किंवा अंशतः डाउनलोड, फॉरवर्डिंग, वितरण किंवा पुनर्निर्मिती करणे अनधिकृत आहे. या अस्वीकरणाचे पालन करण्यात आपण अयशस्वी झाल्यास आपल्या द्वारे लागू कायद्यांचे उल्लंघन होऊ शकते.

अटी आणि शर्तींच्या आपल्या स्वीकृतीची पुष्टी

  1. “मला मान्य आहे” या बटणावर क्लिक करून, मी प्रमाणित करत आहे की मी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा कोणत्याही प्रतिबंधित अधिकारक्षेत्रातून या वेबसाइटवर प्रवेश करत नाही. आपण हे पुष्टीकरण करू शकत नसल्यास, आपण "मला मान्य नाही" असे चिन्हांकित बटण दाबावे.
  2. मी वर दिलेला डिस्क्लेमर वाचला आहे आणि मला समजला आहे. मला समजते की याचा माझ्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो. मी त्याच्या अटींना बांधील असण्यास सहमत आहे. "मला मान्य आहे" बटणावर क्लिक करून, मी पुष्टी करत आहे की मला प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज पाहण्याची परवानगी आहे.

मी सुनिश्चित करतो     मी सुनिश्चित करीत नाही