Beti Bachao Beti Padhao

पॉजिटिव पे सिस्टम

प्रमुख वैशिष्ट्ये

रिजर्व बँक ऑफ इंडिया ने 25 सप्टेंबर 2020 रोजी जारी केलेल्या RBI/2020-1/41/DPSS.CO.RPPD.No.309/04.07.2005/2020-21 या परिपत्रकातील निर्देशानुसार बँक ऑफ महाराष्ट्र ने पॉजिटिव पे सिस्टम (पीपीएस) सुरू केली आहे.

या सिस्टम मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र च्या ग्राहकांनी लाभार्थ्यांना चेक जारी करण्यापूर्वी त्या चेकचे मुख्य तपशील आधीच बँकेकडे सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून CTS क्लिअरिंगमध्ये (तसेच बँकेच्या च्या मूळ शाखेव्यतिरिक्त इतर शाखांमध्ये) सादर होणारे मोठ्या रकमेचे चेक हे खाते धारकांकडून पडताळणीसाठी फोन न करता पास करता येतील.

दिनांक 17.02.2022 पासून जारी करण्यात येणार्‍या चेकची माहिती या सिस्टम मध्ये बँकेला देणे बंधनकारक आहे. यासाठीची किमान मर्यादा वैयक्तिक ग्राहकांसाठी रुपये 50,000/- आणि त्याहून अधिक तसेच कॉर्पोरेट ग्राहकांसाठी रुपये 5.00 लाख आणि त्याहून अधिक अशी आहे. पीपीएस मध्ये बँकेकडे माहिती सादर करणारे करणारे ग्राहक हेच केवळ चेक फसवणुकीच्या संबंधित दाद मागण्यास पात्र असतील.

पीपीएस सुविधा ही इंटरनेट बँकिंग आणि शाखेद्वारे उपलब्ध आहे. पीपीएस बाबतची माहिती संलग्न नमुन्यामध्ये लिखित स्वरूपात ग्राहक बँकेला देऊ शकतात. बँक शाखांमधील कर्मचारी हे पोर्टल ULC > Positive Pay for Cheques Truncation System या द्वारे अॅक्सेस करू शकतात.

एकदा माहिती दिल्यानंतर त्यामध्ये कोणताही फेरफार होऊ शकणार नाही, कारण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रदान केलेल्या सर्व्हरवर एकदा डेटा सबमिट झाल्यानंतर अशा नोंदणीकृत झालेल्या माहितीमध्ये बदल करण्याची किंवा ती माहिती डिलिट करण्याची काही सोय उपलब्ध नाही. अशा प्रकारे जारी केलेल्या चेक चे, तो चेक CTS क्लिअरिंगमध्ये किंवा काउंटरवर पेमेंट साठी सादर होण्यापूर्वी, स्टॉप पेमेंट करण्याचा पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध आहे.

  • ग्राहकांनी जारी केलेल्या चेक बाबतीत, त्याची बँकेकडून पडताळणी केला असो किंवा नसो, तो चेक क्लिअरिंगमध्ये किंवा काउंटरवर पेमेंट साठी सादर होण्यापूर्वी त्या चेक साठी पुरेशी रक्कम खात्यात असेल याची ग्राहकांनी खात्री केली पाहिजे.
  • जुने चेक (पडताळणीच्या तारखेपासून 3 महिने आधी जारी केलेले) पीपीएस मध्ये स्वीकारले जाणार नाहीत.
  • भविष्यातील कोणतीही तारीख असलेल्या चेक ची माहिती स्वीकारली जाईल.

पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन शाखेमार्फत (बँक ऑफ महाराष्ट्रची कोणतीही शाखा) करणे आवश्यक असल्यास ग्राहकांच्या माहिती साठी सदर फॉर्म येथे जोडला आहे. मूळ कन्फर्मेशन फॉर्म शाखांद्वारे फक्त त्यांच्या व्यवसायाच्या वेळेत स्वीकारला जाईल. सरकारी खात्यांसाठी मूळ कन्फर्मेशन फॉर्म ची छापील प्रत बँकेत देण्याचे बंधन नाही. सरकारी विभागाच्या नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे स्कॅन केलेली प्रत बँकेच्या ईमेल वर आल्यास आणि मूळ शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची पुष्टी केल्यास, तो फॉर्म स्वीकारला जाईल.

खात्यातील ऑपरेशनल इन्सट्रक्शन (वापराचे निर्देश) नुसार त्या खात्याच्या सर्व अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांनी सही केलेला कन्फर्मेशन फॉर्म भारतातील कोणत्याही शाखेद्वारे बँकेकडे सादर करता येईल. स्कॅन केलेले फॉर्म, फॅक्स, झेरॉक्स प्रत, ईमेल इत्यादी हे सरकारी खात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खात्यांसाठी शाखांद्वारे स्वीकारले जाणार नाही.

नेट बँकिंग: - ग्राहकांना त्यांचे लॉग इन क्रेडेंशियल्स एंटर करून लॉगिन करावे लागेल, आणि त्या नंतर > select option > Payment/Transfer > Cheque positive pay system> A/c No. > Cheque No. > Cheque Date > Cheque Amount > Transaction Code> Drawee Bank Name > Drawee Bank Branch MICR Code > Payee Name> SAN> SUBMIT, हे पर्याय वापरुन पीपीएस मध्ये माहिती सादर करता येईल.

शाखेला भेट देऊन: - बँक ऑफ महाराष्ट्र च्या भारतातील कोणत्याही शाखेला वैयक्तिक भेट देऊन ग्राहक त्यांचे पॉजिटिव पे कन्फर्मेशन देऊ शकतात. ग्राहकांना विहित अर्जाच्या नमुन्यावर (येथे जोडल्याप्रमाणे)सर्व आवश्यक ती माहिती सादर करावी लागेल. संबंधित शाखेच्या कामकाजाच्या वेळेतच सदर कन्फर्मेशन त्या शाखेत सादर करावे ही ग्राहकांना नम्र विनंती.

पीपीएस ग्राहक फॉर्म डाउनलोड करा - इंग्रजी